Two planes collide: हवेत दोन विमानांची टक्कर, एअर शोदरम्यान घडला अपघात, Watch Video

लोकल ते ग्लोबल
Pooja Vichare
Updated Nov 13, 2022 | 09:20 IST

Two military aircraft collide:दुसऱ्या विमानाचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. पायलट आणि क्रू मेंबर्ससह 6 जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Two military aircraft collide
हवेत दोन विमानांची जबरदस्त टक्कर, अपघाताचा Live Video 
थोडं पण कामाचं
  • डॅलसमध्ये (Dallas) दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील दोन युद्ध विमाने (world war 2) हवेत धडकली.
  • दुसऱ्या विमानाचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे.
  • पायलट आणि क्रू मेंबर्ससह 6 जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

टेक्सास:  Two military aircraft collide: अमेरिकेच्या टेक्सास राज्यात (Texas, USA)  एअर शो सुरू असताना एक भीषण अपघात (Terrible Accident) झाला. इथे डॅलसमध्ये (Dallas) दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील दोन युद्ध विमाने (world war 2) हवेत धडकली. हा अपघात इतका भीषण होता की, टक्कर होताच एका विमानाचे मधूनच दोन तुकडे झाले, तर दुसऱ्या विमानाचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. पायलट आणि क्रू मेंबर्ससह 6 जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशन (FAA) नुसार, शनिवारी अमेरिकेतील डॅलस येथे वर्ल्ड वॉर-2 कोमिमोरेटिव एअर शोचे आयोजन करण्यात आले होते. ते पाहण्यासाठी लांबून लोक आले होते. एअरशो सुरू असताना अचानक बोईंग बी-17 फ्लाइंग फोर्ट्रेस बॉम्बरची दुसऱ्या बेल पी-63 किंगकोब्रा फायटरशी समोरासमोर टक्कर झाली.

डॅलस एक्झिक्युटिव्ह विमानतळाजवळ हा अपघात झाला. विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी ट्विटरवर सांगितले की, आपत्कालीन कर्मचारी अपघाताच्या ठिकाणी पोहोचले आहेत. अपघातानंतर विमानातील क्रू मेंबर्सची चौकशी करण्यात येत आहे. दोन्ही विमानांमध्ये किती लोक होते हे सध्या स्पष्ट झालेले नाही.

अधिक वाचा-  Bharat Jodo Yatra भारत जोडो यात्रेसाठी भारतीय कुटुंब थेट लंडनहून आले

दुसऱ्या महायुद्धातील लढाऊ विमानांच्या जतनासाठी समर्पित गट, Commissariat Air Force (CAF) चे अध्यक्ष आणि CEO हँक कोट्स म्हणाले की, B-17 मध्ये साधारणपणे चार ते पाच लोकांचा क्रू असतो. कोट्स म्हणाले की P-63 मध्ये फक्त एक पायलट आहे, मात्र अपघाताच्या वेळी विमानात इतर किती लोक होते हे त्यांनी सांगितले नाही.

ही घटना सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये कैद झाली आहे, ज्यामध्ये दोन विमाने एकमेकांवर आदळली आणि आगीच्या भक्ष्यस्थानी जमिनीवर कोसळली. लाइव्ह एरियल व्हिडिओमध्ये विमानाचा ढिगारा गवतावर विखुरलेला दिसला. FAA आणि नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड (NTSB) या दोघांनी तपास सुरू केला आहे, NTSB ने घटनेची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी