Death While Making Reels : रील्स बनवताना रेल्वेची धडक, दोघांचा मृत्यू

Two minor boys run over by train in Bihar  Khagaria district : सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी रील्स बनवताना रेल्वेची धडक बसल्यामुळे 2 जणांचा मृत्यू झाला. ही घटना भारतात बिहारमधील खडगिया येथे घडली. 

Bihar
Two minor boys run over by train in Bihar  Khagaria district  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • रील्स बनवताना रेल्वेची धडक, दोघांचा मृत्यू
  • बिहारमधील खडगिया येथील घटना
  • एक मुलगा गंभीर जखमी

Two minor boys run over by train in Bihar  Khagaria district : सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी रील्स बनवताना रेल्वेची धडक बसल्यामुळे 2 जणांचा मृत्यू झाला. ही घटना भारतात बिहारमधील खडगिया येथे घडली. 

खडगिया येथील रेल्वेच्या पुलावर रील्स तयार करण्यासाठी तीन मुलं गेली होती. दाट धुक्यामुळे त्यांना पुलावर वेगाने येत असलेली ट्रेन दिसली नाही. मुलं रील्स तयार करण्यात गुंग असताना ट्रेनची त्यांना धडक बसली. या अपघातात 3 पैकी 2 मुलांचा मृत्यू झाला आणि 1 जण गंभीर जखमी झाला. जखमी झालेल्या मुलाने शेवटच्या क्षणी ट्रेन जवळ येत असल्याचे बघून पुलावरुन खाली उडी मारली होती. या प्रयत्नात तो जखमी झाला. पोलिसांनी या प्रकरणात अपघाताची नोंद केली आहे.

रील्स म्हणजे काय?

रील्स (reel or reels) म्हणजे शॉर्ट व्हिडीओचे (Short Video) एक स्वरुप म्हणता येईल. इन्स्टाग्राम (Instagram) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील शॉर्ट व्हिडीओला रील्स म्हणतात. रील्स हा प्रकार इन्स्टाग्रामवर लाँच झाला त्यावेळी 15 सेकंदांचे शॉर्ट व्हिडीओ हे रील्स स्वरुपात अपलोड करता येत होते. आता जास्तीत जास्त 90 सेकंदांचे शॉर्ट व्हिडीओ हे रील्स म्हणून अपलोड करता येतात. 

भारतात रील्सची लोकप्रियता

रील्स लाँच केल्याची घोषणा इन्स्टाग्रामने 5 ऑगस्ट 2020 रोजी केली. या घोषणेला 2 वर्ष पूर्ण झाली. एवढ्या कमी काळात भारतात रील्स हा प्रकार प्रचंड लोकप्रिय झाला आहे. अशिक्षित व्यक्तीपासून सेलिब्रेटींपर्यंत समाजाच्या वेगवेगळ्या थरात असलेले देशातील हजारो नागरिक दर आठवड्याला किमान एक रील्स तरी हमखास तयार करतात. इन्स्टाग्रामवर दररोज हजारोंच्या संख्येने रील्स अपलोड होतात. उपलब्ध आकडेवारीनुसार, इन्स्टाग्रामवर पोस्ट होणाऱ्या फोटो, व्हिडीओंपेक्षा रील्स ही जास्त लोकप्रिय आहेत. रील्स बघणे, लाइक करणे, रील्सवर प्रतिक्रिया देणे, रील्स शेअर करणे यांचे प्रमाण मोठे आहे.

महाराष्ट्र शासनाने दारू विकून केली घसघशीत कमाई, 9 महिन्यात मिळवला 14 हजार 480 कोटींचा महसूल

नोटबंदी वैध, नोटबंदीच्या अधिसूचनेत त्रुटी नाही : SC

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी