दक्षिण कोरियात हवाई दलाच्या दोन विमानांची टक्कर

Two South Korea Air Force Planes Collide Midair 4 Pilots Killed : दक्षिण कोरियात एक विचित्र अपघात झाला. हवाई दलाच्या दोन प्रशिक्षणासाठीच्या विमानांची हवेत टक्कर झाली. या अपघातात चार वैमानिकांचा मृत्यू झाला.

Two South Korea Air Force Planes Collide Midair 4 Pilots Killed
दक्षिण कोरियात हवाई दलाच्या दोन विमानांची टक्कर 
थोडं पण कामाचं
  • दक्षिण कोरियात हवाई दलाच्या दोन विमानांची टक्कर
  • अपघातात चार वैमानिकांचा मृत्यू
  • राजधानी सेउलपासून (Seoul) सुमारे तीनशे किमी अंतरावर साचीओन (Sacheon) येथे डोंगराळ भागावरील आकाशात विमानांची टक्कर

Two South Korea Air Force Planes Collide Midair 4 Pilots Killed : सेउल दक्षिण कोरियात एक विचित्र अपघात झाला. हवाई दलाच्या दोन प्रशिक्षणासाठीच्या विमानांची हवेत टक्कर झाली. या अपघातात चार वैमानिकांचा मृत्यू झाला. ज्या विमानांची टक्कर झाली ती दोन्ही विमानं दोन आसनी होती. 

राजधानी सेउलपासून (Seoul) सुमारे तीनशे किमी अंतरावर साचीओन (Sacheon) येथे डोंगराळ भागावरील आकाशात विमानांची टक्कर झाली. दोन्ही विमानांचे अवशेष डोंगराळ भागात कोसळले. अपघाताची माहिती मिळताच दक्षिण कोरियाच्या हवाई दलाचे पथक मदतकार्यासाठी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी कोसळलेल्या विमानांचे ब्लॅक बॉक्स शोधण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. ब्लॅक बॉक्समध्ये विमानाशी संबंधित अनेक तांत्रिक नोंदी तसेच वैमानिकांचे आपापसातील बोलणे आणि नियंत्रण कक्षाशी साधलेला संवाद रेकॉर्ड केलेला असतो. या माहितीचे विश्लेषण करून अपघाताचे नेमके कारण उलगडणे सोपे जाते. यामुळेच ब्लॅक बॉक्स शोधत असल्याचे हवाई दलाने सांगितले.

दोन केटी-१ विमानांची हवेत टक्कर झाल्यामुळे चार वैमानिकांचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी आणि दुर्मिळ अशी घटना आहे. या प्रकरणी हवाई दलामार्फत तज्ज्ञांची समिती चौकशी करणार आहे. 

याआधी याच वर्षी (२०२२) जानेवारी महिन्यात एक एफ-५ लढाऊ विमान कोसळले होते. या अपघातात एका वैमानिकाचा मृत्यू झाला होता. ही घटना घडण्याच्या काही दिवस आधीच दक्षिण कोरियात एका एफ-३५ विमानात गंभीर स्वरुपाचा तांत्रिक दोष आढळला होता. यानंतर दक्षिण कोरियाच्या हवाई दलाने ताफ्यातील सर्व एफ-३५ विमानांची उड्डाणं पुढील आदेशापर्यंत स्थगित करत असल्याचे जाहीर केले. 

दक्षिण कोरियाच्या हवाई दलात अमेरिकेतील कंपन्यांकडून घेतलेली लढाऊ विमानं मोठ्या संख्येने आहेत. पण ताज्या घटनांमुळे दक्षिण कोरियाच्या हवाई दलाच्या क्षमतेवर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी