सिलेंडरचा भीषण स्फोट, १२ जणांचा मृत्यू; स्फोटात संपूर्ण इमारतच कोसळली 

लोकल ते ग्लोबल
Updated Oct 14, 2019 | 13:02 IST | टाइम्स नाऊ मराठी

उत्तरप्रदेशमधील मउ जिल्ह्यात झालेल्या सिलेंडर स्फोटात तब्बल १२ जणांचा मृत्यू झाला असून १५ जण गंभीर जखमी झाले आहेत. 

two storey building collapsed and 12 dead following a cylinder blast at a home in mau uttar pradesh
सिलेंडरचा भीषण स्फोट, १२ जणांचा मृत्यू; स्फोटात संपूर्ण इमारतच कोसळली  |  फोटो सौजन्य: ANI

थोडं पण कामाचं

  • सिलेंडर स्फोटात १२ जणांचा मृत्यू, १५ जण गंभीर जखमी
  • सिलेंडर स्फोटामुळे इमारतीचे दोन मजले कोसळले 
  • उत्तरप्रदेशमधील मउ जिल्ह्यात घडली दुर्घटना

मउ (उत्तरप्रदेश): उत्तर प्रदेशच्या मउ जिल्ह्यातील मोहम्मदाबाद इथे एका इमारतीत झालेल्या सिलेंडर स्फोटात तब्बल १२ जणांचा मृत्यू झाला असून १५ हून अधिकजण गंभीर जखमी झाले आहेत. हा सिलेंडर स्फोट एवढा भयंकर होता की, त्यामध्ये दोन मजले अक्षरश: उद्धवस्त झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या स्फोटानंतर या इमारतीत इतरही अनेक जण अडकले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. 

मउच्या वालिदपूरमधील एका घरात झालेल्या सिलेंडर स्फोटात आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाला आहे. पण यात मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, या घटनेनंतर उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शोक व्यक्त केला आहे. अपर मुख्य सचिव अवनीश अवस्थी यांनी या घटनेबाबत माहिती देताना असं म्हटलं की, 'मउच्या वालिदपूरमधील एका घरात झालेल्या स्फोटात आतापर्यंत जवजवळ १२ जणांचा मृत्यू झाला आहे.' 

अचानक घडलेल्या या घटनेमुळे सुरुवातीला संपूर्ण परिसरात घबराटीचं वातावरण पसरलं होतं. कारण सिलेंडर स्फोटाचा प्रचंड आवाज आणि त्यामुळे कोसळलेली इमारत यामुळे सुरुवातीला नेमकं काय घडलं हे कुणालाच कळलं नाही. पण नंतर स्पष्ट झालं की, सिलेंडर स्फोटामुळे हा संपूर्ण प्रकार घडला आहे. पण सिलेंडरचा स्फोट नेमका कशामुळे झाला याबाबत अद्याप कोणतीही माहिती नाही.  

स्फोटामुळे इमारती कोसळली असून ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकले आहे. सध्या बचाव पथक अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचं काम करत आहे. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी मोठ्या प्रमाणात बचाव पथकं दाखल झाला. जे मागील काही वेळेपासून अनेकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न करत आहेत. 

दरम्यान, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना जखमींवर तात्काळ उपचार करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या दुर्घटनेतील पीडितांना शक्य ती मदत करण्याचे देखील आदेश दिले आहेत. आहे. यावेळी त्यांनी शोक व्यक्त करताना मृतकांच्या कुटुंबीयांविषयी संवेदना व्यक्त केल्या आहेत. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी