Pulwama Encounter: पुलवामामध्ये २ दहशतवादी ठार, प्रवासी मजदुरांच्या हत्येसाठी होते जबाबदार 

लोकल ते ग्लोबल
Updated Apr 28, 2022 | 09:55 IST | टाइम्स नाऊ मराठी

Pulwama Encounter । पुलवामा येथे झालेल्या चकमकीत एकूण २ दहशतवाद्यांना ठार करण्यात सुरक्षा दलातील जवानांना यश आले आहे. बुधवारी मित्रीग्राम भागात ही चकमक सुरू झाली. चकमकीच्या पहिल्या दिवशी एक दहशतवादी मारला गेला, तर गुरूवारी दुसऱ्या दहशतवाद्याला मारण्यात यश आले.

Two terrorists killed in Pulwama, responsible for killing migrant workers
पुलवामामध्ये २ दहशतवादी ठार, वाचा सविस्तर   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • पुलवामा येथे झालेल्या चकमकीत २ दहशतवादी ठार.
  • दोन्ही दहशतवादी प्रवासी मजदुरांच्या हत्येसाठी जबाबदार होते.
  • दोन्ही दहशतवादी स्थानिक होते.

Pulwama Encounter । नवी दिल्ली : पुलवामा येथे झालेल्या चकमकीत एकूण २ दहशतवाद्यांना ठार करण्यात सुरक्षा दलातील जवानांना यश आले आहे. बुधवारी मित्रीग्राम भागात ही चकमक सुरू झाली. चकमकीच्या पहिल्या दिवशी एक दहशतवादी मारला गेला, तर गुरूवारी दुसऱ्या दहशतवाद्याला मारण्यात यश आले. याबाबतची माहिती जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिली. दरम्यान हे दोन्ही दहशतवादी मार्च-एप्रिल २०२२ मध्ये स्थलांतरित मजुरांवर झालेल्या हल्ल्यासाठी जबाबदार होते. (Two terrorists killed in Pulwama, responsible for killing migrant workers). 

अधिक वाचा : राज्यात पुढील ५ दिवस वाहणार भयंकर उष्णतेची लाट

ठार झालेले दहशतवादी अल बद्रमधील

जम्मू-काश्मीर पोलिसांचे म्हणणे आहे की मारले गेलेले दहशतवादी अयाज हाफिज आणि साहिद अयुब हे अल बद्रशी संबंधित आहेत. दोन्ही दहशतवादी स्थानिक होते. त्यांच्याकडून एके ४७ (AK-47) जप्त करण्यात आली आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की, ठोस आणि पुरेशी माहिती मिळाल्यानंतर नाकाबंदी करण्यात आली ज्यामध्ये दोन ते तीन दहशतवादी लपून बसल्याचे उघड झाले. दरम्यान नागरिकांना बाहेर काढण्यासाठी काही काळ कारवाई थांबवण्यात आली होती. 

पोलिस अधिकाऱ्याने म्हटले की, दहशतवाद्यांविरोधातील कारवाईत सर्वसामान्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची विशेष काळजी घेतली जाते. अलीकडच्या काळात ज्याप्रकारे स्थानिक लोकांचा पाठिंबा मिळत आहे, त्यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की, आता दहशतवाद्यांना आश्रय मिळणे तितके सोपे नाही. त्यामुळे सुरक्षा दलालाही याची चांगलीच मदत होत आहे. 

काही वेळ कारवाई थांबवली 

अधिकाऱ्यांनी म्हटले की, दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांच्या जवानांवर गोळीबार करण्यास सुरूवात केली. या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला होता. तत्पूर्वी काश्मीरचे पोलिस महानिरीक्षक विजय कुमार यांनी सांगितले की, दोन ते तीन जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी या भागात लपले असल्याचा संशय आहे. या चकमकीत एक जवान जखमी झाल्याचे विजय कुमार यांनी ट्विट केले आहे. अडकलेल्या दहशतवाद्यांना लवकरच ठार करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. सामान्य नागरिकांना तेथून हटवण्यासाठी काही काळ कारवाई थांबवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी