Uddhav Thackeray group is dealt a big blow by the Supreme Court : शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह यावर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात करण्यात आलेला दावा निवडणूक आयोगाने मान्य केला. या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात दाद मागितली. उद्धव ठाकरे गटाच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आणि आजच तातडीने सुनावणी करा अशी मागणी केली. उद्धव ठाकरे गटाची ही मागणी सुप्रीम कोर्टाने ताबडतोब फेटाळली. सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय म्हणजे उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का असल्याची चर्चा आहे.
याचिका दाखल करण्याची एक प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया पूर्ण करून सुप्रीम कोर्टासमोर या. नंतर प्रकरण ऐकून घेतले जाईल, असे सुप्रीम कोर्टाकडून सांगण्यात आले.
याआधी उद्धव ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात याचिका केली. उद्धव ठाकरे गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांची भेट घेतली. पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह या दोन मुद्यांवर निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान द्यायचे आहे असे सांगत सिंघवी यांनी तातडीच्या सुनावणीची मागणी केली. पण सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी ही मागणी फेटाळली.
नियम सर्वांना समान आहेत. याचिका दाखल करण्याची एक प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया पूर्ण करून सुप्रीम कोर्टासमोर या. नंतर प्रकरण ऐकून घेतले जाईल, असे सुप्रीम कोर्टाकडून सांगण्यात आले.
याआधी निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाच्या धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींपैकी 76 टक्के प्रतिनिधींचा पाठिंबा एकनाथ शिंदे यांच्याकडे असल्याचे निरीक्षण नोंदवत पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेतला.
शिवसेनेचा व्हिप फक्त 55 आमदारांना 56 नव्हे; नेमकं आहे तरी काय हा घोळ, जाणून घ्या
शिवसेना या पक्षाच्या घटनेत 2018 मध्ये बदल करण्यात आले. या बदलांची माहिती निवडणूक आयोगाला नियमानुसार देणे बंधनकारक आहे. पण ही माहिती न देताच पक्षाच्या अंतर्गत रचनेत मूलभूत बदल करण्यात आले. यामुळे पक्षघटनेचा मुद्दा निकालाच्यावेळी बाजुला पडला. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या गटाने कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांची शपथपत्रे सादर केली. पण शिंदे गटाने उद्धव ठाकरे गटाच्या अनेक शपथपत्रांविरोधात हरकत नोंदवली. यानंतर सत्यता पडताळणे कठीण असल्याचे सांगत निवडणूक आयोगाने शपथपत्रांचा मुद्दा निकाली काढला. अखेर थेट जनतेमधून निवडून आलेल्या विधानसभेतील आमदार आणि लोकसभेतील खासदारांपैकी किती जण कोणत्या गटाकडे आहेत याची पडताळणी करण्यात आली. यात बहुसंख्य प्रतिनिधींचा पाठिंबा एकनाथ शिंदे यांच्याकडे असल्याचे आढळले. यावरून शिवसेनेला मत देणाऱ्यांपैकी बहुसंख्य जनेताचा पाठिंबा शिंदे समर्थक गटाकडे आहे असाही निष्कर्ष काढण्यात आला. यानंतर निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेना हे पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह देत असल्याचा निर्णय दिला.
Mumbai Weather : मुंबईकरांना सज्ज व्हा, या दिवसापासून बसणार उन्हाचे चटके
निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे गटाला मशाल हे निवडणूक चिन्ह फक्त चिंचवड आणि कसबा या पोटनिवडणुकीपर्यंतच वापरण्याची परवानगी दिली आहे. आयोगाच्या आदेशानुसार 28 फेब्रुवारी 2023 नंतर मशाल हे चिन्ह उद्धव ठाकरे गटाला पुढे वापरता येणार नाही. त्यांना निवडणूक चिन्हासाठी नव्याने अर्ज सादर करावा लागेल. हा उद्धव ठाकरे गटासाठी आणखी एक धक्का असल्याची चर्चा आहे.