सावधान! ‘तुम्ही प्रवेश घेतलेलं विद्यापीठ बनावट नाही ना?, पहिल्यांदा UGC ने जाहीर केली लिस्ट पाहा

UGC Fake University List 2022: UGC ने 21 युनिव्हर्सिटींना बनावट म्हणजेच अपरिचित म्हणून घोषित केले आहे. यादी जाहीर करण्यासोबतच यूजीसीने विद्यार्थ्यांना या संस्थांमध्ये प्रवेश न घेण्याचा इशाराही दिला आहे.तुम्ही संपूर्ण यादी येथे पाहू शकता. उमेदवारांनी या विद्यापीठांमध्ये प्रवेश टाळावा.

UGC Fake University List 2022: UGC told 21 universities to be fake
सावधान! ‘तुम्ही प्रवेश घेतलेलं विद्यापीठ बनावट नाही ना?, पहिल्यांदा UGC ने जाहीर केली लिस्ट पाहा   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • यूजीसी फेक युनिव्हर्सिटी लिस्ट 2022
  • 21 विद्यापीठांना बनावट असल्याचे सांगितले,
  • महाराष्ट्रातील एका विद्यापीठाचा समावेश

मुंबई: युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन (यूजीसी) ने शुक्रवारी, 26 ऑगस्ट रोजी बनावट विद्यापीठांची यादी जाहीर केली. सध्या देशभरातील सर्व विद्यापीठांमध्ये एकीकडे प्रवेश प्रक्रिया सुरू असताना, दरम्यान, यूजीसीने 21 विद्यापीठे बनावट म्हणजेच विना मान्यता म्हणून घोषित केली आहेत. यादी जाहीर करण्यासोबतच यूजीसीने विद्यार्थ्यांना या संस्थांमध्ये प्रवेश न घेण्याचा इशाराही दिला आहे. विद्यार्थ्यांनी यापैकी कोणत्याही विद्यापीठात प्रवेश घेतल्यास त्यांची पदवी स्वीकारली जाणार नाही. (UGC Fake University List 2022: UGC told 21 universities to be fake)

अधिक वाचा : Heart Attack : खेळताना ह्रदयविकाराचा झटका आल्याने तरुण व्यावसायिकाचा मृत्यू

स्वयंभू विद्यापीठांना पदव्या देण्याचा अधिकार नाही

विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) बनावट आणि स्वयंभू घोषित केलेल्या विद्यापीठात दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक संस्था आहेत. बनावट घोषित केलेल्या या विद्यापीठांना कोणत्याही प्रकारचे पदवी अभ्यासक्रम चालविण्यास, त्यात प्रवेश घेण्याची आणि परीक्षेनंतर पदव्या देण्याची परवानगी नाही.

यूजीसीचे सचिव रजनीश जैन यांनी सांगितले की, यूजीसी कायद्याचे उल्लंघन करून काम करणाऱ्या किमान 21 स्वयंभू, मान्यता नसलेल्या संस्थांना बनावट विद्यापीठे म्हणून घोषित करण्यात आले आहे आणि त्यांना कोणतीही पदवी प्रदान करण्याचा अधिकार देण्यात आलेला नाही. यूजीसीनुसार महाराष्ट्रातील एक विद्यापीठ बनावट आहेत. नागपूरच्या राजा अरबी यूनिवर्सिटीचा यामध्ये समावेश आहे. 

अधिक वाचा : Sonali Phogat: मृत्यूपूर्वीचा शेवटचा व्हिडिओ आला समोर, पार्टीतील CCTV फुटेजमध्ये नेमकं काय?, पाहा VIDEO

यामध्ये दिल्लीतील ८, उत्तर प्रदेशातील ४ विद्यापीठे बनावट आहेत. त्याच वेळी, कर्नाटक, महाराष्ट्र, पुडुचेरी, आंध्र प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि केरळमध्येही काही बनावट विद्यापीठे आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी