UGC NET admit card: यूजीसी नेट परीक्षेचं अ‍ॅडमिट कार्ड डाऊनलोड करण्यासाठी Direct Link, जाणून घ्या ugcnet.nta.nic.in वर वेळापत्रक 

UGC NET Exam 2023: यूजीसी नेट परीक्षा 21 फेब्रुवारी 2023 पासून सुरू होत आहे. 57 विषयांच्या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. यासोबतच अधिकृत वेबसाईट ugcnet.nta.nic.in  वर अ‍ॅडमिट कार्ड सुद्धा लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. 

UGC NET admit card 2023 admit card download direct link when will be release check time table on ugcnet nta nic in
UGC NET admit card: यूजीसी नेट परीक्षेचं अ‍ॅडमिट कार्ड डाऊनलोड करण्यासाठी Direct Link, जाणून घ्या ugcnet.nta.nic.in वर वेळापत्रक   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • यूजीसी नेट परीक्षेचं अ‍ॅडमिट कार्ड डाऊनलोड करण्यासाठी सर्वप्रथम ugcnet.nta.nic.in अधिकृत वेबसाईटला भेट द्या
  • होम पेजवर 'यूजीसी नेट डिसेंबर अ‍ॅडमिट कार्ड' असलेल्या लिंकवर क्लिक करा

UGC NET Exam 2023 admit card download direct link: यूजीसी नेट परीक्षा 21 फेब्रुवारी 2023 पासून सुरू होत आहे. या परीक्षेसाठी एक्झाम सिटी स्लिप जाहीर करण्यात आले आहे. तसेच विषयानुसार परीक्षेचं संपूर्ण वेळापत्रकही जाहीर करण्यात आलं आहे. जेणेकरुन कोणत्या दिवशी कोणता पेपर हे विद्यार्थ्यांना सहज कळेल. मात्र, या परीक्षेसाठी अद्याप अ‍ॅडमिट कार्ड रिलीज करण्यात आलेलं नाहीये. अपेक्षा आहे की, नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच NTA कोणत्याही वेळी परीक्षेसाठी आवश्यक असलेलं अ‍ॅडमिट कार्ड जाहीर करण्यात येईल. विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाईट ugcnet.nta.nic.in  वर लॉग ईन करुन अ‍ॅडमिट कार्ड डाऊनलोड करता येईल.

या वेबसाईट्सवर रिलीज होईल अ‍ॅडमिट कार्ड

nta.ac.in

ugcnet.nta.nic.in

हे पण वाचा : पेनाच्या टोपणाला छिद्र का असतं? जाणून घ्या

UGC NET admit card how to download

  1. यूजीसी नेट परीक्षेचं अ‍ॅडमिट कार्ड डाऊनलोड करण्यासाठी सर्वप्रथम ugcnet.nta.nic.in अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
  2. होम पेजवर 'यूजीसी नेट डिसेंबर अ‍ॅडमिट कार्ड' असलेल्या लिंकवर क्लिक करा.
  3. त्यानंतर दिलेल्या क्रेडेंशियल्ससह पोर्टलवर लॉग ईन करा. 
  4. यानंतर सबमिटवर क्लिक करा. मग तुम्हाला स्क्रिनवर अ‍ॅडमिट कार्ड दिसून येईल.
  5. अ‍ॅडमिट कार्ड देण्यात आलेली सर्व माहिती तपासून घ्या आणि त्यानंतर ते डाऊनलोड करुन त्याची प्रिंट काढून घ्या.

यूजीसी नेट परीक्षा केंद्राच्या शहरांच्या संदर्भातील माहितीबाबतचं नोटिफिकेशन लवकरच एनटीएच्या वेबसाईटवर ugcnet.nta.nic.in आणि nta.ac.in वर रिलीज करण्यात येईल.

हे पण वाचा : या कारणांमुळे होतो गर्भपात

हेल्पलाईन नंबर जाहीर

एनटीएने एक्झाम सिटी स्लिप रिलीज करण्यासोबतच हेल्पलाईन नंबर जाहीर केला आहे. एखाद्या उमेदवाराला यूजीसी नेट डिसेंबर 2022 फेज 1 परीक्षेचं अ‍ॅडमिट कार्ड डाऊनलोड करण्यात अडचणी येत असतील तर हेल्पलाईन नंबरवर संपर्क करु शकतात. हेल्पलाईन नंबर 011-40759000 वर कॉल करुन तुम्ही मदत घेऊ शकता. याच्यासोबतच ugcnet@nta.ac.in वर ईमेल करु शकता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी