गडकरींचा सल्ला ऐकून खासदाराने घटविले १२ किलो वजन, १२ हजार कोटींचा विकासनिधी मिळविणार?

Ujjain News: On The Advice Of The Minister, The MP Reduced The Weight Of 12 Kg In Three Months, Will Get 12 Thousand : बेधडक बोलण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी प्रसिद्ध आहेत. त्यांनी बेधडकपणे एक ऑफर जाहीर केली. आता ही गोष्ट प्रत्यक्षात करण्याची वेळ आली आहे.

Ujjain News: On The Advice Of The Minister, The MP Reduced The Weight Of 12 Kg In Three Months, Will Get 12 Thousand
गडकरींचा सल्ला ऐकून खासदाराने घटविले १२ किलो वजन  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • गडकरींचा सल्ला ऐकून खासदाराने घटविले १२ किलो वजन
  • १२ किलो वजन घटविण्याच्या बदल्यात १२ हजार कोटींचा विकासनिधी मिळविणार?
  • गडकरी खासदाराला दिलेली ऑफर प्रत्यक्षात आणणार?

Ujjain News: On The Advice Of The Minister, The MP Reduced The Weight Of 12 Kg In Three Months, Will Get 12 Thousand : उज्जैन : बेधडक बोलण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी प्रसिद्ध आहेत. त्यांनी बेधडकपणे एक ऑफर जाहीर केली. आता ही गोष्ट प्रत्यक्षात करण्याची वेळ आली आहे. या परिस्थितीत गडकरी काय करणार याकडे अनेकांचे लक्ष आहे.

उज्जैनमध्ये असताना एका भाषणात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, स्थानिक खासदार यांनी स्वतःचे वजन घटवावे. मी स्वतः वाढत्या वजनाचा त्रास होतो म्हणून वजन कमी केले आहे. जर उज्जैनचे खासदार महोदय स्वतःचे वजन घटविणार असतील तर त्यांनी कमी केलेल्या प्रत्येकी एक किलो वजनासाठी उज्जैनला एक हजार कोटी रुपये या पद्धतीने विकासनिधी दिला जाईल. 

गडकरींनी ऑफर दिल्यानंतर उज्जैनचे खासदार अनिल फिरोजिया यांनी तीन महिन्यांत बारा किलो वजन घटविले. जाहीर केल्याप्रमाणे बारा किलो घटविलेल्या वजनाच्या बदल्यात बारा हजार कोटी रुपयांचा विकासनिधी गडकरींनी उज्जैनला द्यावा अशा स्वरुपाची मागणी फिरोजिया यांच्याकडून होत आहे. या मागणीला गडकरींनी अद्याप प्रतिसाद दिलेला नाही. पण बेधडक बोलण्यासाठी प्रसिद्ध असलेले गडकरी केंद्रीयमंत्री म्हणून उज्जैनच्या विकासाकरिता मोठी योजना राबविणार की त्यांची ऑफर प्रत्यक्षात येणार नाही यावरून चर्चेला उधाण आले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी