Zomato Ad Controversy: झोमॅटोने मागितली माफी, हृतिकची जाहिरात मागे घेतली

ujjain zomato ad controversy zomato apologizes on mahakals thali removes hrithik roshans advertisment : 'थाली का मन किया उज्जैन में हैं, तो महाकाल से मंगा लिया ...' असं बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनच्या तोंडी असलेलं वाक्य नव्या वादाला जन्म देण्यास कारणीभूत ठरलं.

Zomato Ad Controversy
झोमॅटोने मागितली माफी  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • झोमॅटोने मागितली माफी
  • हृतिकची जाहिरात मागे घेतली
  • ज्यांच्या भावना दुखावल्या त्यांची माफी मागत आहोत अशा शब्दात झोमॅटो कंपनीने जाहीर माफी मागितली

ujjain zomato ad controversy zomato apologizes on mahakals thali removes hrithik roshans advertisment : 'थाली का मन किया उज्जैन में हैं, तो महाकाल से मंगा लिया ...' असं बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनच्या तोंडी असलेलं वाक्य नव्या वादाला जन्म देण्यास कारणीभूत ठरलं. अखेर झोमॅटो या भारतातील फूड डीलिव्हरी सर्व्हिस देणाऱ्या कंपनीने माफी मागितली आणि वादग्रस्त जाहिरात मागे घेतली.

श्रीलंकेच्या क्रिकेटचे भवितव्य भारताच्या हाती असल्याची चर्चा, जयसूर्याने घेतली जय शहांची भेट

Iqbal Kaskar: दाऊदचा भाऊ इकबाल कासकरविषयी मोठी बातमी

उज्जैनमध्ये महाकाल रेस्टॉरंट आहे. या रेस्टॉरंटमधील थाळीचा उल्लेख करून जाहिरात तयार केली आहे. पण जाहिरातीमधील ओळीवरून उज्जैनमधील नागरिकांच्या भावना दुखावल्या आहेत. आम्ही उज्जैनवासियांच्या भावनांचा आदर करतो. भगवान महाकाल यांच्या भक्तांचा आदर करतो. आमचा उद्देश भावना दुखावणे हा नव्हता. यामुळे जाहिरात मागे घेत आहोत आणि ज्यांच्या भावना दुखावल्या त्यांची माफी मागत आहोत अशा शब्दात झोमॅटो कंपनीने जाहीर माफी मागितली आहे. 

याआधी जाहिरातीवरून वाद झाल्यानंतर मध्य प्रदेश सरकारने पोलिसांना चौकशीचे आदेश दिले होते. अखेर झोमॅटो कंपनीने प्रसिद्धीपत्रक काढून माफी मागितली आणि वादग्रस्त ठरलेली जाहिरात मागे घेत असल्याचे जाहीर केले.

महाकाल मंदिराच्या पुजाऱ्यांनी व्यक्त केलेली नाराजी

भारतात मध्य प्रदेशमध्ये उज्जैन येथे असलेले महाकालेश्वर ज्योतिर्लिंग (महांकाळेश्वर किंवा महांकाळ किंवा महाकाल) हे हिंदू मंदिर आहे. भगवान शंकराचे हे मंदिर एक तीर्थक्षेत्र आहे. ज्योतिर्लिंगांची यात्रा करताना भाविक या मंदिरात आवर्जून दर्शनासाठी येतात. मध्य प्रदेशमधील धार्मिक पर्यटनात उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर हे एक प्रमुख ठिकाण आहे. या मंदिरात दररोज मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. याच महाकालेश्वर मंदिराच्या पुजाऱ्यांनी हृतिकच्या जाहिरातीविषयी नाराजी व्यक्त केली होती. एक कंपनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी महाकाल या नावाचा वापर करत आहे. महाकाल मंदिरातून भोग प्रसाद याची कोणत्याही खासगी कंपनीच्या माध्यमातून व्यावसायिक पद्धतीने डीलिव्हरी केली जात नाही. या प्रकरणात हृतिक रोशन आणि संबंधित कंपनीने माफी मागावी अशी मागणी पुजाऱ्यांनी केली. यानंतर वाद आणखी चिघळला. अखेर झोमॅटो कंपनीने माफी मागितली आणि वादग्रस्त जाहिरात मागे घेतली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी