Rishi Sunak : ब्रिटिश इंडियन ऋषी सुनक इंग्लंडच्या पीएम पदाच्या स्पर्धेत, चौथ्या फेरीतही आघाडीवर

UK: Rishi Sunak tops 4th leadership ballot : इंग्लंडचे माजी अर्थमंत्री आणि इन्फोसिसचे संस्थापक नारायणमूर्ती यांचे जावई ऋषी सुनक हे प्राईम मिनिस्टर अर्थात पीएम पदाच्या स्पर्धेत आघाडीवर आहेत.

UK: Rishi Sunak tops 4th leadership ballot
Rishi Sunak : ब्रिटिश इंडियन ऋषी सुनक इंग्लंडच्या पीएम पदाच्या स्पर्धेत, चौथ्या फेरीतही आघाडीवर  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • Rishi Sunak : ब्रिटिश इंडियन ऋषी सुनक इंग्लंडच्या पीएम पदाच्या स्पर्धेत, चौथ्या फेरीतही आघाडीवर
  • चौथ्या ऋषी सुनक यांना ११८ मते मिळाली
  • पाचव्या टप्प्याच्या निवडणुकीत ऋषी सुनक, पेनी आणि ट्रुस या तिघांमधून दोन जणांची निवड होईल

UK: Rishi Sunak tops 4th leadership ballot : इंग्लंडचे माजी अर्थमंत्री आणि इन्फोसिसचे संस्थापक नारायणमूर्ती यांचे जावई ऋषी सुनक हे प्राईम मिनिस्टर अर्थात पीएम पदाच्या स्पर्धेत आघाडीवर आहेत. बोरिस जॉन्सन यांनी इंग्लंडच्या पीएम पदाचा राजीनामा दिल्यानंतर सत्ताधारी कंझर्व्हेटिव्ह पार्टीने अंतर्गत निवडणूक प्रक्रिया राबवून पीएम पदासाठी सक्षम उमेदवार निवडण्याची मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत पार्टीने अंतर्गत पातळीवर चार निवडणुका घेतल्या. या सर्व निवडणुकांमध्ये ऋषी सुनक विजयी झाले. चौथ्या टप्प्याच्या निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांमध्ये ते सर्वाधिक पसंतीचे उमेदवार ठरले. त्यांना ११८ मते मिळाली. पेनी यांना ९२ तर ट्रुस यांना ८६ मते मिळाली. केमी यांना ५९ मते मिळाली आणि ते चौथ्या टप्प्याच्या निवडणुकीअंती स्पर्धेतून बाद झाले. आता पाचव्या टप्प्याच्या निवडणुकीत ऋषी सुनक, पेनी आणि ट्रुस या तिघांमधून दोन जणांची निवड होईल. यानंतर कंझर्व्हेटिव्ह पार्टीची सर्वोच्च समिती दोघांमधून एकाची पीएम पदासाठी निवड करणार आहे. 

ऋषी सुनक यांच्या पुढील आव्हान

ऋषी सुनक यांनी राजीनामा दिला आणि राजकीय घडामोडींना वेग आला. अखेर बोरिस जॉन्सन यांना पीएम पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. यामुळे बोरिस जॉन्सन ऋषी सुनक पीएम होऊ नये यासाठी प्रयत्न करत असल्याचे वृत्त आहे. अंतिम टप्प्यात कंझर्व्हेटिव्ह पार्टीकडून ऋषी सुनक यांना किती पाठिंबा मिळू शकेल याविषयी राजकीय अभ्यासकांमध्ये मतभिन्नता दिसत आहे.

कोण आहेत ऋषी सुनक?

इंग्लंडचे माजी अर्थमंत्री आणि इन्फोसिसचे संस्थापक नारायणमूर्ती यांचे जावई आहेत ऋषी सुनक. ब्रेक्झिट आणि कोरोना संकट या दोन कारणांमुळे मंदावलेल्या इंग्लंडच्या अर्थचक्राला गती देण्यासाठी ऋषी सुनक यांनी अर्थमंत्री म्हणून अनेक निर्णय घेतले होते. ते ४२ वर्षांचे आहेत आणि पीएम पदासाठी चर्चेत आहेत. पण सुनक यांना अर्थमंत्री असताना पीएम बोरिस जॉन्सन यांचा पाठिंबा होता आणि सुनक यांच्या निर्णयांना पीएम जॉन्सन यांच्याकडूनच संमती मिळत होती. मात्र सुनक यांनी राजीनामा दिल्यानंतर निर्माण झालेल्या स्थितीमुळे जॉन्सन आणि सुनक यांच्यात राजकीय कारणाने दरी निर्माण झाल्याचे चित्र आहे. या परिस्थितीत जॉन्सन समर्थक आणि सत्ताधारी पक्षातील अनेक जण सुनक यांना पाठिंबा देणार की नाही यावबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे.

सत्ताधारी कंझर्व्हेटिव्ह पक्षाचा नवा नेता निवडण्यासाठी ऑक्टोबर २०२२ मध्ये एक परिषद होणार आहे. या परिषदेतच पीएमपदाच्या नेत्याची निवड होईल असे चित्र आहे. 

...म्हणून बोरिस जॉन्सन यांनी दिला राजीनामा

जून २०२२ मध्ये बोरिस जॉन्सन सरकारने बहुमत चाचणीचा अडथळा पार केला होता. जॉन्सन सरकारला २११ जणांचे समर्थन मिळाले होते तर १४८ जणांनी विरोध केला होता. बहुमताची चाचणी पार केल्यामुळे सरकार सुरक्षित आहे अशी चर्चा होती. पण जॉन्सन यांनी महत्त्वाची जबाबदारी दिलेल्या एका खासदारावर लैंगिक शोषणाचे आरोप झाले. गंभीर आरोप होऊनही संबंधित खासदाराचा बोरिस जॉन्सन यांनी  बचाव केला. यामुळेच परिस्थिती बिघडली. धडाधड मंत्र्यांनी राजीनामे सादर केले. तीन दिवसांत जॉन्सन यांच्या मंत्रिमंडळातील ४० सदस्यांनी राजीनामे दिले. राजीनामा देणाऱ्यांमध्ये ऋषी सुनक यांचाही समावेश होता. वाढत्या दबावाला सहन करणे अशक्य झाल्यामुळे अखेर बोरिस जॉन्सन यांनी इंग्लंडच्या पीएम पदाचा राजीनामा दिला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी