Ukraine War: सनफ्लॉवर ऑइल द्या अन् आमच्याकडून बीअर घ्या, जर्मनीमधल्या पब्जची शक्कल, का आहे ही स्कीम

रशिया आणि युक्रेमधील युद्धामुळे जगातील बाजारावर परिणाम होत आहे. महागाई वाढू लागली असून या युद्धामुळे अनेक देशांना इंधन दरवाढीला सामोरे जावे लागत आहे. जर्मनी देशात तर खाद्यतेलाची टंचाई निर्माण झाली असून या समस्येवर मात करण्यासाठी बर्लीन येथील एका पब चालकाने जबरदस्त शक्कल लढवली आहे

Give sunflower oil and take beer from us; This is the scheme
सनफ्लॉवर ऑइल द्या अन् आमच्याकडून बीअर घ्या; काय आहे ही स्कीम  |  फोटो सौजन्य: Times Now

नवी दिल्ली : रशिया आणि युक्रेमधील युद्धामुळे जगातील बाजारावर परिणाम होत आहे. महागाई वाढू लागली असून या युद्धामुळे अनेक देशांना इंधन दरवाढीला सामोरे जावे लागत आहे. जर्मनी देशात तर खाद्यतेलाची टंचाई निर्माण झाली असून या समस्येवर मात करण्यासाठी बर्लीन येथील एका पब चालकाने जबरदस्त शक्कल लढवली आहे. बीअर घेण्यासाठी ग्राहकांकडून पैसे न घेता या पब मालक सनफ्लॉअरचं खाद्य तेल घेत आहे. याबाबतचे सविस्तर वृत्त Reuters या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने दिले आहे.

का सुरू केली अशी भन्नाट स्कीम 

जागतिक पातळीवरील सूर्यफुल तेलाच्या निर्यातीमध्ये रशिया आणि युक्रेन या देशांचा वाटा ८० टक्के आहे. मात्र मागील काही महिन्यांपासून या दोन देशांमध्ये युद्ध सुरु आहे. परिणामी सूर्यफूल तेलाची निर्यात खोळंबली आहे. याचा फटका जर्मनीला बसला आहे. या देशात सूर्यफुल तेलाची आयात कमी झाल्यामुळे येथे खाद्यतेल टंचाई निर्माण झाली आहे. यालाच उपाय म्हणून म्युनिक येथील एका पबमध्ये बिअरच्या बदल्यात चक्क सूर्यफुलाचं तेल घेण्यात येत आहे. येथे सूर्यफुल तेलाच्या बदल्यात समप्रमाणात बिअर दिली जात आहे.

पबने राबवलेल्या या नामी युक्तीला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. जर्मनीमध्ये एका बिअरची किंमत साधारण ७ युरो आहे. तर एक लिटर सूर्यफुलाची किंमत साधारण ४.५ युरो आहे. त्यामुळे ग्राहकांनादेखील ही ऑफर चांगली आणि आकर्षक वाटत आहे. आतापर्यंत या पबला ग्राहकांनी बिअरच्या बदल्यात जवळपास ४०० लीटर सूर्यफुलाचे तेल दिले आहे.

काय म्हणाले पब व्यवस्थापक 

या खास ऑफरबद्दल पबचे व्यवस्थापक एरिक हॉफमॅन म्हणाले की, “खाद्यतेलाची खूप टंचाई निर्माण झाली आहे. ३० लीटर खाद्यतेल हवे असल्यास तुम्हाला फक्त १५ लिटर मिळते. त्यामुळे आम्हाला अडचणी येतात. यावर काहीतरी उपाय शोधणे गरजेचे होते. म्हणूनच आम्हाला ही कल्पना सूचली,” असे एरिक हॉफमॅन यांनी सांगितले.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी