Atiq Ahmed son encounter: उत्तरप्रदेशातील गँगस्टर अतीकचा मुलगा असदचा एन्काऊंटर

mafia-turned-politician Atiq Ahmed son Asad killed in an encounter: उमेश पाल हत्याकंडातील आरोपी अतीक अहमद याच्या मुलाचा एन्काऊंटर करण्यात आला आहे. 

Umesh Pal murder case accused Atiq Ahmed son asad encounter in jhansi watch video
Atiq Ahmed son encounter: उत्तरप्रदेशातील गँगस्टर अतीकचा मुलगा असदचा एन्काऊंटर  |  फोटो सौजन्य: PTI
थोडं पण कामाचं
  • यूपीमधील गँगस्टर अतीकच्या मुलाचा एन्काऊंटर
  • झाशीमध्ये करण्यात आला एन्काऊंटर
  • उमेश पाल केसमधील आरोपी अतीकच्या मुलाचा एन्काऊंटर

Asad Ahmed News: उमेश पाल हत्याकांडातील (Umesh Pal murder case) फरार माफिया अतीक अहमद (Atiq Ahmed) याचा मुलगा असद याचा एन्काऊंटर (Asad encounter) करण्यात आला आहे. असद याच्यासोबत त्याचा आणखी एक सहकारी अशा दोघांचा उत्तरप्रदेश एसटीएफ (UP STF)ने एन्काऊंटर केला आहे.

दोघांवरही पाच लाख रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं. झाशीमध्ये हा एन्काऊंटर करण्यात आला आहे. उत्तरप्रदेशातील टास्क फोर्सने ही कारवाई केली आहे. एसटीएफने दावा केला आहे की, या दोघांकडून विदेशी शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.

हे पण वाचा : ...म्हणून विवाहबाह्य संबंध जास्त काळ टिकतात

या एन्काऊंटर प्रकरणात उत्तरप्रदेश पोलिसांनी माहिती दिली की, अतीक अहमद याचा मुलगा असद आणि मकसूदनचा मुलगा गुलाम हे दोघेही प्रयागराज येथील उमेश पाल हत्याकांड प्रकरणात वॉन्टेड होते. या दोन्ही आरोपींवर पाच-पाच लाख रुपयांचं बक्षीस ठेवण्यात आलं होतं. झाशीमध्ये डीएसपी नवेंदु आणि डीएसपी विमल यांच्या नेतृत्वात उत्तरप्रदेश एसटीएफच्या टीमने एन्काऊंटर केला. चकमकी दरम्यान हे दोघेही मारले गेले.

हे पण वाचा : गर्लफ्रेंडसमोर चुकूनही बोलू नका या 9 गोष्टी

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या एन्काऊंटरनंतर प्रतिक्रिया देताना उत्तरप्रदेश एसटीएफ टीमचं कौतुक केलं आहे. दरम्यान, या एन्काऊंटरनंतर कायदा आणि सुव्यवस्थेच्या संदर्भात एक महत्त्वाची बैठक बोलवण्यात आली आहे. या एन्काऊंटर प्रकरणी मुख्यमंत्र्यांकडे एक रिपोर्ट सादर करण्यात आला आहे.

हे पण वाचा : ...म्हणून काही मुलींना बॉयफ्रेंड मिळत नाही

24 फेब्रुवारी रोजी उत्तरप्रदेशातील प्रयागराज येथे उमेश पाल यांची हत्या करण्यात आली होती. भरदिवसा त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. या प्रकरणात अतीक अहमद हा फरार होता आणि त्याच्यावर पाच लाख रुपयांचं बक्षीसही जाहीर करण्यात आलं होतं.

कोण आहे असद अहमद? (Who is Asad Ahmed)

उत्तरप्रदेशातील उमेश पाल हत्याकांडातील मुख्य आरोपी अतीक अहमदचा मुलगा
उमेश पालवर गोळ्या झाडल्याचा असदवर आरोप
हल्ल्या प्रकरणात वाँटेड असल्यानं पोलिसांकडून असदचा शोध सुरू होता
असदच्या डोक्यावर 5 लाखांचं बक्षीसही जाहीर करण्यात आलं होतं

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी