तालिबानला धक्का, अफगाणिस्तानमध्ये 'आयसिस-के'चा धुमाकूळ

UN envoy says islamic state now present in all afghanistan provinces तालिबानच्या हातून अफगाणिस्तान निसटत आहे. अफगाणिस्तानच्या सर्व प्रांतांमध्ये कमी-जास्त प्रमाणात 'आयसिस-के'चे (Islamic State – Khorasan) दहशतवादी धुमाकूळ घालत आहेत.

UN envoy says islamic state now present in all afghanistan provinces
तालिबानला धक्का, अफगाणिस्तानमध्ये 'आयसिस-के'चा धुमाकूळ 
थोडं पण कामाचं
  • तालिबानला धक्का, अफगाणिस्तानमध्ये 'आयसिस-के'चा धुमाकूळ
  • 'आयसिस-के' म्हणजेच इस्लामिक स्टेट खोरासान प्रॉव्हिन्स अर्थात 'आयसिस-केपी'
  • अमेरिकेच्या माघारीनंतर 'आयसिस-के' वेगाने अफगाणिस्तानमध्ये पाय पसरत आहे

UN envoy says islamic state now present in all afghanistan provinces काबुल: अफगाणिस्तानमधील लोकशाही पद्धतीने निवडून आलेले सरकार शस्त्रांच्या जोरावर हटवून देशाचा ताबा घेणाऱ्या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी तालिबानला धक्का बसू लागला आहे. तालिबानच्या हातून अफगाणिस्तान निसटत आहे. अफगाणिस्तानच्या सर्व प्रांतांमध्ये कमी-जास्त प्रमाणात 'आयसिस-के'चे (Islamic State – Khorasan) दहशतवादी धुमाकूळ घालत आहेत. यामुळे आशिया खंडातील देशांना नव्या दहशतवाद्यांच्या त्रासाला सामोरे जावे लागण्याचा धोका वाढला आहे.

'आयसिस-के' म्हणजेच इस्लामिक स्टेट खोरासान प्रॉव्हिन्स अर्थात 'आयसिस-केपी' आहे. मध्य पूर्व आशियात सक्रीय असलेल्या 'आयसिस' या दहशतवादी संघटनेशी संलग्न असलेली 'आयसिस-के' ही संघटना २०१५ मध्ये अस्तित्वात आली. संयुक्त राष्ट्रांच्या प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तानच्या सर्व म्हणजेच ३४ प्रांतांमध्ये कमी-जास्त प्रमाणात 'आयसिस-के'चे दहशतवादी धुमाकूळ घालत आहेत.

अमेरिकेच्या माघारीनंतर 'आयसिस-के' वेगाने अफगाणिस्तानमध्ये पाय पसरत आहे. अफगाणिस्तानमध्ये यंदाच्या वर्षात (२०२१) आतापर्यंत ३३४ घातपात एकट्या 'आयसिस-के'ने केले आहेत. याआधी २०२० मध्ये 'आयसिस-के'ने अफगाणिस्तानमध्ये ६० घातपात केले होते. 

तालिबान आधीचे लोकशाहीप्रधान सरकार, अमेरिका, नाटो संघटनेतील सदस्य देश आणि भारत यांचे समर्थन करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांची हत्या करण्यात गुंतला आहे. या उलट 'आयसिस-के' दहशत बसवून स्वतःचे प्रभावक्षेत्र वाढवत आहे. या वाढत्या हिंसेमुळे अफगाणिस्तानमधील सामान्यांचे, महिला आणि मुलांचे प्रचंड हाल होत आहेत. 

आर्थिक आणि सामाजिक समस्यांचा गुंता दिवसागणिक सोडवणे कठीण झाले आहे. परिस्थिती बिकट होत आहे. अफगाणिस्तानमध्ये अन्न, पाणी, औषधे यांची टंचाई निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे. दहशतवादी कोणत्याही संघटनेचे असले तरी त्यांचा भर कमी-जास्त प्रमाणात मानवी तस्करी, अंमली पदार्थांची तस्करी, शस्त्रांची तस्करी यावरच आहे. यामुळे अफगाणिस्तान समोरच्या संकटांचे प्रमाण वाढत आहे. अफगाणिस्तानमधील समस्यांचा फटका शेजारी देशांनाही बसू लागला आहे. या त्रासाची तीव्रता भविष्यात आणखी वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी