महिलेवर वयाच्या चौथ्या वर्षापासून बलात्कार, अनेकदा केला गर्भपात 

Rape Case: साधारण ३८ वर्षापूर्वीच्या बलात्कार प्रकरणी एका महिलेने आपल्या मामाला कोर्टात खेचलं आहे. वयाच्या चौथ्या वर्षी तिच्यावर करण्यात आलेल्या बलात्कारप्रकरणी आता कोर्टात खटला सुरु आहे.

uncle was raping 40 years old woman since her age of 4 
महिलेवर वयाच्या चौथ्या वर्षापासून बलात्कार, अनेकदा केला गर्भपात (प्रातिनिधिक फोटो)  |  फोटो सौजन्य: Representative Image

थोडं पण कामाचं

  • १९८१ साली ४ वर्षाच्या मुलीवर करण्यात आला होता बलात्कार 
  • पीडित मुलगी दहावीत जाईपर्यंत तिचा तीन वेळेस करण्यात आला होता गर्भपात 
  • २०१६ साली पीडित महिलेने दाखल केली मामा विरोधात पोलिसात तक्रार

नवी दिल्ली: ४० वर्षाच्या एका महिलेने अनेक वर्ष शारीरिक अत्याचार सहन केल्यानंतर आता आपल्या मामाला अखेर कोर्टात खेचलं आहे. वयाच्या चौथ्या वर्षापासूनच पीडितेवर बलात्कार केला जात होता. जेव्हा पीडिता दहावीत गेली तोवर तिचा तीन वेळा गर्भपात देखील करण्यात आला होता. महिलेने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, १९८१ मध्ये पहिल्यांदा तिच्यावर बलात्कार करण्यात आला होता. 

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश उमेद सिंह ग्रेवाल यांनी याप्रकरणी असं म्हटलं आहे की, बलात्कार आणि धमकीचा कथित गुन्हा दाखल असून आरोपी पीडित महिलेच्या सावत्र बहिणीचा पती आहे. २०१६ मध्ये पहिल्यांदाच महिलेने याप्रकरणी तक्रार दाखल केली होती.

पीडित महिलेने दिलेल्या माहितीनुसार, २०१४ मध्ये तिचा घटस्फोट झाला होता. त्यानंतर आरोपी पीडित महिलेला शारीरिक संबंध ठेवण्यासाठी सतत त्रास देत होता. याबाबत जेव्हा पीडितेने आपल्या आई आणि कुटुंबातील इतर सदस्यांना याबाबत सांगितलं तेव्हा त्यांनी तिला कोणतीही मदत केली. इतकंच नव्हे तर तिने याबाबत तक्रार करु नये असंही बजावण्यात आलं. यासोबतच तिने याबाबत कुठेही वाच्यता करु नये असा दमही तिला भरण्यात आला होता. 

दरम्यान, पीडितेच्या सावत्र बहिणीशी आरोपीचं लग्न झाल्याने आरोपी अनेकदा पीडितेच्या घरी येऊन तिला त्रास देऊ लागला. २०१६ मध्ये महिलेने याप्रकरणी तक्रार दाखल केली. त्यानंतर काही महिन्यांनी महिलेच्या आईचं निधन झालं. पण यावेळी पीडित महिलेला कुटुंबीयांनी आईचं अंतिम दर्शन देखील घेऊ दिलं नाही. यावेळी तिच्यासमोर अशी अटही ठेवण्यात आली होती की, तिला आरोपीसोबत तडजोड करावी लागेल. 

याप्रकरणी पीडित महिलेने असाही आरोप केला आहे की, आरोपी आणि त्याच्या मुलांनी तिला जीवे मारण्याची धमकीही दिली आहे. या प्रकरणाची आता कोर्टाने देखील गंभीर दखल घेतली असून सध्या कोर्टामध्ये सुनावणी सुरु आहे. त्यामुळे आता आरोपी मामा कायद्याच्या कचाट्यात अडकला असून आता त्याला लवकरच शिक्षा देखील सुनावली जाईल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...