Washington Square Shocking Fact : या प्रसिद्ध उद्यानाखाली पुरलेले आहेत 20 हजारांहून अधिक मृतदेह...जगातील भुताटकीच्या जागांमध्ये समावेश

Washington Square : न्यूयॉर्कमधील वॉशिंग्टन स्क्वेअर हे सर्वात गजबजलेले उद्यान आहे. इथे लोकांची कायम वर्दळ असते. फक्त स्थानिक लोकच नाही तर जगभरातील पर्यटकदेखील या उद्यानाला भेट देतात. रोषणाई, बाहेरची सजावट आणि झाडे आणि झाडे लोकांना आकर्षित करतात. मात्र एरवी आकर्षक वाटणाऱ्या या उद्योनामागचे सत्य ऐकून तुम्हाला धक्का बसेल.

Washington Square
वॉशिंग्टन स्क्वेअर 
थोडं पण कामाचं
  • वॉशिंग्टन स्क्वेअर हे सर्वात गजबजलेले उद्यान
  • वॉशिंग्टन स्क्वेअरविषयी अनेक धक्कादायक वंद्यता
  • उद्यानाखाली आहेत 20 हजार मृतदेह

Famous Park with dead bodies : न्यूयॉर्क : अनेकदा एखाद्या प्रसिद्ध किंवा लोकप्रिय ठिकाणामागची पार्श्वभूमी किंवा काही सत्य हे अत्यंत धक्कादायक असते. असेच काहीसे वॉशिंग्टन स्क्वेअर या जगप्रसिद्ध उद्यानाच्या बाबतीत आहे. न्यूयॉर्कमधील वॉशिंग्टन स्क्वेअर हे सर्वात गजबजलेले उद्यान आहे. इथे लोकांची कायम वर्दळ असते. फक्त स्थानिक लोकच नाही तर जगभरातील पर्यटकदेखील या उद्यानाला भेट देतात. रोषणाई, बाहेरची सजावट आणि झाडे आणि झाडे लोकांना आकर्षित करतात. मात्र एरवी आकर्षक वाटणाऱ्या या उद्योनामागचे सत्य ऐकून तुम्हाला धक्का बसेल. हे उद्यान चक्क स्मशानभूमीच्या वर बांधलेले आहे. येथे हजारो मृतदेह पुरण्यात आले. गरीब, असहाय्य आणि बेघर लोकांच्या मृतदेहांना पुरण्यात आलेली ही जागा होती. वॉशिंग्टन स्क्वेअरबाबतची धक्कादायक माहिती जाणून घेऊया. (Under Washington Square more than 20,000 dead bodies are buried)

अधिक वाचा : Landslide At Jammu: जलविद्युत प्रकल्पात भूस्खलन; चार मजूर ठार, 6 जखमी

वॉशिंग्टन स्क्वेअरचे धक्कादायक सत्य

कार्मेन निग्रो यांनी न्यूयॉर्क पब्लिक लायब्ररीसाठी लिहिलेल्या लेखात वॉशिंग्टन स्क्वेअर उद्यानाविषयीचा धक्कादायक खुलासा केला आहे. ही जागा आधी एक स्मशानभूमी होती. 1797 ते 1820 या काळात या जागेचा उपयोग फक्त स्मशानभूमी म्हणून केला जात होता. त्यानंतर ही जागा स्वस्तात मिळाली, म्हणून शहर प्रशासनाने ही संपूर्ण जमीन अवघ्या 4500 डॉलरमध्ये विकत घेतली. तेव्हापासून या उद्यानाविषयीच्या अनेक कथा प्रचलित आहेत. त्याला आता जवळपास 200 वर्षे होऊन गेली. या उद्यानाबद्दल अनेक कथाही चर्चेत असतात. या स्मशानभूमीच्या पार्श्वभूमीमुळेच तिथे अनेकांनी तथाकथित भूत पाहिल्याचा दावा केला आहे.

अधिक वाचा : Gujarat Election 2022 : या आठवड्यात गुजरात निवडणूक जाहीर होण्याची शक्यता, निवडणूक आयोग करणार घोषणा

भुताटकीचा दावा

एनवायसी घोस्ट्स नावाच्या संस्थेने दावा केला आहे की अनेकदा अचानक तीव्र थंडी आणि नंतर उष्णता जाणवते. या उद्यानात याशिवाय धुक्यात विचित्र आकार दिसतात. अर्थातच या गोष्टींबाबत कोणतीही ठोस माहिती किंवा पुरावा मात्र उपलब्ध नाही. NYC घोस्टनुसार ही जागा पछाडलेली आहे. तिथे अनेक शक्तींचा वास आहे. 

अधिक वाचा - Haldi Water For Weight Loss: वजन कमी करण्यासाठी प्या हळदीचे पाणी, आठवड्याभरात पहा फरक

उद्योनाच्या खोदकामात सांगाडे

1797 नंतर न्यूयॉर्कमध्ये, सुमारे 6 वर्षे, पिवळ्या तापामुळे अनेक मृत्यू झाले. परिस्थिती अशी होती की लोकांना दफन करायला जागा मिळत नव्हती. त्यामुळेच या जागी हजारो मृतदेह पुरण्यात आले होते. न्यूयॉर्क पोस्टचे संस्थापक अलेक्झांडर हॅमिल्टन यांनी स्मशानभूमी विकसित होत असल्याचे कळल्यावर आक्षेप घेतला. याबाबत अनेकांनी नगर प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या. या उद्योनाचे खोदकाम सुरू झाल्यावर एकामागून एक मृतदेहांचे अवशेष बाहेर येऊ लागले.

उद्यानाच्या वायव्य प्रवेशद्वाराजवळील झाड 350 वर्षे जुने असल्याचे अनेकांचे मत आहे. या झाडाचाच वापर करून गुन्हेगारांना फाशीची शिक्षा देण्यात आली. 1825 मध्ये या उद्यानाला स्मशानभूमीऐवजी सार्वजनिक उद्यान म्हणून घोषित करण्यात आले. येथे उत्खनन केले असता सांगाडा सापडला. 2013 मध्येही उद्यानाच्या एका कोपऱ्यात दोन सांगाडे सापडले होते. या सांगड्यांच्या सापडण्यामुळे इथे कायम वेगवेगळ्या कथांना ऊत येत असतो. या जागेविषयी त्यामुळे एकप्रकारचे गूढ निर्माण झाले आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी