Dawood Ibrahim second marriage: अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याने दुसरं लग्न केली असल्याची माहिती समोर आली आहे. दाऊद इब्राहिमची दुसरी पत्नी पाकिस्तानची निवासी असून पठाण कुटुंबातील आहे. हा खुलासा दाऊद इब्राहिमचा भाचा अलिशाह पारकर यानेच केला आहे. (Underworld don dawood Ibrahm marries second time Haseena Parkar son Alishah tells NIA read in marathi)
अलिशाह पारकर हा दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकर हिचा मुलगा आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) ने अंडरवर्ल्ड टेरर फंडिंग प्रकरणात अलिशह याची चौकशी केली त्यावेळी त्याने हा खुलासा केला आहे. एनआयएने आपल्या चार्जशीटममध्ये अलिशाहचा जबाब एक साक्षीदार म्हणून नोंदवला आहे.
हे पण वाचा : शिळे अन्न खाल्ल्यावर काय होते?
अलिशाह याने एनआयएला दिलेल्या जबाबात म्हटले की, दाऊद इब्राहिमने अलिशाहला सांगितले की, त्याने दुसरे लग्न केलं आहे. दुसऱ्या लग्नासाठी त्याने आपली पहिली पत्नी महजबीन हिला तलाक दिला आहे. मात्र, तलाक देण्याच्या दाव्यात तथ्य नसल्याचं म्हटलं जात आहे.
हे पण वाचा : मुळ्याची पाने खा अन् आजार पळवा
दाऊद इब्राहिमची पत्नी महजबीन हिच्यासोबत जुलै 2022 मध्ये दुबईत भेट झाली होती. त्यावेळी दुसऱ्या लग्नाबाबत त्यांना माहिती मिळाली. अलिशाह याच्या मते, दाऊद हा थेट कोणाच्या संपर्कात नसतो. मात्र, त्याची पत्नी महजबीन प्रत्येक सण-उत्सवात व्हॉट्सअप कॉलच्या माध्यमातून भारतात राहणाऱ्या नातेवाईकांसोबत संपर्क करते आणि सर्वांची विचारपूस करते.
हे पण वाचा : तुम्हालाही खोकला झालाय? असू शकतो कोरोना
अलिशाह याने दाऊदच्या पाकिस्तानातील नवीन ठिकाणांबाबतही खुलासा केला. त्याच्या मते, दाऊदने आपलं जुनं ठिकाण बदललं आहे. आता दाऊद हा कराचीतील अब्दुला गाजी बाबा दरगाहच्या मागे रहीम फाकी जवळ डिफेन्स परिसरात राहतो.