भारतातील दुर्लक्षित ऐतिहासिक वास्तू

Unheard Historical Places In India : आज आम्ही तुम्हाला निवडक अशा ऐतिहासिक वास्तूंची माहिती देणार आहोत ज्या आधी महत्त्वाच्या वास्तू होत्या पण आता कालौघात त्या दुर्लक्षित आहेत किंवा त्यांचे महत्त्व कमी झाले आहे.

Unheard Historical Places In India, India, Historical Places
भारतातील दुर्लक्षित ऐतिहासिक वास्तू 
थोडं पण कामाचं
  • भारतातील दुर्लक्षित ऐतिहासिक वास्तू
  • बिदरचा किल्ला
  • सरखेज रोजा

Unheard Historical Places In India : विविधता हे भारतीय संस्कृतीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे. भारतावर अनेकांनी आक्रमण केले. काहींचे आक्रमण स्थानिकांनी परतविले तर काही जणांनी भारताच्या वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या कालावधीत राज्य केले. ज्या आक्रमकांनी भारतात राज्य करणे शक्य झाले अशा आक्रमकांनी आपले अस्तित्व दाखविण्यासाठी विविध वास्तूंची निर्मिती केली. यापैकी काही वास्तू पूर्णपणे नव्याने बांधण्यात आल्या तर काही वास्तू या जुन्या वास्तू तोडून त्यांच्या जागेवर बांधण्यात आल्या. यामुळे भारतात अनेक ऐतिहासिक अशा वास्तूंची निर्मिती झाली. यापैकी अनेक वास्तू कालौघात नष्ट झाल्या किंवा नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. इतिहासतज्ज्ञांच्या मदतीने वेळीच या वास्तूंचे रक्षण केले नाही तर एक मोठा इतिहास नष्ट होण्याची शक्यता आहे. आज आम्ही तुम्हाला निवडक अशा ऐतिहासिक वास्तूंची माहिती देणार आहोत ज्या आधी महत्त्वाच्या वास्तू होत्या पण आता कालौघात त्या दुर्लक्षित आहेत किंवा त्यांचे महत्त्व कमी झाले आहे. (सर्व फोटो : साभार wikimedia) 

बिदरचा किल्ला : सुलतान अल्लाउद्दीन बहमनने पंधराव्या शतकात बांधलेला हा किल्ला. गुलबर्गा येथून राजधानी बिदरला स्थलांतरित करण्यासाठी हा किल्ला बांधण्यात आला. हे बहामनी काळातले स्मारक आहे.

सरखेज रोजा : अमदाबाद येथे सरखेज रोजा नावाची एक मशिद आहे. सूफी संत शेख अहमद गंज बख्श यांच्या काळात या वास्तूला महत्त्व होते. 

सलीम सिंहची हवेली : अस्तित्वात असलेल्या हवेलीच्या आधारे जैसलमेर येथे १८१५ मध्ये सलीम सिंहच्या हवेलीचा पाया रचण्या आला. या इमारतीत ३८ बाल्कनी आहेत. प्रत्येक बाल्कनीचे डिझाइन वेगवेगळे आहे

मार्बल पॅलेस : कोलकातामध्ये राजेंद्र मालिक नावाच्या राजाने या वास्तूची निर्मिती केली. बंगाली वास्तूकलेचा एक उत्तम नमुना असे या वास्तूला म्हणता येईल. पांढऱ्या दगडाचा वापर करून तयार केलेल्या या वास्तूसमोर सुंदर बाग आहे. आजही या वास्तूत राजघराण्याचे सदस्य वास्तव्यास आहेत. 

मलुटी मंदिर : झारखंडमधील मलुटी येथे ७० टेराकोटा मंदिर आहेत. बाज बसंत नावाच्या राजघराण्यातील सदस्यांनी या वास्तूंची निर्मिती केली. मंदिरात हिंदू महाकाव्यांतील प्रसंग चितारले आहेत.

काच महाल : आग्रा येथे अकबर बादशहाच्या मकबऱ्याजवळ चौकोनी काचमहाल आहे. इमारतीच्या भोवताली सुंदर बागा आहेत. इमारतीमध्ये चहूबाजूंना एकाचवेळी अनेक प्रतिबिंब पडतील अशी व्यवस्था आहे. ही एक मंत्रमुग्ध करणारी इमारत आहे. 

बोलगट्टी पॅलेस : केरळमध्ये असलेल्या बोलगट्टी पॅलेसची निर्मिती डच प्रशासकांनी केली. भारत सरकारच्या ताब्यात येण्याआधी या पॅलेसमध्ये एक श्रीमंत डच जमीनदार वास्तव्यास होता. पॅलेसच्या चहूबाजूंना बागा आहेत. पॅलेस समोर स्विमिंग टँक, आयुर्वेद केंद्र आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी