BUDGET 2020: केंद्रीय अर्थसंकल्प सादर, करदात्यांना दिलासा

अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज संसदेत 2020-21 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला आहे.लोकसभेची कार्यवाही ३ फेब्रुवारीपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. या अर्थसंकल्पात केंद्र सरकारनी करदात्यांना मोठा दिलासा आहे.

 Budget 2020
BUDGET 2020: केंद्रीय अर्थसंकल्प सादर, करदात्यांना दिलासा  |  फोटो सौजन्य: ANI

नवी दिल्लीः अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत 2020-21 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. जवळपास दोन तासांहून जास्तवेळ अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर  लोकसभेची कार्यवाही ३ फेब्रुवारीपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. या अर्थसंकल्पात केंद्र सरकारनी करदात्यांना मोठा दिलासा आहे. अर्थमंत्र्यांनी घोषणा केल्याप्रमाणे मागील वर्षीप्रमाणेच याहीवर्षी 2.5 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त आहे. देशातील शेतकऱ्यांचं उत्पन्न 2022 पर्यंत दुप्पट करण्याचं लक्ष्य केंद्र सरकारचं असल्याचं त्यांनी सांगितलं. शेतकऱ्यांसाठी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 16 सूत्री योजनेची घोषणा केली.

BUDGET 2020 LIVE Updates: 

 1. अर्थमंंत्री निर्माला सीतारामन यांच्याकडून केंद्रीय अर्थसंकल्प सादर
 2. मेक इन इंडियामुळे देशाला खूप फायदा झाला.
 3. शेअर बाजार ६५० अंकांच्या जवळपास कोसळला, अर्थसंकल्पानंतर शेअर बाजारात मोठी निराशा, अर्थसंकल्पानंतर शेअर बाजारात पडझड
 4. २.५ लाखापर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर नाही, २.५ ते ५ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर ५ टक्के कर, ५ ते ७.५ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर  १० टक्के कर 
 5. ५ ते ७.५० लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर आता १० टक्के कर, ७.५ ते १० लाखांवर १५ टक्के कर. 
 6. १० ते १२.५ लाखांवर २० टक्के आयकर. १२.५ ते १५ लाखांवर २५ टक्के आयकर, १५ लाखांच्या पुढे ३० टक्के आयकर,
 7. १० ते १२  लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर आता २० टक्के कर, केंद्रीय अर्थमंत्र्यांकडून करदात्यांना दिलासा.
 8. नव्या कंपन्यांसाठी कॉर्पोरेट टॅक्स 15 टक्के, 2014 नंतर आयकर रचनेत मोठे बदल  
 9. अर्थमंत्री आता करणार टॅक्सची घोषणा करणार
 10. जीडीपीमध्ये किरकोळ वाढ शक्य, वित्तीय तूट ३.८ टक्के राहण्याचा अंदाज
 11. २०१९-२० मध्ये सरकारी खर्च २६.१९ लाख कोटी, येत्या आर्थिक वर्षासाठी सरकारचं मोठं उद्दिष्ट्य
 12. सरकारचं १० टक्के आर्थिक दर विकासाचं लक्ष, २०२०-२१ साठी १० टक्के जीडीपीचं लक्ष्य
 13. १५ व्या वित्त आयोगाचा पहिला अहवाल आला
 14. सरकार LIC चा एक मोठा हिस्सा विकणार, सरकार एलआयसी चा IPO आणणार, एलआयसीमध्ये सरकार निर्गुतवणूक करणार, आयडीबीआय मधलाही हिस्सा सरकार विकणार
 15. जी २० देशांच्या यजमानपदासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद करणार. जी २० परिषदेचे भारतात आयोजन
 16. बँकाच्या भरती प्रक्रियेत सुधारणा करणार. नॉन गॅझेटेड पोस्टसाठी नॅशनल रिक्रुटमेंट एजन्सीची निर्मिती. पर्सनल बँकिंगची सुरक्षा वाढवली
 17. १० सरकारी बँकांना बदलून ४ बँका करणार, सरकारी बँकांसाठी ३.५० लाख कोटी दिले. खातेदारांचा पैसा बँकांत सुरक्षित, बँकेतील जमा पैशांवरील विमा वाढवणार. बँकेतील डिपॉझिटवर ५ लाखांची गॅरंटी
 18. खातेदारांना ५ लाखांपर्यतचा विमा, सध्या १ लाखांपर्यतची सरकारी हमी
 19. लोकांच्या मनातून टॅक्सची भीती घालवणार, व्यापाऱ्यांना टॅक्सचा त्रास होऊ देणार नाही. कर देणाऱ्यांची सरकार काळजी घेणार
 20. करदात्यांचा कसलाही छळ होणार नाही. प्रत्येक नागरिकावर आमचा विश्वास
 21. टॅक्स पेयर चार्टर आणणार, टॅक्स धारकांच्या अडचणी दूर करण्यासाठी योजना
 22. टॅक्स धारकांच्या अडचणी दूर करण्यासाठी योजना. राष्ट्रीय नोकरभरती संस्था स्थापन करणार. सर्व CAT संगणकाद्वारे घेतल्या जाणार
 23. कंपनी कायद्यामध्ये काही दुरूस्त्या करू, बँकांमधल्या नोकरभरतीत बदल होणार, 
 24. आरोग्य, संपन्नता, सुरक्षा याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना, भ्रष्टाचार मुक्त सरकार असल्याचा दावा
 25. ज्येष्ठ नागरिकांच्या योजनांस ९५००० कोटी, कार्बन सोडणारे थर्मल प्लांट बंद करणार, पर्यटन विभागासाठी २५०० कोटी रूपये,वाढतं प्रदूषण रोखण्यासाठी सरकारचा भर. स्वच्छ हवेसाठी ४४०० कोटी रूपये
 26. अहमदाबादमध्ये समुद्री संग्रहालय उभारणार, संस्कृती रक्षणासाठी अभिमत विद्यापीठ. ५ पुरातत्व विभागाची स्थळांचा विशेष विकास. ४ संग्रहालयांचे नूतनीकरण करणार. झारखंडमध्ये आदिवासी म्युझियम तयार करणार
 27. रांचीमध्ये आदिवासी संग्रहालय स्थापन करू, राष्ट्रीय संस्कृती विद्यापीठास ३१५० कोटी. 
 28. २ हजार ५०० कोटी पर्यटन विकासासाठी. देशांतर्गत पर्यटन वाढविण्यासाठी सरकारवर भर देणार
 29. अंगणवाडी कर्मचारी स्मार्ट फोनने जोडले, शाळेत जाणाऱ्या मुलींची संख्या वाढली. पोषक आहार योजनांसाठी ३५ हजार. महिलांसाठी २८,६०० कोटींची तरतूद. पोषक आहारासाठी तब्बल ३५,६०० कोटी. ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगासाठी ९ हजार ५०० कोटींची तरतूद
 30. पोषण आहारासाठी ३५ हजार कोटींची तरतूद, महिलांच्या पोषण आहारावर सरकारचा भर. एससी आणि एसटी कल्याणासाठी ८५ हजार कोटी रुपयांची तरतूद करणार
 31. मुलांपेक्षा मुलींच्या शाळेत भरतीचे प्रमाण वाढले. महिलांच्या आरोग्यात सुधारणा. बालविवाहाचे प्रमाण कमी झाले. महिलांसाठी पोषण अभियानाचा मोठा लाभ झाला. 
 32. बेटी बचाव, बेटी पढाव योजनेला चांगला प्रतिसाद. महिलांच्या मुद्यांवरून कोणीही राजकारण करू नये
 33. स्टार्ट अपसाठी डिजीटल प्लॅटफॉर्म, भारत नेटसाठी ६ हजार कोटी रूपये
 34. वीजेची जुनी मीटर ३ वर्षात बदलणार, अक्षय्य ऊर्जेसाठी २२ हजार कोटी, तेल उत्पादनात खाजगी सहभाग वाढवणार. रेल्वेच्या रिकाम्या जागांवर सोलार प्लांट
 35. भारत नेटच्या माध्यमातून ग्रामीण भागात डिजीटल कनेक्टीव्हीट वाढविणार, ६ हजार कोटींची तरतूद करणार. डेटा पार्क उभारण्यावर केंद्र सरकारचा भर
 36. २०२४ पर्यंत ६ हजार किमीचे १२ महामार्ग, २०२४ पर्यंत १०० नवी विमानतळे
 37. पायाभूत सुविधांवर १०० लाख कोटी खर्चावर, वीज क्षेत्रासाठी २२ हजार कोटींची तरतूद. वाहतूक पायाभूत सुविधांसाठी १.७० लाख. भारत नेटद्वारे देश जोडणार, ६ हजार कोटी, १ लाख ग्रामपंचायती भारत नेटने जोडणार
 38. नॅशनल गॅस ग्रीड २७ हजार किलोपर्यंत वाढविणार. प्रत्येक गावात डिजीटल कनेक्टीव्हीटी पोहचविणार. १ लाख ग्रामपंचायतींपर्यंत ऑप्टिकल फायबर पोहचविणार
 39. घरात आता स्मार्ट मीटर बसविणार. अक्षय उर्जेसाठी २२ हजार कोटींची तरतूद. ३ वर्षात जुने मीटर बदलणार, रेल्वेमध्ये खाजगी 
 40. आणखी ५५० रेल्वे स्टेशनवर वायफाय, पीपीपी मॉडेलद्वारे ४ रेल्वे स्टेशनचा विकास, चेन्नई बंगलोरदरम्यान नवीन महामार्ग
 41. मुंबई अहमदाबाद दरम्यान जलद गाड्या सुरू करणार. देशात विमान प्रवास वाढविण्यावर भर देणार. उड्डाण योजनेतून १०० नव्या विमानतळांची उभारणी करणार
 42. तेजस एक्स्प्रेस सारख्या गाड्यांनी पर्यटन केंद्र जोडणार. ५५० रेल्वे स्टेशनवर वायफाय सिस्टीम लावणार. पीपीपी मॉडेलवर रेल्वे चालविणार. रेल्वेच्या खासगीकरणाची चाचणी.
 43. २७ हजार किमी रेल्वेमार्ग इलेक्ट्रीक बनवणार, रेल्वेमार्गालगत सौर ऊर्जा प्रकल्प बनवणार
 44. दिल्ली मुंबई एक्स्प्रेस वे २०२३ पर्यंत पूर्ण करणार. देशभरात ९ हजार किलोमीटरचा इकोनॉमिक कॉरिडोर करणार. २०१४ पर्यंत ६ लाख किमीचे रस्ते
 45. उद्योगांना २७ हजार ३०० कोटी रुपयांची तरतूद. गुंतवणूक सुलभ व्हावी यासाठी इव्हेस्टमेंट क्लिअरन्स सेलची निर्मिती करणार. पायाभूत सुविधांसाठी १०० लाख कोटींची तरतूद. २००० किलोमीटरचे सागरकिनारी रस्ते तयार करणार
 46. आरोग्य विभागासाठी ६९ हजार कोटी, ५ नवी स्मार्ट शहरे बनवणार, गुंतवणूक मंजुरीसाठी नवा कक्ष
 47. नव्या सरस्वती सिंधु युनिव्हर्सिटीची घोषणा, राष्ट्रीय पोलीस विद्यापीठाचीही घोषणा. राष्ट्रीय न्यावैधक विद्यापीठ स्थापन करणार, स्वच्छ भारतसाठी १२ हजार ३०० कोटी
 48. मोबाईल आणि इलेक्ट्रीक वस्तूंची भारतात निर्मिती व्हावी यासाठी प्रयत्न करणार, निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी नवीन निर्विक योजना. प्रत्येक जिल्ह्यात निर्यात केंद्र व्हावे ही अपेक्षा आहे. 
 49. वस्त्रोद्योगासाठी ४ वर्षात १४८० कोटी देणार, निर्विक नावाची नवी योजना लागू करणार, २७३०० कोटी वाणिज्य विभागासाठी तरतूद
 50. इलेक्ट्रॉनिक उत्पादन वाढीवर भर देणार, मोबाईल उत्पादन वाढीसाठी विशेष तरतूद. 
 51. सर्व जिल्ह्यांत स्वस्त औषध केंद्रे, स्किल इंडियासाठी ३ हजार कोटींची तरतूद
 52. पीपीपी मॉडेलद्वारे नव्या ५ शहरांची निर्मिती करणार- अर्थमंत्री
 53. ९९ हजार ३०० कोटींची शिक्षण क्षेत्रासाठी तरतूद. कौशल्य विकासासाठी ३ हजार कोटी. उद्योजकता हे भारताचे बलस्थान आहे, तरुणांना मोठ्या संधी देणार
 54. शिक्षण क्षेत्रातही परकीय गुंतवणूक, लवकरच नवे शैक्षणिक धोरण आखणार, शिक्षण क्षेत्रासाठी ९९३०० कोटींची तरतूद, ३ हजार कौशल्यविकास केंद्र बनवणार.
 55. स्थानिक स्वराज संस्थानी नव्या अभियंत्यांना संधी द्यावी. नवीन वैद्यकीय महाविद्यालयांची निर्मिती करणार. डिप्लोमासाठी २०२१ पर्यंत नव्या संस्था उभारू. स्कील इंडियासाठी ३ हजार कोटींची तरतूद करणार. गरीब विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन शिक्षणाची योजना. नॅशनल फॉरेन्सिक सायन्स विद्यापीठाची निर्मिती करणार
 56. शैक्षणिक धोरणासाठी २ लाख सूचना आल्या. शैक्षणिक धोरणात राज्ये, खासदारांचा सहभाग
 57. जिल्हा स्तरावर नवे मेडिकल कॉलेज, डॉक्टरांची संख्या वाढवण्यावर भर देणार, नॅशनल फॉरेन्सिक विद्यापीठ स्थापन करणार
 58. डॉक्टरांची सध्या कमतरता आहे. पीपीपी मॉडेलद्वारे नवे मेडिकल कॉलेज
 59. शिक्षण क्षेत्रात एफडीआय सुरू करणार. विद्यार्थ्यांपर्यंत ऑनलाईन शिक्षण देण्याची सोय करणार. राष्ट्रीय पोलीस विद्यापीठाचा प्रस्ताव
 60. गरिबांसाठी ऑनलाइन पदवीपर्यतचे शिक्षण, गरिबांना दर्जेदार शिक्षण बहाल करणार, शैक्षणिक धोरणासाठी २ लाख सूचना आल्या. शैक्षणिक धोरणात राज्ये, खासदारांचा सहभाग, नव्या अभियंत्यांना १ वर्षांची इंटर्नशिप, शहरी स्थानिक स्वराज्य संस्थात इंटर्नशीप
 61. जल जीवन मिशनसाठी ३.६ लाख कोटी. सर्वांपर्यंत ऑनलाइन डीग्री प्रोग्राम सुरू करणार. परदेशी विद्यार्थ्यांसाठी स्टडी इन इंडिया योजना सुरू करणार
 62. स्वच्छ भारत योजनेसाठी १२ हजार ३०० कोटी रुपयांची तरतूद. शिक्षण क्षेत्राच्या विकासावर मोदी सरकारचा भर
 63. आरोग्य सेवेवसाठी ६९ हजार कोटींची तरतूद. मिशन इंद्रधनुष योजनेचा विस्तार, १२ आजारांसाठी मिशन इंद्रधनुष. नवी शिक्षण धोरण लवकरच घोषीत केले जाणार. मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीवर भर देणार
 64. ११२ जिल्ह्यांमध्ये आयुषमान रुग्णालयांची निर्मिती करणार, शेती, ग्रामीण विकासासाठी ३ लाख कोटी रुपयांची तरतूद,  पीपीपी मॉडेलद्वारे नव्या हॉस्पीटलची निर्मिती करणार
 65. पंचायत आणि ग्रामविकासासाठी मोठी. २.८३ लाख कोटी रूपयांची तरतूद. ग्रामविकासासाठी २.२३ लाख कोटी, २०२५ पर्यंत दुग्धउत्पादन दुप्पट करणार. नवी सागर मित्र योजना सुरू करणार
 66. टीबी हारे गा, देश जितेगा ही मोहिम सुरू करणार, २०२५ पर्यंत टीबीचा संपूर्ण नायनाट केला जाणार
 67. कोरडवाहू जमिनीवर सोलार प्लांट उभारणार, नाबार्डमार्फत कर्जपुरवठा वाढवणार
 68. शेतकऱ्यांसाठी १५ लाख कोटींच्या कर्जाची तरतूद.अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा
 69. दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी विशेष योजना. दूधाचे उत्पादन वाढीवर जादा लक्ष देणार, २०२५ पर्यंत दूध उत्पादन दुप्पट करू.  शेतकऱ्यांसाठी ऑर्गेनिक मार्केट उभारणार
 70. मासे उत्पादन २०० लाख टन पर्यंत वाढविण्याचे उद्दिष्ठ. किनारपट्टीच्या तरूणांसाठी सागरमित्र योजना
 71. जनावरांना होणारे रोग नष्ट करण्यासाठी प्रयत्न करणार, जिल्हा स्तरावर फळबागा वाढविण्यासाठी प्रयत्न करणार. शेती कर्जासाठी १५ लाख कोटींची तरतूद करणार. गाव स्तरावर गोदामांची निर्मीती करणार
 72. फलोत्पादनात ३.११ कोटी शेतकरी सहभागी, फलोत्पदनही १६ कलमी कार्यक्रमात, खास कृषीमालासाठी रेल्वे चालवणार, दूध, मांस, मच्छी वाहतुकीसाठी रेल्वे.
 73. १५ लाख कोटींची कृषी पत उपलब्ध करू, शेतकऱ्यांना वेअर हाऊस पुरवठा वाढवणार. 
 74. झिरो बजेट शेती सरकारचा भर, शेतकरी महिलांसाठी सरकारची विशेष योजना. पाणी टंचाई दूर करण्यासाठी सिंचन योजना
 75. फक्त ट्रेन नाही तर कृषी उडान योजना सुरू करणार, धनलक्ष्मीला धान्यलक्ष्मी करण्याचा प्रयत्न करणार
 76. महिला बचत गटांना बियाणे जपण्यासाठी बियाणे बँक सुरू करणार. किसान रेल्वे सुरू करणार, त्यामुळे शेती मालाची वाहतूक सुरूळीत होणार
 77. सेंद्रीय खते वापरण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहीत करणार, सौरउर्जेवर सौरपंप सुरू केले, आणखी १५ लाख शेतकऱ्यांना सौरपंप देणार. २० लाख शेतकऱ्यांना सौरपंप दिले आहेत. सेंद्रीय शेतीवर भर, कुसुम योजनेद्वारे शेतकऱ्यांना सोलरपंप देणार. रासायनिक खते वापरणे कमी करणार
 78. अन्नदाता उर्जादाता होण्यासाठी प्रयत्न, शेतीसाठी सौरउर्जा वापरण्यासाठी प्रोत्साहन देणार. शेतीमध्ये गुंतवणूक वाढविण्यावर भर. नापिक जमिनीवर सोलार प्लॉट बसविणार. पाण्याची कमतरता असलेल्या १०० जिल्ह्यांमध्ये काम करणार
 79. सौर ऊर्जेची क्षमता अजून वाढवू, १०० जिल्ह्यांतली पाणी समस्या सोडवली. १६ कृती कार्यक्रम बनवणार
 80. प्रधानमंत्री किसान योजनेमार्फत शेतकऱ्यांपर्यंत पैसे पोहचविले आहे. मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना मदत करावी लागणार. प्रत्येक राज्य सरकारची समन्वय साधून योजना मार्गी लागणार.
 81. विमा योजनांचा शेतकऱ्यांना मोठा लाभ, ६.११ कोटी शेतकऱ्यांना विम्याचा लाभ
 82. आरोग्य, शिक्षण आणि रोजगारावर सरकारचा भर, विमा योजनेतून शेतकऱ्यांना लाभ मिळतोय. कृषी, सिंचन आणि ग्रामीण भागावर भर. शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करण्यावर भर. २०२२ पर्यंत कृषी उत्पन्न दुप्पट करू. १५ लाख शेतकऱ्यांना सौरपंप पुरवले. १५ लाख शेतकऱ्यांना सौरपंप देऊ
 83. २००६-१६ दरम्यान मोठे दारिद्रयनिर्मुलन, २००६-१६ दरम्यान २.७१ कोटींची गरिबी हटली.
 84. केंद्र सरकारच्या कर बोजात ४८.७ टक्क्यांनी घट, २०१४ ला कराचा बोजा होता ५२.२ टक्के
 85. सबका साथ, सबका विकास वर सरकारचा अर्थसंकल्प- अर्थमंत्री
 86. एप्रिल 2020 जीएसटी आणखी सोपा होईल,  जीएसटीमुळे देशात कर एकात्मता
 87. डीजीटल गव्हर्नरच्या माध्यमातून अनेक गोष्टी सामन्यांपर्यंत पोहचविणार
 88. उत्तम प्रकारचे रोजगार, आरोग्य सेवा मिळाव्यात यासाठी सरकार झटत आहे. तरुणांना उद्योग निर्मितीसाठी प्रोत्साहन देणार आहे.प्रत्येकाच्या घरी स्वच्छ पाणी पोहचविणार- अर्थमंत्री
 89. जीएसटीमुळे करांचे जाळे संपुष्टात, १ एप्रिल २०२० पासून जीएसटीचं नवं स्वरूप, जीएसटीमुळे ग्राहकांना १ कोटींचा लाभ
 90. घरगुती खर्च ४ टक्क्यांनी कमी झाला आहे, महागाईला नियंत्रित ठेवण्यासाठी सरकारला यश आले आहे.एप्रिल २०२० मध्ये जीएसटीचे नवीन व्हर्जन येणार
 91. जीएसटीमुळे प्रत्येक कुटुंबाची बचत, जीएसटी मुळे ४ टक्के सरासरी प्रतिमाह बचत
 92. २७ कोटी भारतीय दारिद्र रेषेच्या खाली आले आहेत. युवकांना रोजगार देण्यावर प्राधान्य.
 93. महागाईचा दर ४.५ टक्के आहे. तरीही जीडीपीचा दर चांगला आहे. प्रत्येक माणसाचे आयुष्य सुखकर करण्यासाठी आम्ही झटणार आहोत.
 94. 1 एप्रिलपासून नवी विवरण प्रणाली लागू होणार. जगातील सर्वात मोठी पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे.
 95. 40 कोटी लोकं जीएसटीचा परतावा भरतात, 60 लाख नवे करदाते जोडले गेले.
 96. लोकांचं जगणं सुलभ करण्यासाठी कटिबद्ध- अर्थमंत्री
 97. अनेक योजनांमुळे ग्रामीण भागात लाभ होत आहे. आयुष्मान भारत सारख्या योजनांचा लाभ मिळतोय. 
 98. बँकांची स्थिती आता चांगली आहे, ६० लाख नवे करतदाते तयार झाले आहेत. देशातील बँकाची स्थिती उत्तम झाली आहे. 
 99. हे बजेट जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणार- अर्थमंत्री
 100. जीएसटीचं पाऊल ऐतिहासिक, वस्तू आणि सेवा करांची मोठी मदत होतेय. जीएसटी रेट कमी झाल्याने प्रत्येक घरातून ४ टक्के टॅक्स कमी झाला आहे.
 101. अरूण जेटली यांना वाहिली निर्मला सीतारामन यांनी श्रद्धांजली
 102. अर्थव्यवस्थेचा पाया मजबूत आहे. जनादेशानंतर आम्ही लोकांची सेवा करत आहोत.
 103. मे महिन्यात मोदींना मोठा जनादेश, आम्ही लोकांची सेवा करत आहोत
 104. यंदाचे बजेट समाजातील सर्व घटकांना डोळ्यासमोर ठेऊन तयार करण्यात आले आहे.
 105. २०१९ मध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली जनतेने कौल दिला. तो लोकशाही आणि आर्थिक विकासासाठी
 106. केंद्रीय अर्थसंकल्प वाचनाला सुरूवात
 107. नव्या दशतकातील पहिल्या अर्थसंकल्पात आपल्या सर्वांचे स्वागत - लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला
 108. गृहमंत्री अमित शहा संसद भवनात दाखल, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं कुटुंबिय संसदेत, मुलगी पराकला वांगमई देखील संसदेत पोहोचली.
 109. अर्थसंकल्पाला कॅबिनेट बैठकीत मंजूरी
 110. आज सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाच्या प्रती संसदेत आणण्यात आल्या
 111. शेअर बाजाराची सुरुवात पडझडीने, अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच प्री-ओपनिंगला शेअर बाजार १०० अंकांनी कोसळला.
 112. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी संसद भवनमध्ये दाखल
 113. अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसद भवनमध्ये पोहोचल्या, अनुराग ठाकूर अर्थमंत्र्यांसोबत
 114. सीतारामन यांनी घेतील राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट, राष्ट्रपतींच्या भेटीनंतर कॅबिनेटची बैठक
 115. अर्थमंत्री निर्मला सीतारामन राष्ट्रपतींची भेट घेणार,  अर्थसंकल्पाच्या मंजुरीसाठी ही भेट असेल,  राष्ट्रपतींना देणार अर्थसंकल्पाची प्रत
 116. अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी संसदेकडे रवाना होण्यापूर्वी त्यांच्या निवासस्थानी असलेल्या हनुमानाच्या मंदिरात प्रार्थना केली.
 117. आज सकाळी १०.१५ वाजता केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक, बैठकीत अर्थसंकल्पाला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळणार
 118. मोदी सरकारच्या दुसऱ्या काळातील दुसरा अर्थसंकल्प
 119. सकाळी ११ वाजता लोकसभेत अर्थसंकल्प सादर होणार
 120. आज शेअर बाजार दिवसभर सुरू राहणार
 121. आजच्या अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांना काय मिळणार?
 122. आजच्या अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांना मोठ्या आशा
 123. अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज पहिला अर्थसंकल्प मांडणार

 

 

केंद्रीय अर्थसंकल्पपूर्व आर्थिक पाहणी अहवाल शुक्रवारी संसदेत अर्थमंत्र्यांनी सादर केला. आर्थिक मंदी असल्याचं प्रथमच सरकारनं मान्य केलं. या पाहणी अहवालात आर्थिक विकासाला गती देण्याासाठी तातडीनं पाऊल उचलण्याची गरज असल्याचं दिसलं. तसंच 2019-20 मध्ये सरकारची वित्तीय तुट जीडीपीच्या 3.3 टक्के असेल. 2020-21 मध्ये ही तुट 3 टक्क्यांपर्यंत खाली येण्याचा अंदाज आहे. 

5 ते 10 लाखांचं वार्षिक उत्पन्न असलेल्यांना करसवलीतीची आवश्यकता असल्याचं मत अर्थतज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे. बेरोजगारी कमी करण्यासाठी अनेक उपाययजोना करतानाच निर्मिती आणि कृषी क्षेत्राला चालना देण्याचं काम अर्थसंकल्पाद्वारे केलं जाऊ शकते, असं अर्थतज्ज्ञांचं म्हणणं आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी