Union Budget: जाणून घ्या ब्लॅक बजेट, ड्रीम बजेट कधी सादर झालं!

लोकल ते ग्लोबल
Updated Jun 27, 2019 | 16:10 IST | टाइम्स नाऊ मराठी

Central Budget: भारतात यापूर्वी अनेक बजेट सादर करण्यात आली आहेत. त्यातील काही बजेट त्या वेळच्या प्रसंगानुसार सादर करण्यात आली आहेत. त्यानुसार त्यांची नावंही तशी अनोखी आहेत. त्यांच्या नावांमागं तशी कारणं आहेत.

Union budget India
केंद्रात सादर झाली काही अनोखी बजेट  |  फोटो सौजन्य: BCCL

नवी दिल्ली : अर्थसंकल्पाला बोली भाषेत बजेट असं म्हटलं जातं. सरकार सादर करत असलेल्या प्रत्येक बजेटचं एक वेगळं वैशिष्ट्य असतं. मुळात त्या बजेटमध्ये सरकारच्या वर्षभराच्या कामगिरीचा, तसेच येणाऱ्या काळातील नियोजनाचा लेख-जोखा असतो. भारतात यापूर्वी अनेक बजेट सादर करण्यात आली आहेत. त्यातील काही बजेट त्या त्या वेळच्या प्रसंगानुसार सादर करण्यात आली आहेत. त्यानुसार त्यांची नावंही तशी अनोखी आहेत. ब्लॅक बजेट, रोलबॅक बजेट, ड्रीम बजेट अशा नवांनी ही बजेट ओळखली गेली आहेत. मोदी सरकारनं पहिल्या कार्यकाळात रेल्वे बजेट बंद करून रेल्वेच्या योजनांचा समावेश केंद्रीय बजेटमध्ये केला आहे. त्यामुळे आता रेल्वे बजेट इतिहास जमा झाले आहे. तशाच पद्दतीने देशात काही अनोखी बजेट मांडण्यात आली आहेत. एक नजर टाकुयात या या अनोख्या बजेटवर.

रोलबॅट बजेट

एनडीए सरकारच्या काळात २००२-०३ मध्ये तत्कालीन अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी बजेट सादर केले होते. त्याला बजेटला रोलबॅक बजेट म्हटले होते. या बजेटमधील अनेक प्रस्ताव सिन्हा यांना मागे घ्यावे लागले होते. त्यांनी अन्न धान्यावरील सबसिडी कमी केली होती. सेक्शन ८८मध्ये देण्यात आलेल्या टॅक्स सवलतीही कमी केल्या होत्या. घरगुती गॅस, रॉकेल आणि साखरेचे दर वाढवले होते. सिन्हा यांनी अल्प मुदतीच्या बचत योजनांवरील व्याजाचे दर कमी केले होते. यातील अनेक प्रस्ताव मागे घ्यावे लागल्यामुळं या बजेटला रोलबॅक बजेट म्हणून ओळखलं जातं.

ड्रीम बजेट

पी. चिदंबरम यांनी १९९७मध्ये एक बजेट सादर केले होते. त्या बजेटला ड्रीम बजेट असे नाव देण्यात आले होते. या बजेटमध्ये कार्पोरेट आणि इन्कम टॅक्समध्ये मोठ्या प्रमाणावर कपात करण्यात आली होती. कार्पोरेट टॅक्सवरचा सरचार्ज त्यांनी हटवला होता. त्यामुळं कार्पोरेट क्षेत्रातून त्याचे जोरदार स्वागत झाले होते. कस्टम ड्युटी ५० टक्क्यांनी कमी करून ४० टक्के करण्यात आली होती. त्यानंतर एक महिन्यातच देवेगौडा सरकार पडले आणि चिदंबरम यांनी सादर केलेल्या या बजेटचा काही उपयोग झाला नाही.

ब्लॅक बजेट

केंद्रात १९७३ मध्ये यशवंतराव चव्हाण अर्थमंत्री होती. त्यांनी इंदिरा गांधी सरकारचे बजेट सादर केले होते. या बजेटला आजही ब्लॅक बजेट म्हणून ओळखले जाते. या बजेटमध्ये ५५० कोटी रूपयांचे नुकसान झाले होते. त्याशिवाय आणखी एका कारणानं या बजेटला ब्लॅक बजेट संबोधले जाते. या बजेटमध्ये कोळशाच्या खाणीचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले होते. सरकारला स्टील, सिमेंटसह विजेच्या क्षेत्रात कोळशाची गरज होती. ती मागणी पूर्ण करण्यासाठी खाणीचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Union Budget: जाणून घ्या ब्लॅक बजेट, ड्रीम बजेट कधी सादर झालं! Description: Central Budget: भारतात यापूर्वी अनेक बजेट सादर करण्यात आली आहेत. त्यातील काही बजेट त्या वेळच्या प्रसंगानुसार सादर करण्यात आली आहेत. त्यानुसार त्यांची नावंही तशी अनोखी आहेत. त्यांच्या नावांमागं तशी कारणं आहेत.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles