Rajnath Singh Corona Positive : केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांना कोरोनाची लागण, ट्विट करून दिली माहिती 

home minister Rajnath Singh केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांना कोरोनाची लागण झाली आहे. सिंह यांनी स्वतः ट्विट करून ही माहिती दिली आहे. सिंह यांनी स्वतःला आयसलोट केले आहे. देशात पुन्हा कोरोनाने डोकं वर काढले असून दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.

थोडं पण कामाचं
  • केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांना कोरोनाची लागण झाली
  • सिंह यांनी स्वतः ट्विट करून ही माहिती दिली आहे.
  • सिंह यांनी स्वतःला आयसलोट केले आहे.

Rajnath Singh Corona Positive : नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री (Union Home Minister) राजनाथ सिंह  (Rajnath Singh) यांना कोरोनाची लागण (corona positive) झाली आहे. सिंह यांनी स्वतः ट्विट (tweet) करून ही माहिती दिली आहे. सिंह यांनी स्वतःला आयसलोट केले आहे. देशात पुन्हा कोरोनाने डोकं वर काढले असून दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आज देशात १ लाख ७९ ७२३ कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. 


राजनाथ सिंह यांनी ट्विट करून म्हटले आहे की, “माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मला कोरोनाची हलकी लक्षणे असून मी होम क्वारंटाईन आहे.” गेल्या काही दिवसांत जे लोक माझ्या संपर्कात आले आहेत त्यांनी कोरोना चाचणी करावी आणि काळजी घ्यावी असे आवाहनही त्यांनी केले आहे. 


गेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे १ लाख ७९ हजार ७२९ रुग्ण आढळले आहेत, तर १४६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात एकूण कोरोना रुग्णांची संख्या ३ कोटी ५७ लाख ७ हजार ७२७ वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे ४ लाख ८३ हजार ९३६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात सक्रिया रुग्णांची संख्या ही ७ लाख २३ हजार ६१९ इतकी आहे. असे असले तरी आतापर्यंत कोरोनामुळे ३ कोटी ४५ लाख १७२ लोक बरे झाले आहेत. 

ओमिक्रॉनचा धोका आणि लसीकरण

देशात ओमिक्रॉनच्या रुग्णांमध्ये वाढ होऊन ४ हजार ३३ वर पोहोचली आहे. महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये ओमिक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. राज्यात १२१६ तर राजस्थानमध्ये ५२९ ओमिक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. ओमिक्रॉनच्या  ४ हजार ३३ रुग्णांपैकी १ हजार ५५२ रुग्ण बरे झाले आहेत. ओमिक्रॉनच्या संकटात देशात वेगाने लसीकरण सुरू आहे. आतापर्यंत देशात कोरोना प्रतिबंधक लसीचे १५१ कोटी डोस टोचण्यात आले आहेत. रविवारी देशात कोरोनाच्या १३ लाख ५२हजार ७१७ चाचण्यात झाल्या आहेत. रविवारपर्यंत देशात ६९ कोटी १५ लाख ७५ हजार ३५२ कोरोना चाचण्या झाल्या आहेत.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी