Union Law Minister Kiren Rijiju’s car hit by truck in Jammu Kashmir : केंद्रीय विधी व न्याय खात्याचे मंत्री किरेन रिजिजू यांच्या कारला अपघात झाला. रिजिजू जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत. ते जम्मूत कारमधून एका ठिकाणी जात होते. या प्रवासावेळी रिजिजू यांच्या कारची आणि एका ट्रकची टक्कर झाली.
रिजिजू यांच्या कारला जम्मूतील बनिहाल परिसरात अपघात झाला. अपघात झाला असला तरी जीवितहानी झालेली नाही. किरेन रिजिजू सुखरुप आहेत, त्यांना काहीही झालेले नाही; अशी माहिती अतिरिक्त पोलीस महासंचालक मुकेश सिंह यांनी दिली.
किरेन रिजिजू हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते भारतातील पश्चिम अरुणाचल मतदारसंघातून भाजपतर्फे १७व्या लोकसभेवर निवडून आले आहेत. सध्या ते देशाचे विधी व न्याय खात्याचे मंत्री आहेत. किरेन रिजीजू यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1971 रोजी भारतातील अरुणाचल प्रदेशमधील पश्चिम कामेंग जिल्ह्यात झाला.
अंबानींच्या पार्टीतले हे रुचकर पदार्थ बघून तोंडाला सुटेल पाणी
AI ने तयार केले दिग्गजांचे सेल्फी घेतानाचे फोटो