Mukhtar Abbas Naqvi Resign: पीएम मोदींनी कौतुक केल्यानंतर केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवींचा राजीनामा; राज्यसभा सदस्य म्हणून आजचा शेवटचा दिवस

मोदी सरकारमधील (Modi government) केंद्रीय मंत्री (Union Minister) मुख्तार अब्बास नकवी (Mukhtar Abbas Naqvi) यांनी कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मुख्तार अब्बास नकवी राजीनामा देऊ शकतात, अशी आधीपासूनच चर्चा सुरू होती. बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांनी मुख्तार अब्बास नकवी आणि आरपीपी सिंह यांची भरभरून प्रशंसा केली होती. उभय नेत्यांनी देशाच्या विकासात आपले विशेष योगदान दिले असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले होते.

Mukhtar Abbas Naqvi Resign
केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवींचा राजीनामा  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • उभय नेत्यांनी देशाच्या विकासात आपले विशेष योगदान दिले असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले होते.
  • मुख्तार अब्बास नकवी आणि आरसीपी सिंह यांचा राज्यसभेचे सदस्य म्हणून आजचा शेवटचा दिवस
  • मुख्तार अब्बास नकवी यांच्या पाठोपाठ आरपीपी सिंह यांनीदेखील राजीनामा दिला.

Mukhtar Abbas Naqvi Resign: मोदी सरकारमधील (Modi government) केंद्रीय मंत्री (Union Minister) मुख्तार अब्बास नकवी (Mukhtar Abbas Naqvi) यांनी कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मुख्तार अब्बास नकवी राजीनामा देऊ शकतात, अशी आधीपासूनच चर्चा सुरू होती. बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांनी मुख्तार अब्बास नकवी आणि आरपीपी सिंह यांची भरभरून प्रशंसा केली होती. उभय नेत्यांनी देशाच्या विकासात आपले विशेष योगदान दिले असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले होते. मुख्तार अब्बास नकवी आणि आरसीपी सिंह यांचा राज्यसभेचे सदस्य म्हणून आजचा शेवटचा दिवस आहे. मुख्तार अब्बास नकवी यांच्या पाठोपाठ आरपीपी सिंह (RPP Singh) यांनीदेखील राजीनामा दिला आहे. 

चर्चेला उधाण

मोदी सरकारच्या दोन कॅबिनेट मंत्री आपापल्या पदाच्या राजीनामा देतील, अशी गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. आरसीपी सिंग भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची अफवा देखील पसरली होती. इतकेच नाही तर मुख्तार अब्बास नकवी यांना उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार बनवण्यात येणार असल्याच्या चर्चेने जोर धरला होता. आता तर नकवी यांनी प्रत्यक्षात मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे केंद्रीय मंत्री आरसीपी सिंह यांच्या संसदीय कार्यकाळ आज 7 जुलै रोजी समाप्त होत आहे. याचा अर्थ असा की त्यांना राज्यसभेच्या सदस्यत्वासोबत मंत्रिपदाचा देखील त्याग करावा लागणार आहे.

दोन्ही नेते राज्यसभेचे उमेदवार नाहीत

दरम्यान, भाजपने मुख्तार नकवी और आरसीपी सिंह यांना दुसऱ्यांदा राज्यसभेची उमेदवारी दिलेली नाही. परंतु राज्यसभेचे सदस्यत्व नसताना देखील दोन्ही मंत्री 6 महिन्यांपर्यंत मंत्रिमंडळात राहू शकतात, अशी राज्यघटनेत तरतूद आहे. मात्र, नकवी यांच्या नावाची चर्चा उपराष्ट्रपतीपदासाठी होत आहे. तसेच त्यांना एखाद्या राज्यात राज्यपाल म्हणून पाठवण्याची भाजप तयारी करत आहे. तर दुसरीकडे आरसीपी सिंह जनता दल युनाईटेडला रामराम ठोकून भाजपच्या गोटात सामील होऊ शकतात, अशी जोरदार चर्चा आहे. 

उदयपूरसारख्या घटनांचा निषेध अन् नुपूर शर्मा चुकल्या

भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या विधानाचं कुणीच समर्थन केलेलं नाही, मात्र त्यावरून उमटणाऱ्या हिंसक प्रतिक्रिया पूर्णतः चुकीच्या आणि अस्विकारार्ह असल्याचं मत माजी केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी मांडलं होतं.  नुपूर शर्मांच्या विधानानंतर घडलेल्या उदयपूर हत्या प्रकरणाबाबतही नक्वी यांनी या कार्यक्रमात भाष्य केलं. ही घटना अस्विकारार्ह असून एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीचा गळा कापण्याच्या कृत्याचं समर्थन करताच येणार नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. नुपूर शर्मा यांचं विधान चुकीचंच आहे, मात्र त्यावर येणारी प्रतिक्रिया ही अधिक चुकीची असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी