एक वेळ डोळे दान करता येतील पण विकासाची दृष्टी नाही: नितीन गडकरी

Nitin Gadkari Master Formula: दिल्लीकर ज्या पराली प्रदूषणामुळे हैराण झाले आहेत त्याच पराली प्रदूषणाचा प्रश्न हा लवकरच सुटू शकतो. पुढील काही महिन्यांत परालीची विल्हेवाट लावण्यासाठी नवीन तंत्रज्ञान आणणार असल्याचं स्वत: केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी जाहीर केलं आहे.

union minister nitin gadkari has come out with master formula parali pollution will be gone
गडकरी म्हणाले, 'एक वेळ डोळे दान करता येतील पण विकासाची दृष्टी नाही'   |  फोटो सौजन्य: Facebook
थोडं पण कामाचं
  • मराठमोळे नितीन गडकरी धावले दिल्लीकरांच्या मदतीला
  • दिल्लीनं मोकळा श्वास घेण्यासाठी नितीन गडकरींचं नवं मिशन
  • गडकरी म्हणतात, डोळे दान करता येतात पण विकासाची दृष्टी नाही

Nitin Gadkari: नवी दिल्ली: राजधानी दिल्लीचा जीव गेल्या काही दिवसांपासून खूपच घुसमटतोय... पण आता याच घुसमटणाऱ्या राजधानीला हवाय मोकळा श्वास.. ज्यासाठी महाराष्ट्राचं मराठमोळं नेतृत्व मदतीला धावून आलंय.. (union minister nitin gadkari has come out with master formula parali pollution will be gone)

राजधानी दिल्ली आणि संपूर्ण एनसीआर या घडीला पंजाबमधून होणाऱ्या पराली प्रदूषणामुळे अक्षरश: हैराण आहे. यामुळे अनेकांना श्वसनाचे आजार जडले आहेत. दरवर्षी पराली प्रदूषणावरुन दिल्लीत बराच गदारोळ होतो. मात्र, आता लवकरच या प्रदूषणापासून सुटका मिळण्याची शक्यता आहे.

कारण येत्या दोन-तीन महिन्यांत पराली प्रदूषण होऊ नये यासाठी नवं  तंत्रज्ञान आणण्यात येणार आहे. ज्यासाठी स्वत: केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी पुढाकार घेतलाय.

अधिक वाचा: Video: हातात मशाल होऊन राहुल गांधींची महाराष्ट्रात एन्ट्री; शिवाजी महाराजांना अभिवादन करून प्रवासाला सुरुवात

नव्या तंत्रज्ञानानुसार ट्रॅक्टरलाच एक मशीन लावली जाईल जी शेतातील पेंढा (पराली) काढून टाकेल आणि त्याचा वापर बायो-बिटुमिन बनवण्यासाठी केला जाईल. अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली आहे.

मध्य प्रदेशातील काही रस्ते प्रकल्पांच्या पायाभरणीनंतर आयोजित कार्यक्रमात गडकरी म्हणाले की, 'शेतकरी अन्नदाते होण्यासोबतच ऊर्जा दाता देखील बनू शकतात. ते बायो-बिटुमेन बनवू शकतात. ज्याचा उपयोग रस्ते बांधण्यासाठी केला जाऊ शकतो.' भात किंवा गव्हाचे पीक कापणीनंतर शेतात उरलेल्या तणांना पराली म्हटले जाते.

गडकरी म्हणाले, 'मी नवीन तंत्रज्ञानाची रूपरेषा आखली आहे. जी आम्ही दोन ते तीन महिन्यांत प्रसिद्ध करू. या तंत्रज्ञानानुसार ट्रॅक्टरवर बसवलेले मशिन शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पराली काढून त्यापासून बायो-बिटुमिन बनवेल. ज्याचा उपयोग रस्ते बांधणीसाठी केला जाईल.'

अधिक वाचा: Thane : 'हर हर महादेव' वरुन राडा, जितेंद्र आव्हाडांनी चित्रपटगृहातला शो थांबवला

शेतकऱ्यांच्या बदलत्या भूमिकेचा संदर्भ देताना गडकरी पुढे म्हणाले, 'देशातील शेतकरी ऊर्जा निर्मितीसाठी सक्षम असल्याचे मी खूप दिवसांपासून सांगत आलो आहे. आमचे शेतकरी केवळ अन्नदातेच ​​नव्हे तर ऊर्जा पुरवठादार देखील बनत आहेत आणि आता ते रस्ते बांधणीसाठी बायो-बिटुमेन आणि इंधन बनवण्यासाठी इथेनॉल देखील तयार करू शकतात.'

इथेनॉलमुळे परकीय चलनाची बचत

गडकरींच्या म्हणण्यानुसार, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पेट्रोलियम मंत्र्यांनी माहिती दिली की, देशाने ऊस आणि इतर कृषी उत्पादनांमधून काढलेले इंधन ग्रेड इथेनॉल हे पेट्रोलमध्ये मिसळून 40,000 कोटी रुपयांच्या परकीय चलनाची बचत केली आहे.

पाणी, जमीन आणि जंगलांचा योग्य वापर करून विकासाचे नवे मॉडेल लागू केल्याबद्दल गडकरींनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचे यावेळी कौतुक केले आहे.

मध्य प्रदेशातील जबलपूर येथेच नव्याने बांधलेल्या रस्त्याचे उद्घाटन आणि 4,054 कोटी रुपयांच्या सात रस्ते प्रकल्पांची पायाभरणी करण्यासाठी आयोजित अन्य कार्यक्रमाला संबोधित करताना गडकरी म्हणाले की, 'देशाला विकासाच्या मार्गावर नेण्यासाठी केवळ पैशांची गरज नाही. तर यासाठी इच्छाशक्ती देखील आवश्यक आहे.'

अधिक वाचा: Bharat Jodo Yatra: भारत जोडो यात्रा रात्री राज्यात, असा असेल राहुल गांधी यांचा आजच्या यात्रेचा कार्यक्रम

लोकांना सरकारी बाँडमध्ये गुंतवणूक करण्याचे आवाहन करून गडकरी म्हणाले की, या बाँडमध्ये गुंतवणूकदारांना आठ टक्के परतावा मिळेल. यातून मिळणारी रक्कम देशाच्या विकासासाठी वापरण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या सगळ्यातून पुन्हा एकदा आपल्याला नितीन गडकरींची दूरदृष्टी दिसून आली. आजवर अनेकदा नितीन गडकरींनी आपलं विकासाचं बाबतीत नेमकं काय व्हिजन असणार हे स्पष्ट केलेलंच आहे पण ते तेवढ्यावरच थांबलेले नाहीत तर स्वत: अशा सगळ्या बाबतीत सकारात्मक दृष्टीने पुढाकार घेत असल्याचं पाहायला मिळतंय. म्हणून आता राजधानी दिल्लीतही त्यांच्या नावाची सध्या बरीच चर्चा आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी