Union minister Nitin Gadkari knew of exclusion from BJP top panels : भारतीय जनता पार्टी या पक्षात पार्लमेंटरी कमिटी अर्थात संसदीय समिती ही राष्ट्रीय पातळीवरील सर्वोच्च समिती आहे. या समितीमधून नितीन गडकरी यांना वगळण्यात आले आहे. गडकरींना या निर्णयाची काही आठवडे आधीपासूनच स्पष्ट कल्पना होती. याच कारणामुळे मागच्या महिन्यात (जुलै २०२२) एका कार्यक्रमात बोलताना गडकरींनी सूचक वक्तव्य केले होते.
विना कपडे या ठिकाणी बिनधास्त साजरा करा हनीमून
जान्हवीप्रमाणेच खुशी कपूरही आहे बोल्ड, पहा फोटो
आयुष्यात अजून खूप काही करायचे आहे आणि हे करायचे असल्यामुळेच अनेकदा राजcaकारण सोडण्याची इच्छा होते, अशा स्वरुपाचे वक्तव्य गडकरींनी केले होते. पण ज्यावेळी गडकरींनी हे वक्तव्य केले त्यावेळी अनेकांना त्यांना भाजपच्या संसदीय समितीमधून वगळले जाणार असल्याचा अंदाज आला नाही. हा निर्णय झाल्यानंतर गडकरींच्या वक्तव्याचा अर्थ नव्याने समजून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे.
ऋषभ पंतच्या बहिणीची आयपीएल स्टारसोबत लंडनमध्ये धमालमस्ती
युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्माने कोणाला केलं बर्थडे विश, म्हणाली- I Love u
मागील काही दिवसांत महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ झाली. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले पण राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा महत्त्वाचे नेते म्हणून प्रकाशात आले. या सर्व घडामोडींनंतर गडकरी आणि केंद्रीय नेतृत्व यांच्यात काही मुद्यांवरून दुरावा निर्माण होण्यास सुरुवात झाली.
काही वेळा सार्वजनिक ठिकाणी बोलताना कळत नकळत गडकरी असे काही तरी बोलतात की नंतर स्पष्टीकरण देणे आणि बाजू सावरणे पक्षाला कठीण होऊन बसते. शिवाय महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीत जाण्याचा निर्णय घेतला तरी त्यांच्या विरोधात ठाम आणि आक्रमक भूमिका घेण्यास गडकरी उत्सुक दिसले नाही. या दोन कारणांमुळे भाजपचे केंद्रीय नेतृत्व आणि गडकरी यांच्यात दुरावा वाढत गेला.
गडकरी हे संघ परिवाराच्या संपर्कात असलेले नेते आहेत. यामुळे त्यांच्या बाबतचा निर्णय घेण्याआधी संघ परिवाराच्या प्रमुख नेत्यांना विश्वासात घेणे आवश्यक होते. ही प्रक्रिया भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने पूर्ण केली. यामुळेच गडकरींना संसदीय समितीमधून वगळले तरी संघ परिवाराशी संबंधित कोणाचीही प्रतिकूल प्रतिक्रिया आलेली नाही.
गडकरी काही वर्षांपूर्वी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. पक्षाध्यक्ष असताना त्यांनी चांगले काम केले होते. सलग दुसऱ्या टर्मसाठी गडकरींची निवड निश्चित समजली जात होती. पण आयत्यावेळी गडकरींशी संबंधित आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरू झाली. ही चौकशी सुरू झाल्यामुळे गडकरींची प्रतिमा मलीन झाली. अखेर गडकरींनी अध्यक्षपदासाठी इच्छुक नसल्याचे स्वतःच जाहीर केले. यानंतर आता गडकरींना पक्षाच्या संसदीय समितीतून वगळून दुसऱ्यांदा दणका देण्यात आला आहे.
नितीन गडकरी हे एक महत्त्वाकांक्षी नेते समजले जातात. थेट केंद्रीय नेतृत्वाशी स्पर्धा करण्याचा प्रयत्न करणे त्यांना भोवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. अर्थात गडकरींकडून या सर्व शक्यता फेटाळण्यात आल्या आहेत.
भाजपमध्ये कोणाला कोणते पद आणि जबाबदारी द्यायची याचा निर्णय वरिष्ठ पदांवरील नेते घेतात. काहीवेळा वरिष्ठ पदांवरील नेते संघटीतपणे हा निर्णय घेतात. हे निर्णय भविष्याचा विचार करून घेतले जातात. यामुळे भाजपची भविष्यातील टीम तयार करण्यासाठीच नितीन गडकरी, शिवराजसिंह चौहान यांच्यासारख्या जाणत्या नेत्यांना वगळून ६० आणि ५० पेक्षा कमी वयाच्या निवडक नेत्यांना राष्ट्रीय राजकारणात संधी दिली जात आहे, असाही एक मतप्रवाह राजकीय अभ्यासकांमध्ये चर्चेत आहे.