टोल टॅक्स बंद करणार नितीन गडकरी

Nitin Gadkari: भारतात शहरातील टोल टॅक्स बंद करणार आहे. ही घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यसभेत केली. गडकरी यांच्या घोषणेमुळे शहरातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

Union minister nitin gadkari said toll in city will be waived off in rajyasabha
टोल टॅक्स बंद करणार नितीन गडकरी  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • टोल टॅक्स बंद करणार नितीन गडकरी
  • भारतात शहरातील टोल टॅक्स बंद करणार
  • शहरातील नागरिकांना दिलासा

Nitin Gadkari: भारतात शहरातील टोल टॅक्स बंद करणार आहे. ही घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यसभेत केली. गडकरी यांच्या घोषणेमुळे शहरातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे. शहरातील नागरिकांना जेमतेम दहा किमी रस्त्याच्या वापरासाठी ७५ किमीचा टोल भरावा लागतो असे आढळले. या सदोष व्यवस्थेला दुरुस्त करण्यासाठी गडकरींनी शहरातील टोल टॅक्स बंद करणार असल्याची घोषणा केली आहे. ( Union minister nitin gadkari said toll in city will be waived off in rajyasabha )

भारताला पाच वर्षानंतर पेट्रोलची गरज भासणार नाही : गडकरी

राज्यसभेत प्रश्नोत्तरांच्या तासादरम्यान एका खासदाराने एक्स्प्रेस-वेवरील शहरांच्या हद्दीतील टोल प्लाझाप्रश्नी चिंता व्यक्त केली होती. यानंतर गडकरींनी मोठा दिलासा देणारी घोषणा केली.

सुदैवाने म्हणा किंवा दुर्दैवाने, पण भारतात एक्स्प्रेस-वेवरील टोलचा जन्मदाता अर्थात फादर ऑफ टोल टॅक्स मी आहे, असे गडकरी म्हणाले. बांधा, वापरा आणि हस्तांतरीत करा अर्थात बीओटी तत्वावर महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात ठाणे भिवंडी बायपास सुरू करण्यात आला. या बायपासवर टोल वलुली सुरू झाली. यामुळे शहरातील नागरिकांना नाहक टोलचा मोठा भुर्दंड पडू लागला. हा अन्याय दूर करण्यासाठी नवी व्यवस्था सुरू करणार आहे. यात टोल असेल पण त्या टोलमधून शहरी भाग वगळला जाईल, त्यांच्याकडून टोल घेतला जाणार नाही असे गडकरी म्हणाले.

भारतात २०१४च्या आधी यूपीए सरकारच्या काळात टोल टॅक्समुळे शहरातील नागरिकांवर अन्याय होण्यास सुरुवात झाली. ही समस्या दुरुस्त करण्यासाठी हालचाली सुरू आहेत. लवकरच हा प्रश्न सुटेल, असे गडकरी म्हणाले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी