केंद्रीय मंत्री स्मृती इराणींना कोरोनाची लागण, ट्विटरवरुन दिली माहिती 

Smriti Irani tested covid positive: केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे, त्याबद्दल त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन माहिती दिली आहे.

smriti irani
केंद्रीय मंत्री स्मृती इराणींना कोरोनाची लागण, ट्विटरवरुन दिली माहिती (फाईल फोटो)  |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना कोरोनाची लागण
  • स्मृती इराणी यांनी ट्विटरवरुन दिली माहिती
  • संपर्कात आलेल्या व्यक्तींनाही केली कोरोनाची चाचणी करण्याचे आवाहन

मुंबई: Smriti Irani: जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे. भारतात देखील त्याचं प्रमाण वाढत आहे. या घातक आजरामुळे आतापर्यंत बर्‍याच लोकांनी आपले प्राण देखील गमावले आहेत. देशातील अनेक नामांकित व्यक्तींबरोबरच काही केंद्रीय मंत्रीदेखील या आजाराला बळी पडले आहेत. त्यातच आता केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. (covid positive) याबाबत स्वत: स्मृती इराणी यांनी ट्विटरवरुन माहिती दिली आहे. माझी कोविड-१९ चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. जे लोकं माझ्या   माझ्या संपर्कात आले आहेत त्यांनी लवकरात लवकर स्वत:ची तपासणी करुन घ्यावी. ही विनंती.

यापूर्वी गृहमंत्री अमित शहा, दिवंगत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि इतरही काही नेत्यांना कोरोनाची लागण झाली होती. तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना देखील काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. मात्र, त्यांनी यशस्वीरित्या त्यावर मात केली. 

रामदास आठवले कोरोना पॉझिटिव्ह

दरम्यान, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना देखील कोरोनाची लागण झाल्याचं कालच समोर आलं होतं त्याचा  रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून त्यांची प्रकृती उत्तम आहे. खबरदारीचा उपाय म्हणून आठवले यांनी विश्रांतीचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. आठवले यांना कोरोनाची कोणतीही लक्षणं नसून, त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. काळजी म्हणून ते चार दिवस रुग्णालयात दाखल होणार आहेत. 

दोन दिवसांपूर्वी सोमवारी एका जाहीर कार्यक्रमात अभिनेत्री पायल घोष हीने रिपब्लिकन पार्टीत प्रवेश केला होता. त्यावेळी त्या कार्यक्रमात रामदास आठवले उपस्थित होते.   यावेळी अनेक कार्यकर्ते उपस्थित असल्याने त्यांना सुद्धा क्वारंटाईन व्हावे लागणार आहे.

कोरोनाने भारतात शिरकाव केला होता. तेव्हा रामदास आठवले यांनी कोरोनाला हद्दपार करण्यासाठी हातात मेणबत्ती आणि बॅनर घेऊन 'गो कोरोना गो'चा नारा दिला होता. मात्र अशी घोषणा देणाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी