Salman Khan Threat : सच सच बताओ…! सलमान धमकी प्रकरणात गुंड लॉरेन्स बिश्र्नोईची होणार चौकशी, मुंबई पोलिसांनी टीम दिल्लीत

अभिनेता सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना जीवे मारण्याची धमकी देण्याचं पत्र आल्यानंतर त्यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. या प्रकरणी गँगस्टर बिश्र्नोईची चौकशी करण्यासाठी मुंबई पोलिसांचं पथक दिल्लीत दाखल झालं आहे.

Salman Khan Threat
मुंबई पोलिसांची टीम दिल्लीत  |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • सलमान धमकी प्रकरणात मुंबई पोलिसांचं पथक दिल्लीत
  • गँगस्टर लॉरेन्स बिश्र्नोईची होणार चौकशी
  • सलमान खानच्या घराबाहेर सुरक्षेत वाढ

Salman Khan Threat | अभिनेता सलमान खान (Salman Khan) आणि त्याचे वडील सलीम खान (Salim Khan) यांना जीवे मारण्याची धमकी (Life Threat) आल्यामुळे मुंबई पोलीस (Mumbai Police) सतर्क झाले आहेत. दिल्लीच्या तुरुंगात असणारा कुख्यात डॉन लॉरेन्स बिश्र्नोईचा या धमकीशी नेमका काय संबंध आहे, याची चौकशी करण्यासाठी मुंबई पोलिसांची एक टीम दिल्लीत दाखल झाली आहे. दिल्ली पोलिसांच्या सहकार्याने मुंबई पोलिसांची टीम बिश्र्नोईकडे चौकशी करेल आणि त्यातून काही नवे धागेदोर पोलिसांच्या हाती लागतील, अशी अपेक्षा आहे. बिश्र्नोई सध्या दिल्लीच्या तिहार तुरुंगात आहे. 

सलमानला जीवे मारण्याची धमकी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी सलमान खानचे वडील सलीम खान यांच्याकडे एक धमकीचं पत्र देण्यात आलं होतं. एक दिवस तुम्ही आणि तुमचा मुलगा सलमान यांचा सिद्धू मूसेवाला करू, असं या धमकीच्या पत्रात म्हटलं आहे. सलीम खान नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी बाहेर गेले होते. परत येताना ते एका बाकावर विश्रांतीसाठी बसले असताना एका आगंतुक व्यक्तीनं त्यांच्या हातात ही चिठ्ठी दिली आणि काही कळायच्या आतच पोबारा केला. त्यानंतर या चिठ्ठीतील तपशीलांवरून धमकी देणाऱ्याचा शोध घ्यायला मुंबई पोलिसांनी सुरुवात केली आहे. 

पत्राचा बिश्र्नोईशी संबंध?

या पत्रात शेवटी जी. बी. एल. बी. असं लिहिण्यात आलं आहे. यावरून पोलिसांनी तर्क लढवला असून याचा अर्थ गँगस्टर गोल्डी बरार उर्फ लॉरेन्स बिश्र्नोई असा असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. त्यामुळेच बिश्र्नोईची चौकशी करण्यासाठी मुंबई पोलिसांचं पथक बुधवारीच दिल्लीत दाखल झालं आहे. 

अधिक वाचा - Assam: लैंगिक शोषणप्रकरणी दोषी शिक्षकाला न्यायालयाने ठोठावली ६ वर्षांची शिक्षा; दहा हजार रूपयांच्या दंडाचाही समावेश 

29 मे रोजी झाली होती मूसेवालाची हत्या

29 मे रोजी प्रसिद्ध गायक सिद्धू मूसेवालाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. गँगस्टर लॉरेन्स बिश्र्नोई शस्त्रांस्त्रांसंबंधीच्या एका गुन्ह्यात सध्या दिल्लीच्या तिहार तुरुंगात शिक्षा भोगत आहे. शुक्रवारी त्याला न्ययाालयात हजर केलं जाणार आहे. पंजाबी गायक मूसेवालाच्या हत्येबाबतही त्याची चौकशी केली जाणार आहे. आपली आणि मूसेवालाची दुश्मनी होती, हे बिश्र्नोईनं मान्य केलं आहे. मात्र त्याच्या हत्येबाबत अद्याप काहीही भाष्य केलेलं नाही. मूसेलवाची हत्या आपल्या सांगण्यावरून करण्यात आली किंवा आपल्या विशिष्ट साथीदारानं हे काम केल्याचा कुठलाही उल्लेख बिश्र्नोईनं अद्याप केलेला नाही. 

अधिक वाचा - Amul appeal to PMO : "ओ शेठ! तुम्ही 'स्ट्रॉ'च बंद केला थेट!" अमुल कंपनीनं पंतप्रधान कार्यालयाला पत्र, प्लॅस्टिकबंदीच्या अंमलबजावणीपूर्वी केल्या या मागण्या

सलमान खानला अधिक सुरक्षा

धमकीचं पत्र आल्यानंतर अभिनेता सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. सलमानच्या घराबाहेरील कुमक वाढवण्यात आली असून प्रत्येकाला चौकशी करूनच घरी सोडण्यात येत आहे. लवकरच धमकी देणाऱ्याचा शोध लावला जाईल आणि कायदेशीर कारवाई केली जाईल, असं आश्वासन मुंबई पोलिसांनी दिलं आहे. सध्या सलमान खान आणि त्याचे कुटुंबीय त्याच्याच घरी एकत्र राहत असून पोलिसांनी घराबाहेर न पडण्याचा सल्ला त्यांना दिला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी