United Nations: लेफ्टनंट जनरल मोहन सुब्रह्मण्यम दक्षिण सुदानमध्ये शांती सेनेचे कमांडर

United Nations: Lt Gen Mohan Subramaniam Appointed As UN Military Commander In South Sudan : भारतीय सैन्याचे लेफ्टनंट जनरल मोहन सुब्रह्मण्यम यांना दक्षिण सुदानमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या शांती सेनेच्या कमांडर पदावर नियुक्त करण्यात आले आहे.

Lieutenant General Mohan Subramanian
United Nations: लेफ्टनंट जनरल मोहन सुब्रह्मण्यम दक्षिण सुदानमध्ये शांती सेनेचे कमांडर 
थोडं पण कामाचं
  • United Nations: लेफ्टनंट जनरल मोहन सुब्रह्मण्यम दक्षिण सुदानमध्ये शांती सेनेचे कमांडर
  • लेफ्टनंट जनरल मोहन सुब्रह्मण्यम हे लेफ्टनंट जनरल शैलेश तिनईकर यांच्याकडून पदभार घेणार
  • संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँतोनियो गुतेरेस (António Guterres) यांनी लेफ्टनंट जनरल मोहन सुब्रह्मण्यम यांच्या नियुक्तीचा आदेश काढला

United Nations: Lt Gen Mohan Subramaniam Appointed As UN Military Commander In South Sudan : भारतीय सैन्याचे लेफ्टनंट जनरल मोहन सुब्रह्मण्यम यांना दक्षिण सुदानमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या शांती सेनेच्या कमांडर पदावर नियुक्त करण्यात आले आहे. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँतोनियो गुतेरेस (António Guterres) यांनी लेफ्टनंट जनरल मोहन सुब्रह्मण्यम यांच्या नियुक्तीचा आदेश काढला आहे.

भारतीय सैन्य दलांचे निवडक अधिकारी आणि सैनिक ठराविक काळासाठी संयुक्त राष्ट्रांच्या शांतीसेनेसाठी काम करतात. सध्या लेफ्टनंट जनरल मोहन सुब्रह्मण्यम शांतीसेनेत आहे. त्यांच्या कामगिरीची दखल घेऊन संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीसांनी त्यांच्याकडे नवी जबाबदारी सोपविली आहे.

लेफ्टनंट जनरल मोहन सुब्रह्मण्यम हे लेफ्टनंट जनरल शैलेश तिनईकर यांच्याकडून पदभार घेणार आहेत. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँतोनियो गुतेरेस (António Guterres) यांनी लेफ्टनंट जनरल शैलेश तिनईकर यांनी शांतीसेनेत दिलेल्या योगदानाचे जाहीर कौतुक केले. तसेच लेफ्टनंट जनरल मोहन सुब्रह्मण्यम नवी जबाबदारी समर्थपणे हाताळतील असा विश्वास व्यक्त केला. 

लेफ्टनंट जनरल मोहन सुब्रह्मण्यम ३६ वर्षांपासून सैन्यात आहेत. त्यांनी भारतीय सैन्यात तसेच शांतीसेनेत अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या हाताळल्या आहेत. व्हिएतनाम, लाओस, कंबोडिया येथे मोहन सुब्रह्मण्यम यांनी भारताचे डीफेन्स अॅटेचे (defence attaché or Military attaché) म्हणून काम केले आहे. सिएरा लियोन येथे त्यांनी संयुक्त राष्ट्रांसाठी स्टार ऑफिसर म्हणून काम केले आहे. भारतीय सैन्यात त्यांनी युद्धसज्ज (ऑपरेशनल अँड लॉजिस्टिक रेडीनेस) राहण्यासाठी करायच्या नियोजनाची जबाबदारी समर्थपणे हाताळली.

लेफ्टनंट जनरल मोहन सुब्रह्मण्यम यांनी संरक्षण आणि व्यवस्थापन तसेच सामाजिक विज्ञान या दोन विषयांत मास्टर्स ऑफ फिलॉसॉफी केले आहे. त्यांची तामीळ, हिंदी आणि इंग्रजी या तीन भाषांवर उत्तम पकड आहे. 

मोहन सुब्रह्मण्यम यांनी भारतीय सैन्यासाठी (भूदल) २०१९ ते २०२१ या काळात खरेदी आणि उपकरणांचे व्यवस्थापन या विभागात संयुक्त मुख्यालयात अतिरिक्त महासंचालक, २०१८-२०१९  मध्ये स्ट्राइक इन्फंट्री डिव्हिजन डेप्युटी जनरल ऑफिसर कमांडिंग, २०१५-१६ मध्ये इन्फंट्री डिव्हिजन, २०१३-१४ मध्ये माउंटन ब्रिगेडचे कमांडर म्हणून काम केले. तसेच २००८ ते २०१२ या काळात डीफेन्स अॅटेचे म्हणून व्हिएतनाम, लाओस, कंबोडिया येथे काम केले. ते २००० मध्ये सिएरा लियोन येथे संयुक्त राष्ट्रांसाठी स्टार ऑफिसर म्हणून काम करत होते. 

कोअर ऑफ आर्मी एअर डीफेन्समध्ये मोहन सुब्रह्मण्यम १९८६ मध्ये कमीशन झाले. अति विशिष्ट सेवा मेडल, सेना मेडल, सेवा मेडल यांनी त्यांच्या कार्याचा गौरव झाला आहे. तामीळनाडूतील अमरावती येथे सैन्याच्या शाळेतून शिक्षण घेतल्यानंतर ते पुणे जिल्ह्यातील खडकवासला येथे एनडीएमध्ये दाखल झाले. अधिकारी म्हणून एनडीएमधून शिक्षण घेतल्यानंतर पुढे मोहन सुब्रह्मण्यम डेहराडूनच्या सैन्याच्या अकादमीत उच्च शिक्षणासाठी दाखल झाले. वेलिंग्टनच्या डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेजमध्येही त्यांनी शिक्षण घेतले. आर्मी वॉर कॉलेज, महू येथे त्यांनी हायर कमांड कोर्स प्रशासकीय व्यवस्थापन या विषयांतील उच्च शिक्षण घेतले. भारतीय लोक प्रशासन संस्थान, दिल्ली येथील पदवी त्यांनी घेतली. संरक्षण आणि व्यवस्थापन तसेच सामाजिक विज्ञानात एफफील करणाऱ्या लेफ्टनंट जनरल मोहन सुब्रह्मण्यम यांनी संरक्षण, रणभूमी, मानवाधिकार, लोक प्रशासन या विषयांत विशेष शिक्षण घेतले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी