भारताला मिळाले अमेरिकेचे MH-60R हेलिकॉप्टर

भारताने अमेरिकेसोबत संरक्षण करार केला आहे. या करारांतर्गत अमेरिकेकडून भारताला दोन MH-60R मल्टी रोल हेलिकॉप्टर मिळाली. आणखी २२ MH-60R मल्टी रोल हेलिकॉप्टर लवकरच मिळणार आहेत.

United States Navy handed over first two Sikorsky MH-60R multi-role helicopters to Indian Navy
भारताला मिळाले अमेरिकेचे MH-60R हेलिकॉप्टर 
थोडं पण कामाचं
  • भारताला मिळाले अमेरिकेचे MH-60R हेलिकॉप्टर
  • अमेरिकेकडून भारताला दोन MH-60R मल्टी रोल हेलिकॉप्टर मिळाली
  • आणखी २२ MH-60R मल्टी रोल हेलिकॉप्टर लवकरच मिळणार

नवी दिल्ली: भारताने अमेरिकेसोबत संरक्षण करार केला आहे. या करारांतर्गत अमेरिकेकडून भारताला दोन MH-60R मल्टी रोल हेलिकॉप्टर मिळाली. आणखी २२ MH-60R मल्टी रोल हेलिकॉप्टर लवकरच मिळणार आहेत. United States Navy handed over first two Sikorsky MH-60R multi-role helicopters to Indian Navy

अमेरिकेतील लॉकहीड मार्टिन कंपनीने MH-60R मल्टी रोल हेलिकॉप्टर तयार केले आहे. पण एक विशेष संकेत देण्यासाठी दोन हेलिकॉप्टर कंपनीच्या अधिकाऱ्यांऐवजी अमेरिकेच्या नौदल अधिकाऱ्यांच्या हस्ते भारतीय नौदलाकडे सोपवण्यात आली. अमेरिकेच्या सॅन दिएगो सैन्य तळावरील एनएएस नॉर्थ आयलंड या नौदलाच्या हवाई तळावर विशेष समारंभ झाला. याप्रसंगी दोन MH-60R मल्टी रोल हेलिकॉप्टर अमेरिकेच्या नौदल अधिकाऱ्यांच्या हस्ते भारतीय नौदलाकडे सोपवण्यात आली. या कार्यक्रमाला भारताकडून अमेरिकेतील भारताचे राजदूत तरणजित सिंह संधू आणि नौदलाचे उपप्रमुख व्हाइस अॅडमिरल रवनीत सिंह उपस्थित होते. 

भारताने २४ MH-60R मल्टी रोल हेलिकॉप्टर खरेदी करण्यासाठी अमेरिकेसोबत २.४ अब्ज डॉलरचा करार केला आहे. या करारांतर्गत २४ पैकी २ हेलिकॉप्टर भारताला देण्यात आली. लवकरच आणखी २२ हेलिकॉप्टर भारताला मिळणार आहेत. या हेलिकॉप्टरच्या निमित्ताने भारत आणि अमेरिका यांच्यातील मैत्रीने नवी उंची गाठल्याचे तसेच दोन्ही देशांतील विश्वासाचे आणि मैत्रीचे नाते अधिकाधिक दृढ होत असल्याचे अमेरिकेतील भारताचे राजदूत तरणजित सिंह संधू म्हणाले. 

मागील काही वर्षांत भारत आणि अमेरिका यांच्यातील संरक्षण क्षेत्रातला व्यापार २० अब्ज डॉलरपेक्षा जास्त झाला आहे. अलिकडच्या काळात झालेले करार आणि भारताने संरक्षण क्षेत्रातील व्यवसायांना चालना देण्यासाठी घेतलेले धाडसी निर्णय यांच्यामुळे भारत-अमेरिका संरक्षण सहकार्यात वाढ होत आहे. संरक्षण क्षेत्रात सहकार्याचे तसेच विदेशी गुंवणुकीचे नवे पर्याय खुले झाले आहेत; असेही अमेरिकेतील भारताचे राजदूत तरणजित सिंह संधू म्हणाले.

MH-60R मल्टी रोल हेलिकॉप्टरची वैशिष्ट्ये - 

MH-60R मल्टी रोल हेलिकॉप्टर कोणत्याही ऋतूमध्ये, कोणत्याही वातावरणात प्रभावीरित्या काम करू शकते. या हेलिकॉप्टरमुळे नौदलाच्या लढण्याच्या क्षमतेत मोठी वाढ होणार आहे. MH-60R मल्टी रोल हेलिकॉप्टर पाण्यावरील युद्धनौका तसेच पाण्याखाली खोलवर असलेल्या पाणबुड्यांशी हवेतून लढण्यास सक्षम आहे. शत्रूच्या हेलिकॉप्टरशी हवेत लढण्याची ताकद या हेलिकॉप्टरमध्ये आहे. या हेलिकॉप्टरमध्ये भारताच्या गरजांनुसार आवश्यक ते बदल करण्यात आले आहेत. MH-60R मल्टी रोल हेलिकॉप्टर हाताळण्यासाठी भारतीय वैमानिकांना प्रशिक्षण देण्याचे काम अमेरिकेत सुरू आहे. भारत आणि अमेरिका यांच्यात फेब्रुवारी २०२० मध्ये MH-60R मल्टी रोल हेलिकॉप्टर संदर्भातला करार झाला. ट्रम्प प्रशासनाच्या काळात हा करार झाला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी