अनलॉक १: जाणून घ्या काय होणार सुरू आणि काय राहणार बंद 

Unlock 1: केंद्र सरकारने लॉकडाऊन ५ ची घोषणा केली आहे. हा लॉकडाऊन कंन्टेन्मेंट झोनमध्ये कायम असणार आहे. तर उर्वरित झोनमध्ये काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे.

unlock 1 guideline for india check full details in marathi 
प्रातिनिधीक फोटो  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

 • हॉटेल आणि रेस्टॉरंट आठ जूनपासून अटी आणि शर्थींवर होणार सुरू 
 • शाळा-कॉलेज, शैक्षणिक संस्था सुरू करण्याच्या संदर्भात जुलै महिन्यात होणार निर्णय 
 • कंटेन्मेट झोनमध्ये लागू असलेले निर्बंध कायम राहणार 

नवी दिल्ली: लॉकडाऊन ४ हा देशभरात ३१ मे पर्यंत होता. त्यानंतर पुढे काय असा प्रश्न अनेकांना पडला होता. पण आता केंद्रीय गृह मंत्रालयाने यासंदर्भात माहिती दिली आहे. खास बाब म्हणजे सरकारच्या वतीने याला लॉकडाऊन ५ असे नाव देण्यात आलेले नाहीये तर अनलॉक १ असे म्हटले आहे. म्हणजेच सरकारने आता हळूहळू आर्थिक व्यवहार, क्रिया रुळावर आणण्यास सुरूवात करण्याचा निर्णय घेतला आहे.

अनलॉकची सुरूवात 

अनलॉक १ मध्ये सरकारने स्पष्ट केलं आहे की, कंटेन्मेंट झोनमध्ये यापूर्वी प्रमाणे असलेले निर्बंध, नियम कायम असतील. मात्र, उर्वरित झोनमध्ये आर्थिक व्यवहारांसह इतर काही गोष्टींना सूट देण्यात आली आहे.

कंटेन्मेंट झोन वगळता इतर ठिकाणी सूट 

 1. कंटेन्मेंट झोनमध्ये प्रतिबंध कायम राहणार आहेत. सरकारच्या या नव्या मार्गदर्शक सूचना १ जून ते ३० जूनपर्यंत कायम राहणार आहेत.

 2. नव्या मार्गदर्शक सूचनेनुसार, ८ जूनपासून धार्मिक स्थळे, हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि इतर हॉस्पिटॅलिटी सर्व्हिसेस, शॉपिंग सेंटर अटी-शर्थींवर सुरू केले जातील. या संदर्भात केंद्र सरकारच्या नव्या मार्गदर्शक सूचना लवकरच जाहीर करण्यात येतील.

 3. देशभरात नाईट कर्फ्यु आता रात्री ९ ते सकाळी ५ वाजेपर्यंत असणार आहे. यापूर्वी नाईट कर्फ्यु हा संध्याकाळी ७ ते सकाळी ७ वाजेपर्यंत होता.

काय राहणार बंद 

 1. शाळा-महाविद्यालय, शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लासेस सुरू करण्याच्या संदर्भात जुलै महिन्यात परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेण्यात येईल. 

 2. चेहऱ्यावर मास्क लावणे आणि सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळणे अनिवार्य आहे. 

 3. सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांना दंड ठोठावण्यात येणार आहे. 

 4. आंतरराष्ट्रीय विमानसेवेला बंदी कायम 

 5. मेट्रो सेवा, सिनेमागृह, जिम, स्विमिंगपूल, थिएटर, बार, एंटरटेन्मेंट पार्कवर निर्बंध कायम 

 6. वयोवृद्ध नागरिक (६५ वर्षे आणि त्यावरील), गरोदर महिला, १० वर्षांखालील मुलांना घरातच राहण्याचा सल्ला 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी