अनलॉक ५चे नियम आता ३० नोव्हेंबरपर्यंत होणार लागू,गृहमंत्रालयाचा आदेश

लोकल ते ग्लोबल
Updated Oct 27, 2020 | 18:19 IST | टाइम्स नाऊ मराठी

unlock 5.0: भारत सरकारने ३० सप्टेंबरला अनलॉक ५चे नियम जाहीर केले होते हे नियम आता ३१ ऑक्टोबरपर्यंत नव्हे तर ३० नोव्हेंबरपर्यंत लागू केले जाणार आहेत. 

unlock 5.0
अनलॉक ५चे नियम आता ३० नोव्हेंबरपर्यंत होणार लागू 

थोडं पण कामाचं

  • देशात २४ मार्चला लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता
  • त्यानंतर हळूहळू सर्व कामे सुरू करण्याची परवानगी देण्यात आली. 
  • देशात सर्व व्यवहार सुरू झाले आहेत. 

मुंबई: गृह मंत्रालयाने(home minister) ३१ ऑक्टोबरपर्यंत लागू असलेले अनलॉक ५चे नियम(guidlines of unlock 5.0) आता ३० नोव्हेंबरपर्यंत वाढवले आहेत. यात स्पष्ट करण्यात आले की सतर्कताही महत्त्वाची आहे. अनलॉक ५ साठीचे नियम ३० सप्टेंबरला जाहीर करण्यात आले होते. हे नियम आता ३० नोव्हेंबरपर्यंत कायम राहणार आहेत. कंटनमेंट झोवनमध्ये ३० नोव्हेंबरपर्यंत लॉकडाऊन सक्तीचा असणार आहे. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात तसेच राज्यांतर्गत वाहतुकीवर आता कोणत्याही प्रकारची बंदी नसेल. या प्रकारच्या येण्याजाण्यासाठी वेगळी परवानगी अथवा ई परमिटची गरज नाही. 

३० सप्टेंबरला जाहीर करण्यात आलेल्या आदेशामध्ये गृह मंत्रालयाने १५ ऑक्टोबरपासून सिनेमा, थिएटर, मल्टिप्लेक्स पुन्हा सुरू करण्यास परवानगी दिली होती. यात लोकांच्या बसण्याची क्षमता ५० टक्के ठेवण्याचे आदेश होते. खेळाडूंना प्रशिक्षण देण्यासाठी वापरले जाणाऱे स्विमिंग पूलही पुन्हा खोलण्याची परवानगी देण्यात आली होती. मनोरंजन पार्क तसेच इतर स्थानेही पुन्हा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. 

मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग गरजेचे

राज्य आणि केंद्र शासित सरकारला कंटेनमेंट झोनच्या बाहेर १५ ऑक्टोबरनंतर १००हून अधिक व्यक्तींच्या अनुपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी अटींसह परवानगी दिली होती. बंद परिसरांमध्ये १००व्यक्तींसोबत कार्यक्रमाचे आयोजन केले जाऊ शकतात. दरम्यान, यावेळी मास्क वापरणे तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे गरजेचे असणार आहे. तसेच या ठिकाणी थर्मल स्कॅनिंग हात धुण्यासाठी हँड वॉश आणि सॅनिटायझरची सुविधा असली पाहिजे.

गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होतेय. गेल्या २४ तासांत ४८८ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांत ३६,४६९ नवे रुग्ण आढळून आले. भारतात आतापर्यंत ७९,४६,४२९ पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेआहेत. देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत काहीशी घट झालेली पाहायला मिळत आहे. राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १,३४,६५७ इतकी झाली आहे. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी