Unlock 5 Guidelines: केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना, १५ ऑक्टोबरपासून 'या' गोष्टींना परवानगी

Unlock 5 Guidelines: अनलॉक अंतर्गत केंद्र सरकारने नव्या गाईडलाईन्स जाहीर केल्या आहेत. यानुसार केंद्र सरकारने देशात १५ ऑक्टोबरपासून काही बाबींना सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. पाहूयात काय आहेत या बाबी.

unlock 5 government of india issues new guidelines for reopening cinema hall
सिनेमागृह (फाईल फोटो)  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • अनलॉक ५ संदर्भात केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना जाहीर 
  • १५ ऑक्टोबरपासून सिनेमागह, मल्टिप्लेक्स, स्विमिंगपूल सुरू करण्यास परवानगी 

नवी दिल्ली : लॉकडाऊन नंतर देशात अनलॉक होण्यास सुरूवात झाली आता पुन्हा एकदा अनलॉक (Unlock) अंतर्गत केंद्र सरकारने (Central Government) लॉकडाऊनच्या नियमांमध्ये थिथिलता आणत काही बाबींना मान्यता दिली आहे. अनलॉक ५ अंतर्गत केंद्र सरकारने नव्या मार्गदर्शक सूचना जाहीर (Government of India issues unlock 5 new guidelines) केल्या आहेत. केंद्र सरकारने सिनेमागृह, मल्टिप्लेक्स, खेळाडूंच्या प्रशिक्षणासाठी वापरण्यात येणारे स्विमिंगपूल, इंटरटेन्मेंट पार्क १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्यास परवानगी दिली आहे. तर महाराष्ट्र सरकारने अनलॉक ५ संदर्भातील मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या असून स्विमिंगपूल, सिनेमागृह, मेट्रोवर बंदी कायम ठेवली आहे.

सिनेमागृह, थिएटर, मल्टिप्लेक्स हे ५० टक्के क्षमतेने होणार सुरू

तसेच सिनेमागृह, थिएटर, मल्टिप्लेक्स हे ५० टक्के क्षमतेने १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. म्हणजेच ज्या सिनेमागृहाची किंवा मल्टिप्लेक्सची जितकी क्षमता असेल त्याच्यापेक्षा अर्ध्या क्षमतेत प्रेक्षकांना सिनेमागृहात प्रवेश देता येणार आहे. या संदर्भातील मार्गदर्शक सूचना माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून जाहीर करण्यात येणार आहेत.

शाळांबाबतचा निर्णय १५ ऑक्टोबर नंतर

शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग क्लासेस सुरू कऱण्याच्या संदर्भातील निर्णय राज्य सरकार १५ ऑक्टोबरनंतर घेऊ शकतात. तसेच यासाठी पालकांची परवानगी आवश्यक असणार आहे. अनलॉक ५ च्या मार्गदर्शक सूचनांनुसार, राज्य आणि केंद्रशासित प्रदेश हे १५ ऑक्टोबरनंतर शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस सुरू करायचे की नाही हे ठरवू शकतात. गृह मंत्रालयाने सांगितले की, शाळा, महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेताना संबंधित शाळा, संस्था, महाविद्यालये यांच्यासोबत सल्लामसलत करुनच निर्णय घेण्यात येईल.

आंतरराष्ट्रीय विमान सेवा पुढील आदेशापर्यंत बंदच राहणार आहे. केवळ ज्यांना गृह मंत्रालयाकडन परवानगी देण्यात येणार आहे त्यांनाच आंतरराष्ट्रीय विमान सेवेची परवानगी असणार आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी