UP Assembly Elections 2022: प्रियंका गांधींनी महिलांना दिला आवाज; काँग्रेस 40 टक्के महिलांना देणार तिकीट

उत्तर प्रदेशातील होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांसाठी काँग्रेस जोरात तयारीला लागली आहे. या निवडणूक मोहिमेत काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी सक्रीय झाल्या आहेत.

Congress will give 40 per cent women tickets
UP Elections: काँग्रेस 40 टक्के महिलांना देणार तिकीट   |  फोटो सौजन्य: ANI
थोडं पण कामाचं
  • पुढील महिन्याच्या 15 तारखेपर्यंत महिलांना अर्ज करता येणार आहे.
  • जास्तीत जास्त महिलांनी राजकरणात यावे, अशी इच्छा प्रियंका गांधींनी यावेळी बोलून दाखवली.
  • काँग्रेस पक्ष महिलांना 40 टक्के तिकीट देणार

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांसाठी काँग्रेस जोरात तयारीला लागली आहे. या निवडणूक मोहिमेत काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी सक्रीय झाल्या असून त्यांनी युपीच्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी आता एक मोठी घोषणा केली आहे. त्या म्हणाल्या की, विधानसभा निवडणुकीत काँग्रेस महिलांना 40 टक्के तिकिटे दिली जातील.

राज्याच्या विकासासाठी महिलांचा सहभाग महत्त्वाचा असल्याचं त्या म्हणाल्या. माझ्या एकट्याचे मत ऐकून घेतले गेले असते तर मी पूर्ण 50 टक्के तिकीट महिला उमेदवारांना दिले असते, असं म्हणत त्यांनी सोनभद्र आणि सीतापूरमधील आपल्या अटकेचा किस्सा सांगितला. प्रियंका गांधी म्हणाल्या की, महिलांना मी विनंती करते की जास्तीत जास्त महिलांनी राजकरणात यावं. यासोबत त्यांनी 40 टक्के महिलांना तिकीट देण्याची घोषणा केली. स्वतंत्र भारतात पहिल्यांदाच कोणत्या तरी पक्षाने महिलांसाठी एवढी मोठी घोषणा केली आहे.

15 तारखेपर्यंत महिला अर्ज करू शकतील

आम्ही प्रत्येक विधानसभेसाठी अर्ज मागवले आहेत. पुढील महिन्याच्या 15 तारखेपर्यंत महिलांना अर्ज करता येणार आहे. ज्याला निवडणूक लढवायची आहे त्या महिलांनी अर्ज करावा. राजकारणात आम्ही त्यांना संधी देऊ. अधिकाधिक महिला पुढे याव्यात.

'स्त्रियांनी जातीधर्म नाही तर संघटित व्हावे'

प्रियंका गांधी म्हणाल्या की जर माझं चालले असते तर मी 50 टक्के महिलांना तिकीट दिले असते.  मी यूपीची प्रभारी आहे, म्हणून मी सध्या यूपीसाठी निर्णय घेतला आहे. केंद्राचा नंतर विचार केला जाईल. राजकीय पक्षांना वाटते की, दोन हजार रुपये देऊन आणि सिलिंडर देऊन महिला सुखी होतील पण राजकारणात असे बदल येणार नाही.

'गुणवत्तेच्या आधारावर महिलांना तिकीट दिले जाईल' 

आपण स्त्रिया आहोत. संघर्षात एकमेकांना साथ देऊया. विचार करा ही आमची बहीण आहे, आपण एकत्र उभे राहून एकत्र लढले पाहिजे. यूपी प्रभारी  प्रियंका म्हणाल्या की, जर कोणी आपल्या बहिणीला, मुलीला निवडणूक लढवू देत असेल तर त्या काही चुकीचं नाही. त्या त्यामुळे अजून सक्षम होतील. जातीच्या आधारावर नाही, आम्ही गुणवत्तेच्या आधारावर महिलांना तिकीट देऊ, असं प्रियंका गांधी म्हणाल्या. काँग्रेसचे सरचिटणीस म्हणाल्या, 'माझं राजकारण फक्त यासाठी आहे की,,  बदल व्हावा. मला काही आशा, इच्छा जाग्या व्हाव्यात. मला  असे राजकारण अपेक्षित ज्यात सेवा आणि प्रेमाची भावना आहे. ठेचून मारण्याची नाही. 

लखीमपूर खेरी- महिला पोलीस कर्मचारीची ड्युटी आठवली

महिलांना नोकरीच्या वेळी किती कष्ट सहन करावे लागतात. उशिरापर्यंत नोकरी करावी लागते असं म्हणत प्रियंका गांधी यांनी महिलांना आपल्याकडे वळण्याचा प्रयत्न केला. काँग्रेस सरचिटणीस म्हणाल्या की, लखीमपूर खेरी मध्ये मला जेव्हा घेरण्यात आलं तेव्हा तेथे पूर्ण अंधार होता. दोन महिला कॉन्स्टेबलांनी मला सीतापूरला नेलं. सकाळी चार वाजेपर्यंत त्या महिला कर्मचारी तेथे राहिल्या. त्याच्या वरिष्ठ महिला अधिकाऱ्याची वृद्ध आई नोएडामध्ये एकटी राहते.  त्या म्हणाल्या महिलांना पुढे आले पाहिजे. 

दरम्यान प्रियंका गांधी सातत्याने भाजप सरकारवर निशाणा साधत आहेत. सोमवारी उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर जिल्ह्यातील न्यायालयाच्या आवारात एका वकिलाच्या कथित हत्येप्रकरणी प्रियांकाने योगी सरकारवरही टीका केली.  यापूर्वी त्यांनी लखीमपूर खेरी घटनेबाबत केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारवर सातत्याने हल्ला केला. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी