Crime News: धक्कादायक! पतीनेच व्हायरल केले पत्नीचे अश्लील फोटो...

लोकल ते ग्लोबल
Updated Apr 11, 2023 | 20:32 IST | टाइम्स नाऊ मराठी

Crime News: पती म्हणजे परमेश्वर, आपल्याला सात जन्म हाच पती मिळावा, अशी प्रार्थना सर्व महिला देवाकडे करत असतात. परंतु सासरवाडीच्या मंडळींकडून हुंडा (Dowry)कमी मिळाला म्हणून एका नराधमानं चक्क पत्नीचे अश्लिल फोटो सोशल मीडियावर पोस्ट (Social Media Post) केल्याची घृणास्पद घटना समोर आली आहे. सध्या आरोपी पोलिसांच्या (UP Police) ताब्यात आहे.

UP Crime News
धक्कादायक! पतीनेच व्हायरल केले पत्नीचे अश्लील फोटो...  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • ही घटना कनौज जिल्ह्यातील तिर्वा पोलिस स्टेशनच्या हद्दीतील आहे.
  • लग्नानंतर अवघ्या काही महिन्या आरोपीने सासरच्या मंडळींकडे दोन लाख रुपये आणि सोन्याची साखळीची मागणी
  • सासरच्या मंडळींनी हुंडा कमी दिल्याने आरोपीने हे घृणास्पद कृत्य केल्याची माहिती

Crime News: उत्तर प्रदेशातील (UP News) कन्नौज (Kannauj City) शहरात पती आणि पत्नीच्या (Husband and Wife) पवित्र नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. एका नराधम पतीने त्याच्या पत्नीची अश्लील फोटो चक्क सोशल मीडियावर पोस्ट (Social Media Post) केली आहे. सासरच्या मंडळींनी हुंडा (Dowry) कमी दिल्याने आरोपीने हे घृणास्पद कृत्य केल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. हुंड्यात ठरलेल्या बाबी सासरच्या लोकांनी पूर्ण न केल्याने आरोपीने पत्नीच्या अब्रूचे धिंडवडे काढली.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही घटना कनौज जिल्ह्यातील तिर्वा पोलिस स्टेशनच्या हद्दीतील आहे. पीडितीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सासरच्या लोकांनी ठरलेला हुंडा दिला नाही. त्यामुळे आरोपीनं हे कृत्य केल्याचं पोलिसांनी सांगितलं. 

काय आहे प्रकरण? 

पीडिता आणि आरोपीचं लग्न 25 नोव्हेंबर 2020 रोजी झालं होतं. लग्नानंतर अवघ्या काही महिन्या आरोपीने सासरच्या मंडळींकडे दोन लाख रुपये आणि सोन्याची साखळीची मागणी केली. सासरच्या लोकांनी मागणी पूर्ण न केल्याने आरोपीने पत्नीचा छळ सुरू केला. आरोपी पत्नीला दररोज मारहाण करत होता. इतकंच नाही तर 24 डिसेंबर, 2021 रोजी त्याने पीडितेला घराबाहेर काढलं होतं. त्यानंतर पीडितेने पतीसह सात जणांविरुद्ध पोलिसांत तक्रार देखील नोंदवली होती. तक्रार मागे घेण्यासाठी आरोपी पती पीडितेच्या मागे लागला होता. परंतु पीडितेने तक्रार मागे घेण्यात स्पष्ट नकार दिल्याने पतीने त्याच्या फोटोमध्ये फेरफार करून ते सोशल मीडियावर पोस्ट केले. आता आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे. 

दुसऱ्या एका घटनेत एका लष्कराच्या जवानाने त्याच्या सासरच्या लोकांवर गंभीर आरोप केले आहेत. तालग्राम येथील ही घटना आहे. सासरच्या लोकांनी आपल्यावर विषप्रयोग केला आणि आपल्याला बेदम मारहाण केल्याचा आरोपी जवानानं केला आहे. या प्रकरणी जवानाच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून सासरच्या लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी