UP Election 2022 : Aparna Yadav : अपर्णा यादव भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा

UP Election 2022 : Possibility : Aparna Yadav is on the path of BJP : अपर्णा यादव या समाजवादी पक्षाचे संरक्षक मुलायमसिंह यादव यांच्या धाकट्या सूनबाई आहे. मुलायम यांचा धाकटे पुत्र प्रतीक यांची पत्नी आहेत अपर्णा यादव. यामुळे अपर्णा यादव यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास तो समाजवादी पक्षासाठी धक्का असेल अशी चर्चा आहे.

UP Election 2022 : Possibility : Aparna Yadav is on the path of BJP
अपर्णा यादव भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा 
थोडं पण कामाचं
  • अपर्णा यादव भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा
  • अपर्णा यादव भाजपकडून लखनौ कैंट अर्थात लखनऊ कॅन्टॉनमेंट मतदारसंघातून निवडणूक लढवतील अशी चर्चा
  • समाजवादी पक्षाचे फिरोजाबाद जिल्ह्यातील सिरसागंजचे आमदार हरीओम यादव यांनी भाजपमध्ये प्रवेश केला

UP Election 2022 : Possibility : Aparna Yadav is on the path of BJP : लखनौ : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी तिकिटांचे वाटप सुरू होताच राजकीय चर्चांना उधाण आले आहे. उमेदवारी मिळवण्यासाठी कोण पक्षांतर करू शकते याबाबतच्या राजकीय चर्चा सुरू आहेत. या चर्चेत आता एका नव्या नावाचा समावेश झाला आहे. हे नाव आहे अपर्णा यादव यांचे. 

अपर्णा यादव या समाजवादी पक्षाचे संरक्षक मुलायमसिंह यादव यांच्या धाकट्या सूनबाई आहे. मुलायम यांचा धाकटे पुत्र प्रतीक यांची पत्नी आहेत अपर्णा यादव. यामुळे अपर्णा यादव यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास तो समाजवादी पक्षासाठी धक्का असेल अशी चर्चा आहे. याआधी मुलायमसिंह यांचे व्याही हरीओम यादव यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

अपर्णा यादव भाजपकडून लखनौ कैंट अर्थात लखनऊ कॅन्टॉनमेंट मतदारसंघातून निवडणूक लढवतील अशी चर्चा सुरू आहे. या चर्चेला भारतीय जनता पार्टी आणि अपर्णा यादव यांच्यापैकी कोणीही उत्तर दिलेले नाही. या क्षणी अपर्णा यादव समाजवादी पक्षातच आहेत. मात्र अपर्णा यादव समाजवादी पक्ष सोडून उमेदवारीसाठी भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा सुरू आहे. 

अपर्णा यादव यांनी २०१७ मध्ये लखनौ कैंटमधून समाजवादी पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या रिटा बहुगुणा जोशी यांनी त्यांचा पराभव केला होता.

समाजवादी पक्षाचे फिरोजाबाद जिल्ह्यातील सिरसागंजचे आमदार हरीओम यादव यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यानंतरच अपर्णा यादव यांच्याविषयी चर्चा सुरू झाली आहे. हरीओम यादव हे रामप्रकाश उर्फ नेहरू यांचे भाऊ आहेत. रामप्रकाश यांच्या मुलीचे लग्न मुलायम सिंह यांच्या भाच्याशी (भतीजा) रणवीर सिंहशी झाले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी