UP Election 2022: पंतप्रधान मोदी आज प्रयागराज दौऱ्यावर, महिला बचत गटांच्या खात्यात जमा करणार 1 हजार कोटी

Modi's visit to Prayagraj : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) मंगळवारी प्रयागराजला(Prayagraj) भेट देणार असून दोन लाखांहून अधिक महिलांच्या उपस्थितीत एका अनोख्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

Prime Minister Modi's visit to Prayagraj today
महिला बचत गटांना पीएम मोदी देणार 1 हजार कोटी  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • पंतप्रधान आज परेड ग्राउंड प्रयागराज येथे कविशाल महिला संमेलनाला संबोधित करणार.
  • महिला बचत गटांच्या (SHGs) खात्यांमध्ये 1000 कोटी रुपयांची रक्कम हस्तांतरित केली जाईल.
  • 'मुख्यमंत्री कन्या सुमंगला योजने' अंतर्गत एक लाखाहून अधिक लाभार्थ्यांना एकूण 20 कोटी पेक्षा जास्त रक्कम हस्तांतरित केली जाईल.

UP Election 2022: नवी दिल्ली :  पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) मंगळवारी प्रयागराजला(Prayagraj) भेट देणार असून दोन लाखांहून अधिक महिलांच्या उपस्थितीत एका अनोख्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाला उत्तर प्रदेशचे (Uttar Pradesh) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Chief Minister Yogi Adityanath) देखील उपस्थित राहणार आहेत. सीएम योगी 1:30 ते 1:50 पर्यंत भाषण देतील, त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी 1.51 ते 2.20 या वेळेत जाहीर सभेला संबोधित करतील. 

सरकारने याबाबत माहिती दिली. गेल्या एका महिन्याभरात पंतप्रधान मोदी उत्तर प्रदेशमध्ये दहावा दिवस घालवतील. निवडणुकीपूर्वी पंतप्रधान मोदींनी भाजपच्या निवडणूक प्रचाराची कमान आपल्या हातात घेतली असून त्यांनी जोरात प्रचार चालविला आहे. उत्तर प्रदेशात दोन महिन्यांच्या आत निवडणुका होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, पंतप्रधान कार्यालयाने (PMO) माहिती दिली की, पंतप्रधान मोदींच्या संकल्पनेनुसार हा कार्यक्रम आयोजित केला जात आहे. विशेषत: महिलांना तळागाळातील, आवश्यक कौशल्ये, प्रोत्साहने आणि संसाधने प्रदान करून सक्षम बनविण्यात येणार आहे.  PMO ने सांगितले की ते महिला बचत गटांच्या (SHGs) खात्यांमध्ये 1000 कोटी रुपयांची रक्कम हस्तांतरित केली जाईल. ज्यामुळे सुमारे 16 लाख महिला सदस्यांना फायदा होईल.

पंतप्रधान कार्यालयाच्या म्हणण्यानुसार, हे हस्तांतरण दीनदयाल उपाध्याय योजना- राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान (DAY) अंतर्गत केले जाईल, ज्यामध्ये 80,000 SHGs ला 1.10 लाख रुपये प्रति SHG चा कम्युनिटी इन्व्हेस्टमेंट फंड (CIF) मिळेल आणि 60,000 SHG ला मिळेल. 15,000 रुपये प्रति बचत गट. फिरता निधी प्राप्त होईल. पीएमओने सांगितले की, व्यावसायिक एजंट आणि सख्यांना प्रोत्साहित करण्यासाठी पंतप्रधान यातील 20 हजार खात्यात पहिल्या महिन्याच्या स्टायपेंड म्हणून 4 हजार रुपयेदेखील हस्तांतरित करतील. जेणेकरून ते आपल्या कामात स्थिर होतील आणि घेण-देण्यावर कमीशनच्या माध्यमातून कमाई करू शकतील.

कार्यक्रमादरम्यान, मोदी 'मुख्यमंत्री कन्या सुमंगला योजने' अंतर्गत एक लाखाहून अधिक लाभार्थ्यांना एकूण 20 कोटी रुपयांहून अधिक रक्कम हस्तांतरित करतील. ही योजना मुलीला तिच्या आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर सशर्त रोख हस्तांतरण प्रदान करते. एकूण हस्तांतरण रुपये 15,000 प्रति लाभार्थी आहे. त्याच वेळी, पंतप्रधान 202 पूरक पोषण उत्पादन युनिटची पायाभरणी करतील. या युनिट्सला बचत गटांकडून निधी दिला जात असून एका युनिटसाठी सुमारे 1 कोटी रुपये खर्चून ते बांधले जाणार आहेत.

प्रयागराजमधील पंतप्रधानांच्या आजच्या कार्यक्रमांवर एक नजर

पंतप्रधान आज परेड ग्राउंड प्रयागराज येथे कविशाल महिला संमेलनाला संबोधित करणार आहेत, त्यांच्या कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार, ते दुपारी 12:45 वाजता प्रयागराजला पोहोचतील, त्यानंतर ते बमरौली विमानतळावरून परेड ग्राउंडमधील हेलिपॅडवर येतील.

  • दुपारी 1.10 वाजता पंतप्रधान कार्यक्रमस्थळी पोहोचतील आणि तेथे ते एका प्रदर्शनाचे उद्घाटन करतील   
  • त्यानंतर मंचावर पोहोचल्यानंतर त्यांच्या स्वागताचा कार्यक्रम होणार आहे.
  • स्वागत कार्यक्रमानंतर 4 मिनिटांची शॉर्ट फिल्म पाहणार.
  • त्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे भाषण सुरू होईल.1:30 ते 1:50 पर्यंत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे भाषण होईल. 
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी दुपारी 1.51 ते 2.20 या वेळेत जाहीर सभेला संबोधित करतील
  • दुपारी २.४५ वाजता पंतप्रधान दिल्लीला रवाना होतील.
  • या कार्यक्रमात, पंतप्रधान बचत गटांच्या (SHGs) बँक खात्यांमध्ये 1000 कोटी रुपयांची रक्कम हस्तांतरित करतील, त्यानंतर ते 202 पूरक पोषण उत्पादन युनिटची पायाभरणी करतील. त्यानंतर सुमंगला योजनेअंतर्गत ते 1,01,000 मुलींना रक्कम हस्तांतरित करतील.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी