UP Elections 2022: युपीत सायकलमुळे कमळाला त्रास; आज 3 मंत्री आणि 6 आमदार करणार सायकल'ची स्वारी; अखिलेश यांच्या उपस्थितीत प्रवेश

सध्या उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) विधानसभा(Assembly) निवडणुकीची जोरदार चर्चा सुरू आहे. कारण उत्तर प्रदेशच्या राजकारणात दमखम दाखवणाऱ्या भाजपला (BJP) सध्या जोरदार धक्के बसत असल्याचे चित्र दिसत आहे. कारण आत्तापर्यंत भाजपच्या 3 मंत्री आणि 11 आमदारांनी राजीनामे दिले आहेत.

UP Elections 2022
आज भाजपचे 3 मंत्री आणि 6 आमदार करणार सायकल'ची स्वारी  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • कारण आत्तापर्यंत भाजपच्या 3 मंत्री आणि 11 आमदारांनी राजीनामे दिले आहेत.
  • उत्तर प्रदेशमध्ये गेल्या तीन ते चार दिवसांपासून राजीनामासत्र सुरू
  • समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांच्या उपस्थितीत आज 12.30 वाजता पत्रकार परिषद होणार

UP Assembly Elections 2022 : नवी दिल्ली :  सध्या उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) विधानसभा(Assembly) निवडणुकीची जोरदार चर्चा सुरू आहे. कारण उत्तर प्रदेशच्या राजकारणात दमखम दाखवणाऱ्या भाजपला (BJP) सध्या जोरदार धक्के बसत असल्याचे चित्र दिसत आहे. कारण आत्तापर्यंत भाजपच्या 3 मंत्री आणि 11 आमदारांनी राजीनामे दिले आहेत. भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. राजीनामा देणारे 3 मंत्री आज अखिलेश यादव यांच्या समाजवादी पार्टीत (Samajwadi Party) प्रवेश करणार आहेत. तर त्यांच्याबरोबर सहा आमदार देखील समाजवादी पार्टीत दाखल होणार आहेत. 

उत्तर प्रदेशमध्ये गेल्या तीन ते चार दिवसांपासून राजीनामासत्र सुरू होते. राजीनामा दिल्यानंतर हे मंत्री आणि आमदार कोणत्या पक्षात जाणार याची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू होती. मात्र, अखेर यातील तीन मंत्री आणि सहा आमदार सायकलवर स्वार होणार असल्याचे निश्चित झाले आहे.  11 आमदारांपैकी 9 जण समाजवादी पार्टीत दाखल होणार असल्याने अखिलेश यादव यांची ताकद वाढणार आहे.  देशातील अनेक राज्यात दुसऱ्या पक्षातून भाजपमध्ये इनकमिंग झाल्याचे आपल्याला पाहायला मिळाले होते. मात्र, उत्तर प्रदेशमध्ये निवडणुकांपूर्वीच योगी सरकारला धक्के बसत आहेत. अशातच राजीनामे देणारे मंत्री आमदार हे समाजवादी पार्टीत सामील होत असल्याने भाजपची चिंता अधिकच वाढली आहे. 

आज 12.30 वाजता प्रवेश

समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांच्या उपस्थितीत आज 12.30 वाजता पत्रकार परिषद होणार आहे. यामध्ये तीन मंत्री आणि सहा आमदार समाजवादी पार्टीत प्रवेश करणार आहेत. ज्या तीन मंत्र्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे, त्यामध्ये स्वामी प्रसाद मौर्य, दारा सिंह चौहान आणि धर्म सिंह सैनी या तिघांचा समावेश आहे. दरम्यान, स्वामी प्रसाद मौर्य यांच्याबरोबर ब्रजेश प्रजापती, रोशन लाल वर्मा, भगवती सिंह सागर, मुकेश वर्मा, विनय शाक्य आणि बाला अवस्थी यांनी राजीनामे दिले होते. आणखी काही आमदार भाजपला धक्का देण्याच्या तयारीत असल्याचा दावा या राजीनामा दिलेल्या आमदारांनी केला आहे. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी