UP विधानपरिषद इलेक्शन ; 36 पैकी 33 जागांवर भाजपचा दणदणीत विजय, सपाचा सूपड़ा साफ 

UP MLC Election Result : विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या निकालात भाजपने यूपीमधील एकूण 36 जागांपैकी 33 जागांवर कब्जा केला आहे. त्याचवेळी या निवडणुकीत सपाला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले

UP Legislative Council Election; BJP won 33 out of 36 seats by a landslide
UP विधानपरिषद इलेक्शन ; 36 पैकी 33 जागांवर भाजपचा दणदणीत विजय, सपाचा सूपड़ा साफ   |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपने दणदणीत विजय नोंदवला आहे.
  • 36 पैकी 33 जागा भाजपच्या खात्यात आल्या आहेत.
  • भाजपला विधान परिषदेत पूर्ण बहुमत मिळाले आहे.

लखनौ : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीनंतर आता विधानपरिषद निवडणुकीतही भाजपने दणदणीत विजयाचा  दिसून आला. विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या निकालात भाजपने यूपीमधील एकूण 36 जागांपैकी 33 जागांवर कब्जा केला आहे. त्याचवेळी या निवडणुकीत सपाची धूळधान स्पष्ट झाली आहे. (UP Legislative Council Election; BJP won 33 out of 36 seats by a landslide)

अधिक वाचा : ED कडून काॅंग्रेस कोषाध्यक्ष पवन बन्सल यांची चौकशी, जाणून घ्या काय आहे नॅशनल हेराल्ड प्रकरण

या निवडणुकीत समाजवादी पक्षाचा एकही उमेदवार विजयी होऊ शकलेला नाही. मात्र, या निवडणुकीत भाजपला वाराणसीतून पराभवाला सामोरे जावे लागले आहे. 3 अपक्ष उमेदवारांनी आझमगड, वाराणसी आणि प्रतापगड जागा जिंकल्या आहेत.

तुरुंगात बंद ब्रिजेश सिंह यांच्या पत्नी अन्नपूर्णा सिंह यांनी वाराणसी-चंदौली-भदोही मतदारसंघातून विजय मिळवला आहे. येथे भाजप तिसऱ्या क्रमांकावर आहे. दुसरीकडे, अखिलेश यांच्या अत्यंत जवळचे मानले जाणारे सुनील कुमार साजन लखनौमधून निवडणूक हरले आहेत. आझमगडमध्ये अपक्ष उमेदवार विक्रांत सिंह रिशू यांनी भाजप उमेदवार अरुण कांत यादव यांचा २८१३ मतांनी पराभव केला. येथे सपा तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी