Police Raped Minor Girl : लखनौ : उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला होता. ही पीडित मुलगी जेव्हा पोलिसांत तक्रार दाखल करायला गेली तेव्हा पोलिसांनीच तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणी चार जणांविरोधात पोक्सो अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. तसेच पोलीस अधिकारी फरार आहे. पोलीस फरार आरोपीचा कसून शोध घेत आहे.
In UP's Lalitpur, a minor girl was allegedly gang-raped by four men. When she approached the local police, she was allegedly raped by the SHO. FIR registered against 6 named accused. SHO suspended, on the run: Nikhil Pathak, Lalitpur SP pic.twitter.com/It3Lrlbk95
— Piyush Rai (@Benarasiyaa) May 3, 2022
उत्तर प्रदेशमध्ये एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर चार जणांनी सामूहिक बलात्कार केला. चार जणांनी २२ एप्रिल रोजी तिला भोपाळला नेले आणि चार दिवस तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. त्यानंतर आरोपीने पीडित मुलीला गावी आणले आणि एका पोलीस स्थानकाजवळ सोडून पळून गेले. त्यानंतर पीडित मुलगी आपल्या मावशीसोबत ललितपूर पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यासाठी आली. तेव्हा पोलीस अधिकारी तिलकधारी सरोज याने मुलीला एका खोलीत नेले आणि तिच्यावर बलात्कार केला.
Uttar Pradesh | A minor has alleged being raped by four boys on April 22. When she was brought to the police station, the SHO raped her as well. Case has been registered against six accused including SHO. One accused caught, SHO suspended: Nikhil Pathak, SP, Lalitpur (2.05) pic.twitter.com/ZkySIlI2nT
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) May 3, 2022
त्यानंतर आरोपी तिलकधारी सरोजने पीडित मुलीला दुसर्या दिवशी जबाब नोंदवण्यासाठी पुन्हा पोलीस स्थानकात बोलवले. अखेर हे प्रकरण वरिष्ठ अधिकार्यांकडे गेल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक तिलकधारी सरोजविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. आपल्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर सरोजने पळ काढला आणि फरार झाला.
या प्रकरणी मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्यानंतर सर्व आरोपींचा शोध घेऊन पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे. इतकेच नाही तर या प्रकरणी मुलीच्या मावशीलाही सह आरोपी करण्यात आले आहे.