Kamal Khan: युपीचे ज्येष्ठ पत्रकार कमाल खान यांनी घेतला जगाचा निरोप, हृदयविकाराच्या झटक्याने निधन

त्तर प्रदेशचे (Uttar Pradesh) वरिष्ठ पत्रकार (Senior Journalist) कमाल खान (Kamal Khan) यांचे वयाच्या 61 व्या वर्षी निधन (Passed away) झाले आहे. लखनऊमधील (Lucknow) आपल्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

senior journalist Kamal Khan
ज्येष्ठ पत्रकार कमाल खान  
थोडं पण कामाचं
  • 61 व्या वर्षी जेष्ठ पत्रकार कमाल खान यांचे निधन
  • बहुजन समाज पक्ष, समाजवादी पक्ष काँग्रेसने पत्रकार कमाल खान यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केले आहे.
  • कमाल खान यांचे लग्न पत्रकार रुचि कुमार यांच्यासोबत झालं होतं.

लखनऊ :  उत्तर प्रदेशचे (Uttar Pradesh) वरिष्ठ पत्रकार (Senior Journalist) कमाल खान (Kamal Khan) यांचे वयाच्या 61 व्या वर्षी निधन (Passed away) झाले आहे. लखनऊमधील (Lucknow) आपल्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कमाल खान यांना हृदयविकाराचा (Heart Attack)झटका आला होता, त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.  कमाल खान यांचे लग्न पत्रकार रुचि कुमार यांच्यासोबत झालं होतं. ते आपल्या कुटुंबासोबत लखनऊच्या बटलर पॅलेस येथे असलेल्या सरकारी बंगल्यात राहत होते. 

बीएसपी प्रमुख मायावतीने व्यक्त केले दुख  

मायावती यांनी ट्विट करत शोक व्यक्त केला आहे. एनडीटीव्हीशी संबंधित प्रतिष्ठित टीव्ही पत्रकार कमाल खान यांच्या अचानक निधनाच्या बातमीमुळे अत्यंत दु:ख तसेच पत्रकारिता जगाचं न भरून निघणारं नुकसान झालं आहे. त्यांच्या कुटुंबाला आणि त्याच्या चाहत्यां प्रती माझ्या सद्भाभावना आहेत. हे दु:ख सहन करण्याची शक्ती दैवाने द्यावी अशी प्राथर्ना करते. अशा अशायाचं ट्विट मायावती यांनी केलं आहे.  

सपाने वाहिली श्रद्धांजली 

कमाल खान यांच्या निधनावर समाजवादी पक्षाने शोक व्यक्त केला आहे. पक्षाने ट्विट केले की, 'खूप दुःखद! एनडीटीव्हीचे वरिष्ठ प्रतिनिधी जनाब कमाल खान साहब यांच्या निधनाने कधीही भरून न येणारे नुकसान झालं आहे. दिवंगत आत्म्याला शांती लाभो. शोकाकुल कुटुंबियांना हार्दिक संवेदना. भावपूर्ण श्रद्धांजली.'

काँग्रेसने शोक व्यक्त केला

काँग्रेसने ट्विट केले की, 'ज्येष्ठ पत्रकार कमाल खान साहब यांच्या निधन ही एक धक्कादायक बातमी आहे. ईश्वर दिवंगत आत्म्याला शांती देवो आणि कुटुंबीयांना हे अपरिमित नुकसान सहन करण्याची शक्ती देवो. भावपूर्ण श्रद्धांजली.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी