UPSC Success Story: बस चालवताना वडिलांना कळालं, मुलगी आयएएस झाली!

लोकल ते ग्लोबल
Updated Jun 12, 2019 | 09:50 IST | टाइम्स नाऊ हिंदी

upsc success story: मुलींची गर्भाशयातच हत्या करणारा समाज असलेलं राज्य म्हणून हरियाणाची ओळख होती. तिथूनच पीएचडीधारक आयएसएस ऑफिसर प्रशासनात कार्यरत आहे. तिला आयएस बनवण्याच स्वप्न तिच्या बाबांनी पाहिलं होतं.

IAS officer Preeti Hudda
बस चालवताना कळालं, मुलगी आयएएस झाली!  |  फोटो सौजन्य: Facebook

नवी दिल्ली: यूपीएससी परीक्षेतील यशस्वी तरुणांची प्रत्येकाची स्टोरी आपल्याला प्रेरणा देणारी आहे. या परीक्षेत यशस्वी होणारा प्रत्येक तरुण आपल्या संघर्षाची वेगळीच गोष्ट आपल्याला सांगत असतो. जणू खडतर परिस्थितीत जगण्यासाठी बळ देत असतो. संघर्षासाठी ताकद देत असतो. कितीही संकटं आली तरी आपलं लक्ष्य निश्चित असलं पाहिजे आणि त्यासाठीचे प्रयत्न आपण चालूच ठेवले पाहिजेत, असा संदेश ही तरुण मंडळी देत असतात. दिल्लीतील अशाच एका तरुण मुलीची कहाणी निश्चितच सगळ्यांना प्रेरणादायी ठरणारी आहे. प्रिती हुड्डा नावाच्या या तरुणीनं आपल्या वडिलांचं स्वप्न साकार केलंय.

हरियाणातील बहादूरगडची रहिवासी असलेल्या प्रितीचे वडील दिल्ली नगर परिवहनमध्ये ड्रायव्हरची नोकरी करतात. ते ड्रायव्हिंग करत असतानाचा त्यांना मुलगी आयएएस ऑफिसर झाल्याची गोड बातमी मिळाली होती. मुलींची गर्भाशयातच हत्या करणारं राज्य म्हणून ज्या राज्याची ओळख होती. त्याच राज्यातून एक पीएचडीधारक आयएसएस ऑफिसर आज, प्रशासनात कार्यरत आहे.

वडिलांनी दिली शाबासकी

प्रितीने २०१७मध्ये यूपीएससीची परीक्षा पास केली. त्यात तिचा २८८वा रँक आला होता. प्रिती दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात हिंदी विषयात पीएचडी करत होती. प्रितीने यूपीएससी परीक्षेत यश मिळवल्यानंतर बीबीसी हिंदाला एक मुलाखत दिली होती. त्यात तिनं आपण एका सामान्य कुटुंबातील असल्याचं सांगितलं होतं. त्याचवेळी वडील दिल्ली परिवहनमध्ये ड्रायव्हर असल्याचंही तिनं सांगितलं होतं. प्रितीनं मुलाखतीत सांगितलं की, माझ्यापेक्षा मी आयएएस ऑफिसर होणं हे स्वप्न माझ्या वडिलांनी पहिल्यांदा पाहिलं होतं. जेव्हा माझा रिझल्ट जाहीर झाला तेव्हा मी वडिलांना फोन केला. त्यावेळी वडील बस चालवत होते. वडिलांनी यापूर्वी मला शाबासकी दिली नाही. पण, जेव्हा मी यूपीएससी पास झाल्याचं सांगितलं तेव्हा त्यांनी मला शाबासकी दिली होती.

यूपीएससीमध्ये अंतिम टप्प्यात मुलाखत सगळ्यात महत्त्वाची असते. प्रितीची मुलाखत जवळपास ३५ मिनिटे चालली होती. त्यात जवळपास ३० प्रश्न विचारण्यात आले होते. बहुतांश प्रश्न तिच्या आधीच्या विषयांशी निगडीत होते. प्रितीनं जेएनयूमध्ये हिंदी विषयात पीएचडी केल्यामुळं तिला जेएनयू विषयीच विचारण्यात आलं होतं. जेएनयूच्या नकारात्मक बाजू काय आहेत, या प्रश्नावर तिनं जेएनयू केवळ नकारात्मक गोष्टींसाठी नाही तर, चांगल्या गोष्टींसाठी ओळखलं जातं. या विद्यापीठाला भारतातील सर्वोत्तम विद्यापीठांमध्ये स्थान मिळालंय, असं प्रितीनं सांगितलं.

हिंदीतून लिहिला पेपर

प्रिती हुड्डाने हिंदी विषयात पीएचडी केली आहे. तिनं यूपीएससीचा पेपरही हिंदीतूनच दिला. त्याशिवाय तिचा ऑप्शनल विषयही हिंदीच होता. त्याचबरोबर तिनं आपली पूर्ण मुलाखत हिंदीतूनच दिली. प्रितीनं सांगितलं की, मुलाखतीत तीन प्रश्नांची उत्तरं तिला देता आली नाहीत. मी एकत्र कुटुंबात वाढली आहे. माझ्या कुटुंबानं कधी माझ्यावर काही लादलं नाही. आमच्या इकडे मुलांच्या शिक्षणाकडं दुर्लक्ष केलं जातं. पण, माझ्या आई-वडिलांनी मला उच्च शिक्षण दिलं.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
UPSC Success Story: बस चालवताना वडिलांना कळालं, मुलगी आयएएस झाली! Description: upsc success story: मुलींची गर्भाशयातच हत्या करणारा समाज असलेलं राज्य म्हणून हरियाणाची ओळख होती. तिथूनच पीएचडीधारक आयएसएस ऑफिसर प्रशासनात कार्यरत आहे. तिला आयएस बनवण्याच स्वप्न तिच्या बाबांनी पाहिलं होतं.
Loading...
Loading...
Loading...