अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री भारत दौऱ्यावर, अनेक मुद्द्यांवर चर्चा

लोकल ते ग्लोबल
Updated Jun 26, 2019 | 08:15 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पोम्पिओ भारतात दाखल झाले आहेत. ते भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्यासोबत सुरक्षा करार, इराण तेल खरेदी आणि एच १ बी व्हिसासह अनेक मुद्दयांवर चर्चा केली जाणार आहे.

mike pompeo
माईक पॉम्पिओ 

नवी दिल्ली : अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पोम्पिओ मंगळवारी भारतात दाखल झाले. लोकसभा निवडणुकीनंतर एखाद्या देशाकडून होणारा हा पहिला उच्चस्तरीय दौरा आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि पोम्पिओ बुधवारी भारताकून रशियाद्वारे एस ४००, रॉकेट सुरक्षा प्रणालीची खरेदी, दहशतवाद, एच १ बी व्हिसा, व्यापार आणि इराणकडून तेल खरेदी या मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत. 

पोम्पिओ याचा हा दौरा अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रॅम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात जी-२० शिखर संमेलनातील बैठकीच्या आधी होत आहे. जी २० शिखर संमेलन २८-२९ जूनला जपानच्या ओसाकामध्ये पार पडणार आहे. पोम्पिओ जयशंकरच्यासोबतच्या बैठकीशिवाय भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांकडून आयोजित करण्यात आलेल्या भोजनसोहळ्यात सहभागी होणार आहेत. याशिवाय पोम्पिओ बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींचीही भेट घेणार आहेत. पोम्पिओ भारतीय आणि अमेरिकेच्या उद्योग जगतातील लोकांची भेट घेणार आहेत. तसेच येथील इंडिया इंटरनॅशनल सेंटरमध्ये भाषण देतील. 

भारत सरकार आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये बुधवारी दहशतवाद, अफगाणिस्तान, हिंद प्रशांत महासागर, इराण, व्यापाराचे मुद्दे आणि वाढत्या द्विपक्षीय सुरक्षेसंबंधी चर्चा होणार आहे. जयशंकर याबाबत म्हणाले, माइक पोम्पिओ यांच्यासोबतची बैठक महत्त्वपूर्ण असेल. देशात लोकसभा निवडणुकीनंतर माइक पोम्पिओ असे अमेरिकन मंत्री आहेत जे भारत दौऱ्यावर आले आहेत. आम्ही नक्कीच दोन्ही देशांदरम्यानच्या व्यापाराशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा कर. तसेच ही चर्चा सकारात्मक दृष्टिकोनातून होईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री भारत दौऱ्यावर, अनेक मुद्द्यांवर चर्चा Description: अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पोम्पिओ भारतात दाखल झाले आहेत. ते भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्यासोबत सुरक्षा करार, इराण तेल खरेदी आणि एच १ बी व्हिसासह अनेक मुद्दयांवर चर्चा केली जाणार आहे.
Loading...
Loading...
Loading...