अमेरिकेच्या नायजेरियातील लॅबमधून जगभर पसरतोय मंकीपॉक्स, रशियाचा आरोप

US labs in Nigeria spreading Monkeypox says Russia : अमेरिकेची नायजेरियातील बायोलॅब अर्थात जैविक प्रयोगशाळा मंकीपॉक्स हा आजार जगभर पसरण्यासाठी कारणीभूत असल्याचा आरोप रशियाने केला आहे.

US labs in Nigeria spreading Monkeypox says Russia
अमेरिकेच्या नायजेरियातील लॅबमधून जगभर पसरतोय मंकीपॉक्स, रशियाचा आरोप 
थोडं पण कामाचं
  • अमेरिकेच्या नायजेरियातील लॅबमधून जगभर पसरतोय मंकीपॉक्स, रशियाचा आरोप
  • नायजेरियातील अमेरिकेच्या बायोलॅबच्या सर्व शाखांची कसून तपासणी करावी - रशिया
  • नायजेरियातील अमेरिकेच्या बायोलॅबच्या शाखा (ब्रँच) अबुजा, झारिया आणि लागोस या तीन शहरांमध्ये

US labs in Nigeria spreading Monkeypox says Russia : अमेरिकेची नायजेरियातील बायोलॅब अर्थात जैविक प्रयोगशाळा मंकीपॉक्स हा आजार जगभर पसरण्यासाठी कारणीभूत असल्याचा आरोप रशियाने केला आहे. आण्विक, रासायनिक आणि जैविक हल्ल्यांपासून रशियाच्या सैनिकांचे रक्षण करण्यासाठी तयार केलेल्या विभागाचे प्रमुख इगोर किरिलोव्ह यांनी हा आरोप केला. 

जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार सध्या जगात ज्या मंकीपॉक्स विषयी चिंतेचे वातावरण आहे हा आजार नायजेरियातून पसरण्यास सुरुवात झाली आहे. या अहवालावर विश्वास ठेवला तर नायजेरियातील अमेरिकेची बायोलॅब अर्थात जैविक प्रयोगशाळा हीच मंकीपॉक्स हा आजार जगभर पसरण्यासाठी कारणीभूत असल्याचा आरोप इगोर किरिलोव्ह यांनी केला. नायजेरियातील अमेरिकेच्या बायोलॅबच्या शाखा (ब्रँच) अबुजा, झारिया आणि लागोस या तीन शहरांमध्ये आहेत. यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने नायजेरियातील अमेरिकेच्या बायोलॅबच्या सर्व शाखांची कसून तपासणी करावी अशी मागणी इगोर किरिलोव्ह यांनी केली. 

आतापर्यंत जगातील २० देशांमध्ये मंकीपॉक्सचे ३०० रुग्ण आढळले आहेत. वेळेत योग्य ते उपाय केल्यास मंकीपॉक्स नियंत्रणात येईल, असा विश्वास इगोर किरिलोव्ह यांनी व्यक्त केला. मंकीपॉक्स आजाराचा उगम शोधला तर त्यावरील उपाय सापडण्यास मोठी मदत होईल असाही विश्वास इगोर किरिलोव्ह यांनी व्यक्त केला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी