US Secret Fighter Plane : अमेरिकेत तयार होतंय ‘सिक्रेट फायटर जेट’, कमालीच्या गुप्ततेत बनतंय पुढच्या पिढीचं अस्त्र

मानवी इतिहासातील सर्वात महागडं आणि खतरनाक विमान अमेरिकेत तयार होत आहे. अत्यंत गोपनीय पद्धतीनं त्याची निर्मिती सुरू आहे.

US Secret Fighter Plane
अमेरिका गुप्तपणे बनवतेय खतरनाक जेट  |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • अमेरिकेत तयार होतंय सर्वात खतरनाक जेट
  • या दशकाच्या शेवटी वायूदलात दाखल होणार
  • मानवी इतिहासातील सर्वात महागडं विमान

US Secret Fighter Plane | अमेरिकेत (America) अत्यंत गोपनिय पद्धतीने (Secretive) एक फायटर जेट (Fighter Jet) तयार केलं जात आहे. अमेरिकेच्या वायूदलाकडून (American air force) अशा पद्धतीनं हे काम सुरू आहे की ताकासही तूर लागू नये. हे जेट प्रत्यक्ष कसं दिसतं, हे आजही कुणीच छातीठोकपणे सांगू शकत नाही. कारण विमानाच्या निर्मितीशी संबंधित काही निवडक अधिकारी वगळता कुणीच ते प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलेलं नाही. या विमानाचे जे जे फोटो सध्या इंटरनेट आणि सोशल मीडियात व्हायरल होत आहेत, ते सगळे कल्पनेवर आधारित आहेत. 

अधिकाऱ्यांनी दिली जुजबी माहिती 

नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमावेळी अमेरिकेचे सेक्रेटरी फ्रँक कॅडल यांनी याबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली. हे विमान निर्मितीच्या एका महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचलं असल्याची घोषणा त्यांनी केली. हेरिटेज फाउंडेशनच्या कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की अमेरिकेनं 2015 सालापासून ‘नेक्स्ट जनरेशन एअर डॉमिनन्स प्रोग्राम’ची अंमलबजावणी सुरू केली आहे. त्यावेळी फ्रँक कॅडल हे पेंटॅगॉनमध्ये वरीष्ठ अधिकारी म्हणून कार्यरत होते. हे विमान ‘एक्स प्लेन’ प्रोग्रामनुसार बनवलं जात असून त्याचं डिझाईन हे साधंसोपं असेल, असा संकेतही त्यांनी दिला आहे. 

जगातील सर्वात खतरनाक प्लेन

हे जेट जेव्हा तयार होईल, तेव्हा ते जगातील सर्वाधिक घातक आणि धोकादायक जेट ठरेल, असं फ्रँक यांनी म्हटलं आहे. हल्ला करणे, बचाव करणे आणि पाळत ठेवणे यासारख्या कामांसाठी या विमानात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. ‘फॅमिली ऑफ सिस्टीम’च्या धर्तीवर या जेटची रचना करण्यात आली आहे. याचाच अर्थ असा की हे जेट स्वतंत्रपणे आपलं काम करेलच, शिवाय ड्रोन एअरक्राफ्ट्स आणि मानवचलित एअरक्राफ्ट्स यांच्यासह वेगवेगळी ‘फॉर्मेशन्स’ तयार करूनही काम करू शकेल. 

अमेरिकेची ताकद वाढणार

नव्या दशकात होणार कार्यरत

या दशकाच्या अखेरीस नवं जेट तयार झालं असेल आणि वायूदलात दाखलही झालं असेल, असा विश्वास फ्रँक यांनी व्यक्त केला आहे. या जेटच्या निर्मितीतील ‘मेकॅनिकल’ आणि ‘इंजिनिअरिंग’ डेव्हलपेंटचे टप्पे पूर्ण झाले आहेत. वास्तविक, 2015 साली या विमानाच्या निर्मितीला सुरुवात झाली नव्हती, तर आता खरी सुरूवात झाली आहे, असं फ्रँक यांनी म्हटलं आहे. 

पुढच्या वर्षी 13 हजार कोटींचा खर्च

मानवी इतिहासातील हे सर्वाधिक महागडं विमान ठरणार आहे. NGAD प्रकारातील प्रत्येक विमानासाठी कोट्यवधी डॉलर्स मोजावे लागणार आहे. 2023 या वर्षासाठी आम्हाला 1.7 बिलियन डॉलर्स म्हणजेच साधारण 13 हजार कोटी रुपये देण्यात यावेत, अशी मागणी अमेरिकेच्या वायूदलानं अमेरिकी काँग्रेसकडे केली आहे.  

बदलणार जुनी यंत्रणा

हे नवं सिक्रेट प्लेन वायूदलात दाखल झाल्यानंतर जुने एफ-22 रॅप्टर फायटर जेट हटवले जाणार आहेत. नव्या विमानांच्या आगमनानंतर अमेरिकेचं वायूदल हे जगातील सर्वात आधुनिक आणि खतरनाक ठरणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी