अमेरिकेत धावत्या ट्रेनमध्ये बलात्कार

अमेरिकेतील फिलाडेल्फियामध्ये धावत्या ट्रेनमध्ये बलात्काराची घटना घडली. धक्कादायक म्हणजे अनेक नागरिक या घटनेचे मूकदर्शक होते.

US : philadelphia train rape case, woman was raped train riders failed to intervene
अमेरिकेत धावत्या ट्रेनमध्ये बलात्कार 
थोडं पण कामाचं
  • अमेरिकेत धावत्या ट्रेनमध्ये बलात्कार
  • अनेक नागरिक या घटनेचे मूकदर्शक
  • बलात्कार करणाऱ्याला अटक

फिलाडेल्फिया: अमेरिकेतील फिलाडेल्फियामध्ये धावत्या ट्रेनमध्ये बलात्काराची घटना घडली. धक्कादायक म्हणजे अनेक नागरिक या घटनेचे मूकदर्शक होते. यामुळे फिलाडेल्फियामधील कायदा-सुव्यवस्थेपुढे गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. US : philadelphia train rape case, woman was raped train riders failed to intervene

फिलाडेल्फियामध्ये १३ ऑक्टोबरच्या रात्री दहाच्या सुमारास एक महिला घरी जाण्यासाठी ट्रेनमध्ये बसली. ट्रेन सुरू झाली आणि एक पुरुष महिलेच्या शेजारी येऊन बसला, त्याने महिलेला त्रास देण्यास सुरुवात केली. या प्रकारामुळे वैतागलेल्या महिलेने सुरुवातीला संबंधित पुरुषाकडे दुर्लक्ष केले. पण त्या पुरुषाने ट्रेनने वेग पकडल्यानंतर महिलेवर जबरदस्ती केली, नंतर बलात्कार केला. तब्बल आठ मिनिटे महिलेचे लैंगिक शोषण सुरू होते. ट्रेनमधील सहप्रवासी या घटनेचे मूकदर्शक होते. पण कोणीही महिलेचे लैंगिक शोषण करणाऱ्याला अडवले नाही. पीडितेने वारंवार सहप्रवाशांकडे मदतीची याचना केली पण कोणीही तिच्या मदतीला धावून गेले नाही. 

स्थानिक पोलिसांनी बलात्कार करणाऱ्याला अटक केली आहे. या प्रकरणात काही साक्षीदारांनी आरोपीच्या विरोधात साक्ष देण्याची तयारी दाखवल्याचे पोलिसांनी सांगितले. उपलब्ध साक्षी-पुराव्यांच्या आधारे आरोपीला कठोर शिक्षा होईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला. पण गुन्हा होऊ नये यासाठी कोणीही का प्रयत्न केले नाही, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. 

सर्व्हे आणि प्रत्यक्षातील स्थितीमध्ये प्रचंड तफावत

अमेरिकेत सर्व्हे हा एक मोठा व्यवसाय आहे. वेगवेगळ्या सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय मुद्यांवर अमेरिकेत सातत्याने सर्व्हे सुरू असतात. महिला सुरक्षेशी संबंधित काही सर्व्हे अलिकडच्या काळात अमेरिकेत झाले. या सर्व सर्व्हेमध्ये बहुसंख्य नागरिकांचा सूर सार्वजनिक ठिकाणी महिलेला त्रास दिला जात असेल तर आम्ही हा गुन्हा रोखू आणि गुन्हेगाराला पकडून पोलिसांच्या ताब्यात देऊ असा होता. प्रत्यक्षात ज्यावेळी अमेरिकेतील ट्रेनमध्ये आठ मिनिटे महिलेवर बलात्कार होत होता त्यावेळी सहप्रवासी घटनेचे मूकदर्शक झाले होते. जगात कायदा-सुव्यवस्था नांदावी यासाठी इतर देशांना मागितले नसताना सूचना-सल्ले देणाऱ्या अमेरिकेसाठी त्यांच्या देशातील ताजी घटना डोळ्यात अंजन घालणारी ठरेल का, हा एक मोठा अनुत्तरित प्रश्न आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी