Donald Trump On Kashmir: काश्मीर प्रश्नावर डोनाल्ड ट्रम्प यांना चिंता; मध्यस्थीची तयारी

लोकल ते ग्लोबल
Updated Aug 21, 2019 | 15:56 IST | टाइम्स नाऊ मराठी वृत्तसेवा

Donald Trump On Kashmir: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काश्मीर प्रश्नावर मध्यस्थीची तयारी दर्शवली आहे. भारताबाबत सभ्या भाषेचा वापर करावा, असे ट्रम्प यांनी पाक पंतप्रधान इमरान खान यांना सुनावले आहे.

us president donald trump
डोनाल्ड ट्रम्प यांचे पुन्हा काश्मीरबाबत वक्तव्य   |  फोटो सौजन्य: AP

थोडं पण कामाचं

  • अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा काश्मीरच्या विषयात मध्यस्थीची दाखवली तयारी
  • ट्रम्प यांचे जम्मू-काश्मीरबाबत वक्तव्य; स्फोटक परिस्थितीच असल्याचे मत
  • तणाव वाढणार नाही, याची काळजी घ्या; ट्रम्प यांचे भारत-पाकिस्तानला आवाहन

वॉशिंग्टन डीसी : जम्मू-काश्मीरला स्वायत्तता देणारे कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय भारताने घेतल्यानंतर काश्मीरचा मुद्दा आंतरराष्ट्रीय पातळीवर पुन्हा चर्चेला आला आहे. पाकिस्तानला कायम मदतीची खैरात देणारा अमेरिका काश्मीर प्रश्नावर सातत्याने हस्तक्षेप करण्याच्या प्रयत्नात आहे. महिनाभरापूर्वी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काश्मीर प्रश्न भारत आणि पाकिस्तान यांच्यात मध्यस्थी करण्याची इच्छा प्रकट केली होती. त्यानंतर आता पुन्हा ट्रम्प यांनी याप्रकरणात मध्यस्थी करण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. ट्रम्प यांनी सातत्याने या प्रश्नावर नाक खुपसणे सुरू केले आहे. गेल्या सोमवारी ट्रम्प यांनी पाकिस्तानला दम दिला होता. पाकिस्तानने भारताबाबत सभ्या भाषेचा वापर करावा, असे ट्रम्प यांनी पाक पंतप्रधान इमरान खान यांना सुनावले होते. त्यानंतर ट्रम्प आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात फोनवरून अर्धा तास संभाषण झाले होते.

काश्मीरमध्ये स्फोटक स्थिती

दरम्यान, व्हाईट हाऊसमध्ये ट्रम्प यांनी माध्यमांशी संवाद साधला. काश्मीर हा खूपच गुंतागुंतीचा विषय आहे. तेथील बऱ्याच गोष्टी ह्या धर्माशी संबंधित आहे, असे मत ट्रम्प यांनी नोंदविले आहे. ते म्हणाले, ‘काश्मीर ही खूपच गुंतागुंतीची जागा आहे. तेथे हिंदूही आहेत आणि मुस्लिमही. ते गुण्यागोविंदानं नांदतायत, असं सांगता येत नाही. कोट्यवधी लोक आहे जे दुसऱ्या समाजावर राज्य करू इच्छितात. दोन देश आहेत, ज्यांच्या बऱ्याच काळापासून चांगले संबंध नाहीत. त्यामुळे तेथे खूपच स्फोटक परिस्थिती आहे. मी पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या दोघांशी फोनवरून चर्चा केली आहे. दोन्ही नेते खूप महान आहे. त्यांच्या देशावर त्यांचे खूप प्रेम आहे. पण, ते खूप कठीण परिस्थितीत आहेत. गेल्या दशकभरापासून ही स्थिती आहे आणि काही काळापासून जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.’

तणाव वाढवू नका : ट्रम्प

ट्रम्प म्हणाले, ‘काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानच्या पंतप्रधानांची आणि माझी येथे भेट झाली. फ्रान्समध्ये जी-७ राष्ट्रांच्या बैठकीत मी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे. आम्ही मदत करत आहोत. पण, दोन्ही देशांदरम्यान खूप मोठे मतभेद आहेत. मी माझ्यापरीने शक्यते देण्याचा प्रयत्न करीन. मी मध्यस्थी किंवा तसे काही तरी करू शकतो. आमचे दोन्ही देशांशी खूप चांगले संबंध आहे. पण, ते या क्षणी मित्र नाहीत. गुंतागुंतीची परिस्थिती आहे. त्याचा धर्माशी संबंध आहे आणि धर्म हा गुंतागुंतीचा विषय आहे.’ दक्षिण आशियामध्ये तणावाची स्थिती निर्माण होऊ नये यासाठी दोन्ही देशांनी तोडगा काढवा, असे आवाहनही ट्रम्प यांनी केले आहे.’ भारत सरकारने ७ ऑगस्ट रोजी जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द करून  जम्मू-काश्मीर सुधारणा विधेयक २०१९ लागू केले. त्यानुसार जम्मू-काश्मीर आणि लडाख प्रांत स्वतंत्र झाला असून, दोन वेगवेगळ्या केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती करण्यात आली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...