अरे बापरे! डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागतासाठी उभारलेला गेटचं कोसळला

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सोमवारी (दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ट्रम्प अहमदाबादला भेट देणार आहेत. ट्रम्प यांच्या स्वागतासाठी उभारण्यात आलेला गेटच कोसळला आहे.

Motera Stadium gate
अरे बापरे! डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागतासाठी उभारलेला गेटचं कोसळला  

अहमदाबादः अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सोमवारी (24 फेब्रुवारी) दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ट्रम्प अहमदाबादला भेट देणार आहेत. अहमदाबाद भेटीदरम्यान मोटेरा स्टेडिअममध्ये नमस्ते ट्रम्प कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाची जोरदार तयारी सध्या सुरू आहे. याच दरम्यान अहमदाबादमधली मोटेरा स्टेडिअममध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागतासाठी उभारण्यात आलेला गेटच कोसळला आहे. जोरदार हवेमुळे हा गेट कोसळल्याचं कॅमेऱ्यात कैद झालं आहे. ट्रम्प यांच्या भारत दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मोटेरा स्टेडिअममध्ये कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. 

मोटेराच्या गेट नंबर तीनवर हा तात्पुरता गेट उभारण्यात आला होता. याच गेटमधून ट्रम्प आणि मोदी यांची एंट्री होणार होती.  मात्र जोरदार हवेमुळे हा गेट कोसळला आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या पत्नी मेलेनिया २४ आणि २५ फेब्रुवारीला अहमदाबाद, आग्रा आणि नवी दिल्लीला भेट देणार आहेत. अहमदाबाद विमानतळ ते मोटेरा स्टेडियम या मार्गानं ट्रम्प जातील. गेल्या अनेक दिवसांपासून अहमदाबादमध्ये त्यांच्या स्वागताची तयारी सुरू आहे. दरम्यान विशेष म्हणजे ट्रम्प यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मोटेरा स्टेडिअममध्येच 25 बेडचं रूग्णालय तयार करण्यात आलं आहे. हे रुग्णालयं तात्पुरत्या स्वरूपातलं आहे.

डोनाल्ड ट्रम्प आणि पत्नी, आता मुलगी इवांका ट्रम्प आपल्या पतीसह भारत दौऱ्यावर येत आहेत. इवांका ट्रम्पचा हा दुसरा भारत दौरा असेल. याआधी इवांका 2017मध्ये हैदराबादमधील ग्लोबल बिजनेस समिटमध्ये सहभागी होण्यासाठी आली होती. मात्र डोनाल्ड ट्रम्प यांचे जावई जेरेड कुशनर यांचा हा पहिलाच भारत दौरा असणार आहे.

सोन्या-चांदीच्या ताटात जेवणार डोनाल्ड ट्रम्प

राष्ट्रीय राजधानीतील आयटीसी मौर्य हॉटेलमध्ये वास्तव्यास असणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलानिया जयपूरमध्ये  बनलेले सोन्या-चांदीच्या भांड्यांमध्ये रात्रीचं जेवण जेवतील. त्यासोबतच चांदीच्या पेलातून चहा घेतील.  

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी