Biden rushed to safe House | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष (US President) जो बायडन (Joe Biden) हे त्यांच्या खासगी निवासस्थानाच्या (Holiday home) परिसरात फिरत असताना अचानक एक विमान (Plane) बेकायदेशीररित्या त्या भागात घुसलं. हे समजताच यंत्रणा सतर्क झाल्या. आपातकालीन यंत्रणा सक्रीय करण्यात आली. जो बायडेन यांना तातडीनं जवळच्या सेफ हाऊसकडे घेऊन जाण्याचा निर्णय झाला. पुढच्या काही मिनिटांत त्यांना सेफ हाऊसमध्ये पोहोचवण्यात आलं. काही मिनिटांच्या या घटनेनं व्हाईट हाऊससह संपूर्ण अमेरिकेत एकच चर्चा सुरू झाली.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन हे त्यांच्या हे डेलवरपाशी असणाऱ्या रोहबोथ बिचवर फिरण्यासाठी गेले होते. डेलवरमध्ये त्यांचं वैयक्तिक निवासस्थान आहे आणि सुट्टीच्या दिवशी ते आपल्या मूळ गावी राहणंच पसंत करतात. त्यांच्यासोबत नेहमीप्रमाणे सुरक्षारक्षकांचा ताफा होताच. बिचवर ते पत्नीसह फेरफटका मारत होते. तेवढ्यात आकाशात एक विमान दिसलं आणि ते बायडन यांच्या दिशेनं येऊ लागलं. वास्तविक, अमेरिकेत सतत आकाशातून इकडून तिकडे जाणारी विमाने दिसतच असतात. मात्र बायडन यांच्या दिशेनं येणारं हे विमान बेकादेशीररित्या त्या हद्दीत घुसलं असल्याची सूचना सुरक्षा यंत्रणांना मिळाली आणि त्यानंतर धावाधाव सुरू झाली.
Biden rushed to safe house in Delaware after unauthorized plane violates airspace — ANI Digital (@ani_digital) June 5, 2022
Read @ANI Story | https://t.co/tQEjfx1ZIr#JoeBiden #USA #Delware pic.twitter.com/aDTbUy8Emv
ते विमान बायडन यांच्यापाशी पोहोचण्यापूर्वीच त्यांना सुरक्षित ठिकाणी घेऊन जाण्याचं आव्हान यंत्रणांसमोर होतं. बायडन यांना आगंतुक विमान परिसरात घुसल्याची कल्पना देण्यात आली आणि त्यांच्या गाड्यांचा ताफा विद्युतवेगाने जवळच्या फायर हाऊसकडे वळवण्यात आला. त्यांच्या घराऐवजी जवळच्या सेफ हाऊसमध्ये त्यांना ठेवण्याचा निर्णय यंत्रणांनी घेतला होता. त्यानुसार पुढच्या काही क्षणांत गाड्यांचा ताफा फायर स्टेशनमध्ये घुसला आणि राष्ट्राध्यक्षांना सुरक्षित जागी पोहोचवण्यात आलं.
अधिक वाचा - Chemical Factory Boiler Explosion: कारखान्यातील बॉयलरचा स्फोट, 12 जणांचा मृत्यू; PM मोदींकडून शोक व्यक्त
वास्तविक, आपली हद्द सोडून ते विमान भरकटल्याचं नंतर स्पष्ट झालं. वैमानिकाचा यंत्रणेशी संपर्क होत नव्हता. त्यामुळे आपली हद्द सोडून ते काही अंतर वेगळ्या दिशेला गेलं होतं. मात्र त्यानंतर तातडीने हे विमान त्या परिसरातून हटवण्यात आलं आणि ठरलेल्या ठिकाणी उतरवण्यात आलं. या वैमानिकाचा खरंच संपर्क तुटला होता आणि इतर काही कारणांमुळे ही घटना घडली, याचा तपास अमेरिकन यंत्रणांनी सुरु केला आहे.
अमेरिकेत अशा प्रकारे विमान भरकटल्यामुळे आणि नेमके राष्ट्राध्यक्ष असलेल्या परिसरातच ते गेल्यामुळे भितीचं वातावरण तयार झालं होतं. मात्र काही क्षणांत ते निवळलं. किरकोळ चुकीमुळे ही घटना घडल्याचं लक्षात आल्यावर सगळेच रिलॅक्स झाले आणि सर्व व्यवहार पूर्ववत सुरू करण्यात आले.
यापूर्वी 2017 सालीदेखील एक रशियन विमान बेकायदेशीररित्या अमेरिकेच्या हद्दीत शिरलं होतं. त्या घटनेच्या आठवणी या निमित्ताने पुन्हा जाग्या झाल्या.