TikTok ban in US: भारतानंतर अमेरिका देणार चीनला झटका, मोठ्या कारवाईची शक्यता 

US on banning TikTok: अमेरिकेचे राज्य सचिव माईक पोंपिओ यांनी म्हटले आहे की अमेरिका चीनी अ‍ॅप टिक टॉकवर बंदी घालण्याचा विचार करीत आहे. भारताने या अॅपवर यापूर्वीच बंदी घातली आहे.

USA ban on tiktok
टिक टॉकसह चीन अॅप्सवर अमेरिका घालणार बंदी  |  फोटो सौजन्य: ANI

थोडं पण कामाचं

  • सीमेवर तणाव निर्माण झाल्यानंतर भारताने टिक टॉकसह चीनच्या ५९ अॅपवर  बंदी घातली होती
  • चीनच्या सोशल मीडिया अ‍ॅपवर बंदी घालण्याचा अमेरिकेचाही विचार
  • परराष्ट्रमंत्री पोंपिओ म्हणाले की, आता चीनला वेगळ्या पद्धतीने सामोरे जावे लागेल

वॉशिंग्टन: भारताने टिक टॉकसह (Tik ToK) ५९ अॅपवर घातलेल्या बंदीनंतर आता आता अमेरिका (USA) देखील चीनला जोरदार धक्का देण्याच्या तयारीत आहे. अमेरिकेचे राज्य सचिव माईक पोंपिओ यांनी देखील चिनी अ‍ॅपवर बंदी आणण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. पोंपिओ म्हणाले की, टिक टॉकसह चीनी सोशल मीडिया अ‍ॅप्सवर बंदी घालण्याबाबत अमेरिका निश्चितपणे विचार करीत आहे. दरम्यान, गलवान खोऱ्यातील हिंसाचारानंतर भारताने चीनमधील टिक टॉक, यूसी ब्राउझर, शेअर इट अशा ५९ अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे.

'बंदी घालण्याबाबत आम्ही निश्चितपणे विचार करतोय'

वृत्तसंस्था रॉयटर्सच्या मते, पोंपिओ यांनी दिलेल्या मुलाखतीत असं म्हटलं आहे की, 'आम्ही अ‍ॅपवरील बंदीवर निश्चितपणे विचार करीत आहोत.' भारताने सुरक्षेच्या कारणास्तव चीनच्या ५९ अॅपवर बंदी घातली आहे. यातील सर्वात लोकप्रिय म्हणजे अॅप म्हणजे टिक टॉक. भारत सरकारची ही कारवाई चीनला धक्का देणारी ठरली आहे. भारतात हे सर्व अ‍ॅप्स अॅपल आणि गुगलच्या एलएलसी अ‍ॅप स्टोअरमधून हटविण्यात आले आहेत.

अमेरिकेतील अनेक नेत्यांनी भारताच्या या निर्णयाचे केले कौतुक 

चीनच्या अ‍ॅप्सवर बंदी घालण्याच्या भारताच्या या निर्णयाचे अमेरिकेत मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. परराष्ट्रमंत्री पोंपिओ, रिपब्लिकन नेते निक्की हेले यांच्यासह अनेक सिनेटर्सनी भारताच्या या निर्णयाचे कौतुक केले आहे. अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओ ब्रायन यांनी असा आरोप केला आहे कीस चीनी सरकार टिक टॉकचा उपयोग स्वतःच्या हितासाठी आणि हेतूंसाठी करीत आहे.

पोंपिओ यांनी चीनसाठी स्वतंत्र धोरणाचा आग्रह धरला

रिपोर्टनुसार, पोंपिओने चीनबाबत स्वतंत्र धोरणावर काम करण्याचा आग्रह धरला. ते म्हणाले की, अमेरिकेला आता चीनशी वेगळ्या पद्धतीने वागावं लागेल. कारण जुनी धोरणे आता योग्य नाहीत. मी जुन्या राज्यकर्त्यांवर टीका करीत नाही. पण आपण स्पष्टपणे पाहू शकतो जुनी धोरणं यशस्वी झालेली नाही. म्हणजेच याचा असा अर्थ आहे की अमेरिकेला आता दुसरा मार्ग वापरावा लागेल.'

चिनी कंपन्यांवर भारत सरकारची करडी नजर

भारताशी ज्या देशांच्या भौगोलिक सीमा जोडलेल्या आहेत अशा शेजारी देशांमधील गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीसाठी केंद्र सरकारची मंजुरी देशात बंधनकारक करण्यात आली आहे. या निर्णयाद्वारे केंद्र सरकारने चिनी कंपन्यांना भारतात अव्वाच्या सव्वा गुंतवणूक करण्यापासून रोखण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. चीन हळू हळू गुंतवणूक करुन भारतीय कंपन्या ताब्यात घेण्याच्या आणि देशाच्या अर्थव्यवस्थेलाच आव्हान देण्याच्या प्रयत्नात आहे. या प्रयत्नांची जाणीव होताच केंद्र सरकारने तातडीने कठोर पावले उचलली आहे. या पाठोपाठ चिनी अॅपवर बंदी घालून चीनची आणखी कोंडी करायला सुरुवात केली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी